शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

या उन्हाळ्यात कुठले सनग्लासेस घ्याल?

By admin | Updated: April 11, 2017 18:53 IST

उन्हाळा म्हटला की, कितीही आवरून-सावरुन घराबाहेर पडलं तरी पाच मिनिटांत घामांच्या धारा सगळा ‘लूक’ पार पुसून काढतात.

उन्हाळ्यात फॅशनेबलच नाही तर कूल ठेवणारा डोळ्यावरचा नया चष्माउन्हाळा म्हटला की, कितीही आवरून-सावरुन घराबाहेर पडलं तरी पाच मिनिटांत घामांच्या धारा सगळा ‘लूक’ पार पुसून काढतात. सगळी मेहनत वाया जाते. त्यामुळे चांगले, स्टाईलिश आणि महागडे कपडे खराब होऊ नये म्हणजे ते घालावेसे वाटत नाही. पण म्हणून काय मग दिवसभर घरातच बसून राहायचं का? मग असा काही पर्याय आहे का की, त्यामुळे लूकही चांगला असेल आणि खिशावरही ताण पडणार नाही?सनग्लासेस हा त्यावर उपाय.तुमचा शर्ट कसाही असू द्या, हेअरस्टाईल कोणतीही असू द्या, उन्हाळ्यात या सगळ्यांची उकाड्यामुळे पुरती वाट लागते. सनग्लासेसच अशी एक गोष्ट आहे जी आपला लूक चांगला ठेवतात. सगळ्यांनाचा महागडे गॉगल्स घेणं परवडेलचं असं नाही. पण चांगलं दिसण्यासाठी महागड्या गोष्टीच लागतात असे कोणी सांगितले. योग्य ती स्टाईल माहित असेल तर ‘बीच का रास्ता’ निघतोच ना! सनग्लासेसचे असेच हे काही ट्रेण्डी आॅप्शन्स..१. डिझायनर सनग्लासेसकेवळ उन्हाच्या तीव्रतेपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस घालण्याला काय अर्थ आहे. ते डिझायनर आणि स्टायलिश असावेत. प्रत्येक मूडसाठी आणि प्रसंगासाठी डिझायनर सनग्लासेस आता मिळतात. अनेक प्रकारच्या लेन्स आणि आकारातील हे सनग्लासेस लूकला भारी लूक देतात.२. एव्हिएटर - क्लासिकगॉगल्स-चष्मे यांविषयी माहिती नसणाऱ्यालाही एव्हिएटर हा प्रकार माहित आहे. एव्हिएटर म्हटले की, लगेच आठवतो ‘टॉप गन’ सिनेमातील टॉम क्रुझ. युद्ध पायलटच्या युनिफॉर्म व त्यावर एव्हिटर ग्लासेस म्हणूजे अल्टिमेट बॉय फँटसी लूक. विशेष म्हणजे खास पायलट्सकरिताच (विमानचालक) ते ‘बॉश अँड लॉम्ब’ या कंपनीने १९३६ साली तयार केले होते. म्हणून त्यांचे नाव एव्हिएटर. आज तर प्रत्येक सेलिब्रेटी ते घालतात. ३. रेट्रो वेफेरर‘रेट्रो’ या शब्दाभोवती एक वेगळंच ग्लॅमर आहे. कधीच ‘आऊट आॅफ स्टाईल’ न जणाऱ्या रेट्रो लूक मिळवायचा तर वेफरर म्हणजे हमखास नाव. चेहऱ्याची ठेवण कशीही असू द्या, वेफेरर चांगला दिसतोच.४. मिरर फिनिशिंगआजच्या तरुणाईचं फेवरीट आणि सध्याचा ट्रेंड म्हणजे मिरर फिनिशिंग सनग्लासेस. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात ते परिधान केलेले स्टार्स दिसतील. ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’मधील आलिया आणि वरुणचा लूक आठवा. ५. फॅन्सी सनग्लासेसलूक विषयी फारसे प्रयोग न करू पाहणाऱ्यांसाठी किंवा जास्त रिस्क घ्यायची नसेल तर एव्हिएटर आणि वेफेरर बेस्ट आॅप्शन ठरतात. परंतु काही तरी हटके आणि लक्षवेधक करायचे असेल, स्वभावातील बोल्डनेस दाखवायची असेल किंवा फंकी मूड असेल तर फॅन्सी सनग्लासेस घालावेत. ६. ड्राईव्हिंग ग्लासेसबाईक चालवताना तर हे सनग्लासेस वापरलेच पाहिजे. लूक आणि सुरक्षा अशा दोन्ही फायद्यांसाठी ड्राईव्हिंग ग्लासेस खरेदी केलेच पाहिजेत.