शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

तुम्ही जे करताय, ते का करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:58 IST

आपण एखादी गोष्ट करतो; पण ती का करतो, याचं उत्तर आपल्याकडे हवं. नाही तर ती कशी करतो याचे अर्थच बदलतात. म्हणून विश्लेषण करत बसण्यापूर्वी जरा संश्लेषण करा. मग बघा काय होतं.

ठळक मुद्दे‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.

- डॉ. भूषण केळकर

सॉफ्ट स्किल्समध्ये ‘विचारांची स्पष्टता’ ही आत्यंतिक महत्त्वाची आहे. आपण एखादी गोष्ट ‘कशी’ करतो  हे जसं महत्त्वाचं तसं ती गोष्ट ‘का’ करतो हेही महत्त्वाचं. त्या का चे उत्तर निर्‍संदिग्धपणे माहिती असणं म्हणजे विचारांची स्पष्टता असणं.म्हणजेच हेतू जर माहिती असेल तर बहुतांश वेळा कृतीमध्येसुद्धा स्पष्टता येते.हा हेतू माहिती करून घेणं म्हणजे sunthesis त्याला मराठीत संश्लेषण म्हणतात. विश्लेषण म्हणजे अ‍ॅनालिसिस हा शब्द आपण सहज वापरतो. त्यासोबत संश्लेषण करता येणं हे सॉफ्ट स्किल.तुम्हाला मी काही साधी उदाहरणं देतो म्हणजे हे संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल.कसाई धारदार शस्त्रानं पोट फाडतो आणि निष्णात शल्यविशारदही तेच करतो; पण हेतू पूर्ण वेगळे! म्हणजे का या एका गोष्टीनं कृतीचा हेतू बदलला.अजून एक उदाहरण. का नंतर कसं केलं याचं.घरी पाहुणे आलेले असताना मला बायकोने ‘पटकन पोहे घेऊन ये’ असं सांगितलं आणि मी चिवडय़ाचे पातळ पोहे घेऊन आलो! पुढे, पाहुणे गेल्यानंतर आमच्यात जो प्रेमळ संवाद घडला त्याचं सविस्तर वर्णन देण्याची ही जागा नव्हे, नाही का? तर करिअर घडवतानासुद्धा आपण एखादी पदवी/ पदविका ‘का’ करतो आहोत याचं उत्तर आपण नीट जाणलेलं असणं महत्त्वाचं. त्यानं तुम्हाला खूप फायदे होतील.जॉबच्या किंवा शिष्यवृत्तीसाठीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला यूपीएससी परीक्षा का द्यायची होती’ किंवा तुम्ही ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग का निवडलंत?’ किंवा तुम्हाला आमच्याच कंपनीत/ याच जॉब रोलमध्ये नोकरी का करायची आहे?आता या सगळ्या आणि या प्रकारच्या का प्रश्नांना देवाची करणी अन् नारळात पाणी टाइपचे उत्तर देणं धोक्याचं आहे हे तुम्ही ओळखलं असेल!काही वर्षापूर्वी मला धक्का बसला होता. तृतीय वर्ष बी.कॉम.च्या मुलानं मला फोन केला होता. हे विचारायला की आता तीन महिन्यात मी ग्रॅज्युएट होणार तर मी आता नोकरी करू, ती कशी शोधू की एमसीएम करू?मी जेव्हा त्याला विचारलं, की तू जेव्हा तीन वर्षापूर्वी बी.कॉम. सुरु केलंसं तेव्हा तुझ्या मनात काय होतं? आपण बी.कॉम. करून कुठे नोकरी करणार? तर तो म्हणाला मी बी.कॉम. मित्र करत होते म्हणून केलं, फारसा विचार नाही केला! आजकाल मला असे धक्के बसणे कमी झालं आहे. याचं कारण हे नाही की मला अशी मुलं-मुली भेटत नाहीत, तर कारण हे आहे की इतकी मुलं-मुली भेटली आहेत की मन निर्ढावलंय!सिमॉन सिनेक नावाच्या लेखकाचं एक पुस्तक खूप भावलं. ते तुम्हाला जाता जाता सांगून ठेवतो. त्याचं नाव आहे ‘स्टार्ट विथ व्हाय’हेतू समजला तर निर्णयक्षमता वाढते यात शंकाच नाही. म्हणजेच ‘का’ समजलं तर ‘काय’ आणि ‘कसं’ हे सहजसाध्य असेल.मी जेव्हा जेव्हा विद्याथ्र्याबरोबर संवाद साधतो तेव्हा तेव्हा हा विचार करतो की आज मी जे काही त्यांना सांगणार आहे ते ‘का’ सांगणं महत्त्वाचं आहे.  ‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. आजकालची पिढी ते सहज शोधूही शकते. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.नुसत्या माहितीपेक्षा ‘का’चा संदर्भ वापरून करतात ते संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे येतंय ना लक्षात?बघा म्हणजेरेड लेबल असं म्हटलं कुणी.तर ते कोण, का, कसं, कधी म्हटलंय यावरून तुम्ही अर्थ काढता ना? मग कृती करता.कधी चहा आणता आणि कधी.कळलं ना? का किती महत्त्वाचं ते.

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)