शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

आम्ही काय घालायचं, हे तुम्ही कोण ठरवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 07:30 IST

मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात बंड पुकारणार्‍या मुली काय म्हणतात?

ठळक मुद्दे आम्ही कोणते कपडे घालायचं, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? 

-स्नेहा मोरे

जे. जे. महाविद्यालयात तोकडय़ा कपडय़ांवरून हंगामा झाला. मुलींनी शॉर्ट स्कर्ट घालू नयेत, मुलांशेजारी बसू नये असा आदेश निघाला. काही वेळातच तो मेसेज व्हायरल झाला, अन मग वसतिगृहात एकच खळबळ माजली. मुलींना वेळेचं- कपडय़ांचं बंधन होतंच त्यामुळे असंतोष वाढला. मुंबईसारख्या मेट्रो शहरातील प्रख्यात जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला याचंच अनेकांना नवल वाटलं.जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आदेश दिले अन मग त्यानंतर ते काही दिवस सुटीवर होते. दरम्यान महाविद्यालयात मुलींनी आक्र मक पवित्ना धरला. त्यातल्याच एका विद्यार्थिनीने या बंडखोरीविषयी सांगितले की, अधिष्ठाता कार्यालयासमोर स्कार्फ बांधून ठिय्या सुरू केला. आमच्याच वागण्यावर बंधनंका? आम्हीच का वेळ पाळायची, असं आमचं म्हणणं. काही बदलायचचं असेल तर तुमचे विचार बदला. आता एकविसाव्या शतकात आहोत, आम्ही मॅच्युअर्ड आहोत. डॉक्टर होणार आहोत. आम्ही कोणते कपडे घालायचं, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नुकतीच इंटर्नशिप पूर्ण व्हायला आलेली विद्यार्थिनी सांगत होती. लायब्ररीत थांबायच्या वेळेवरही बंधनं आहेत आणि हे फक्त आमच्याच महाविद्यालयात आहे. हे असं का? आम्हाला नियमांची वेगळी फूटपट्टी का? आम्ही ठरवलं होतं, नियम पाळायचे नाहीतच. बंडखोरी करायलाच हवी. हा संघर्ष केवळ कपडय़ांपुरता मर्यादित नव्हता. ही आमच्या अस्तित्वाची लढाई होती, आज आवाज उठवला नाही तर आमच्यानंतरच्या बॅचलाही हे असले ठोकताळे लावले गेले नसते. महोत्सवाचा दिवस उजाडला, अन वर्षभर तयारी केल्याप्रमाणे आम्ही तयार झालो. थोडं दडपणं होतं मनात; पण आम्ही ठरवल्याप्रमाणे महोत्सवाच्या दिवशी ठरवलेले आमच्या आवडीचे कपडे परिधान करून गेलो. त्यावेळी तेथील सुरक्षारक्षकाने हटकलं खरं, पण आम्ही ऐकलं नाही. आम्ही त्या महोत्सवात सहभागी झालो, रात्नंदिवस काम करताना थकणारे आम्ही वर्षभरातून एकदाच येणारा हा दिवस आम्ही साजरा केला. महाविद्यालय प्रशासन घडल्याप्रकाराबाबत चौकशी करणार आहे. मात्न आम्ही त्याला सामोरे जायचं ठरवलं आहे.’मुली सांगतात की ही आमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आता तूर्तास हे प्रकरण मिटलं असलं तरी मुंबईसारख्या शहरातही मुलींच्या कपडय़ांवरून अजून वादंग होत आहेत आणि त्याविरोधात मुली उघड बंड करत आहेत, हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.