शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

डिजिटल सेक्सचे बळी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:35 IST

‘तसले मेसेज’, चावट जोक, सेक्सटिंग हे सारं ऑनलाइन ‘सुख’ देतं तुम्हाला?

ठळक मुद्देवेळीच सावध व्हा आणि स्वत:ला आवरा!

निशांत महाजन

तुमचं असं कधी होतं का,तुमचा मूड खूप चांगला असतो,  आणि अचानक तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधल्या चर्चा वाचता, आणि मूड जातो. उदास वाटायला लागतं.कधीकधी एकदम चिडचिड होते. रडावंसं वाटतं. फटिग येतो. डोकं जड वाटतं. -होतं असं?त्याउलट कधी अवचित कुणीतरी म्हणतं डीपी एकदम छान आहे. मग गप्पा सुरु होतात. फ्लर्ट करणं सुरु होतं. आपल्याला मस्त वाटतं. त्या गप्पा हळूहळू सवयीच्या होतात. मग इमेज शेअरिंग,नाजूक गोष्टी शेअरिंग सुरु होतं. तासंतास व्हिडीओ कॉल होतात. आणि एक दिवस हे सारं नाही झालं तर लगेच चिडचिड होते. लेफ्ट आऊट फिलिंग येतं.-होतं असं?कधीकधी आपण फेसबुकवर पोस्ट टाकतो. आणि येणार्‍या कमेण्ट्स आणि लाइक्स मस्त एन्जॉय करतो. कधी मात्र आपल्याला लोक नावं ठेवतात. ट्रोल केलं जातं.टर उडवली जाते. अशावेळी कुठं तोंड लपवावं हे कळत नाही. आपल्या स्व प्रतिमेच्या ठिकर्‍या उडतात.-होतं असं?***कितीही नाही म्हणा, ऑनलाइन असलेल्या आणि व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक वापरणार्‍या प्रत्येकाचं सध्या असं होतं. प्रमाण कमीजास्त असेल मात्र ऑनलाइन असताना मूड्सचा झोपाळा असा वरखाली होत राहतो.आपल्या लक्षातही येत नाही मात्र आपली चिडचिड, कामावरुन लक्ष उडणं, आपण अजिबात फोकस करू न शकणं, उदास वाटणं आणि अत्यंत एकाकी वाटणं हे सारं सतत ऑनलाइन राहिल्यानं वर्तन समस्या म्हणून आता समोर येत आहे.तरुण मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष आणि काळजीही अलीकडेच जर्नल ऑफ सायबर सायकॉलॉजी बिहेव्हिअर अ‍ॅण्ड सोशल नेटवर्किग या आरोग्य पत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.तरुण मुलामुलींमध्ये सेक्सटिंगचं प्रमाण जास्त आहे, हे उघड आहे. मात्र सेक्स मेसेजेस एकमेकांना करता करता नगA इमेजेसही काहीजण पाठवतात. त्यातून काही नकोसे मेसेज, नकोसे जोक्स, टीका, टोमणे हे सारं सुरु होतं. आणि अस्वस्थता वाढते आणि ताण वाढून अनेकांना औदासिन्य छळू लागतं. ते जर वेळीच आवरलं नाही तर डिप्रेशनच्या दिशेनंही वाटचाल सुरु होते असं हा अभ्यास सांगतो.आणि धोक्याचा इशाराही देतोय की, आपल्या डिजिटल फुटप्रिण्टकडे बारकाइनं पहा. आपण काय डिजिटली मागे ठेवतोय त्याचा विचार करा कारण त्या समुद्रातून ते कधीही बाहेर फेकलं जाणार नाही. आणि त्या डिजिटल फुटप्रिण्ट ईल किंवा त्रासदायक आहेत का, हे तपासा.दुसरं म्हणजे वयात आल्यावर किंवा तारुण्यातही लैंगिक भावना प्रबळ असणं, सारं करुन पाहावंसं वाटणं, उत्सुकता चाळवणं हे अनैसर्गिक नाही. मात्र आपलं लैंगिक समाधान केवळ डिजिटल सेक्सपुरतंच मर्यादित राहील आणि प्रत्यक्षात आपण तणावग्रस्त, अस्वस्थ आणि डिप्रेशनमध्ये गेलेलो असू का, हे तपासून पहायला हवं असंही हा अभ्यास सांगतो.त्यामुळे आत्मपरिक्षण करत आपणही आपल्या फुटप्रिण्ट तपासलेल्या बर्‍या.धोका आहेच, हे लक्षात ठेवणं उत्तम.