शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

फिल्मस्टारचे 2/3 वर्षे जुने चॅट कसे काय लीक होतात? व्हायरल होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:36 IST

फिल्मस्टार व्हॉट्सअॅपच्या चॅटची चर्चा संपूर्ण देशातच जोरात सुरू आहे. कुणालाही सहज प्रश्न पडेल की दोन व्यक्तींमधलं संभाषण असं बाहेर आलं कसं?

ठळक मुद्देसोचो, समझो और जरा संभालके. 

- प्रसाद ताम्हनकर

जगातला सर्वात सुरक्षित मेसेजिंग अॅप, असं व्हॉट्सअॅपचं वर्णन करतात;पण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की फिल्मस्टारचे 2/3 वर्षे जुने चॅट कसे काय लीक होतात? व्हायरल होतात?इतरांच्या हाती कसे पडतात?मुळात म्हणजे आता व्हॉट्सअॅपच्या सुरक्षिततेच्या दाव्यावरतीच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. फिल्मस्टार व्हॉट्सअॅपच्या चॅटची चर्चा संपूर्ण देशातच जोरात सुरू आहे. कुणालाही सहज प्रश्न पडेल की दोन व्यक्तींमधलं संभाषण असं बाहेर आलं कसं?

‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’ ही भक्कम सुरक्षाव्यवस्था जर व्हॉट्सअॅपची आहे तर मग तिस:याला हे सारं, तेही जुनं मिळतं कसं?एंड-टू-एंड एनक्रिप्शन ही तंत्नज्ञानाच्या जगात अत्यंत सुरक्षित आणि खासगी अशी सुरक्षाव्यवस्था मानली जाते. म्हणजे एक प्रकारचं आभासी कुलूप-किल्लीच आहे. या सुरक्षाव्यवस्थेमुळे आपण समोरच्या व्यक्तीला पाठवलेले मेसेज फक्त तोच वाचू शकतो.आपण मेसेज सेंड केला, की जणू एक अदृश्य कुलूप लावूनच तो समोरच्या व्यक्तीकडे पोहोचतो. या कुलपाला उघडायची किल्लीदेखील फक्त त्याच व्यक्तीकडे असते. सुरक्षेच्या कारणास्तव असे मेसेजेस पाठवणारा आणि मिळवणारा हे दोघे सोडले तर इतर कोणीही तो संदेश वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅपदेखील हे मेसेजेस वाचू शकत नाही आणि खासगीपणा जपण्याच्या उद्देश्याने आपण हे मेसेजेस आपल्या सव्र्हरवरती स्टोअरदेखील ठेवत नाही असा व्हॉट्सअॅपचा दावा आहे. मात्न आता जुने व्हॉट्सअॅप चॅट कसे काय बाहेर येत आहेत?आणि प्रश्न असा आहे की व्हॉट्सअॅप खरंच कितपत सुरक्षित आहे? त्यांच्या सुरक्षेच्या बाबत केलेल्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे? म्हणजे हे उघड आहे की व्हॉट्सअॅपच्या सुरक्षाप्रणालीमध्ये प्रचंड गडबड आहे, तसं मत सायबर गुन्हेगारी विषयातील तज्ज्ञ ठामपणो सांगत आहेत. जर व्हॉट्सअॅप यूझर्सचे मेसेज आपल्या सव्र्हरवरती साठवत नाही, तर काही वर्षे जुने व्हॉट्सअॅप संभाषण आता 2क्2क् साली कसे काय समोर आले आहे? आणि जर व्हॉट्सअॅप असे मेसेजेस साठवून ठेवतच नसेल, तर ते आपल्या यूझर्सला डेटा बॅकअपची सुविधा कशी काय प्रदान करू शकत आहेत? असे महत्त्वाचे प्रश्न हे सायबर गुन्हेतज्ज्ञ विचारत आहेत. काही आंतरराष्ट्रीय सायबर विशेषज्ञांच्या मते, कोणीही थर्ड पार्टी ही व्हॉट्सअॅपचे मेसेजेस सहजपणो कायदेशीर किंवा बेकायदेशीर प्रकारे अॅक्सेस करू शकते. अनेक यूझर्स गुगल ड्राइव्हमध्ये आपल्या व्हॉट्सअॅपच्या डेटाचे बॅकअप घेतात. मात्न एकदा गुगल ड्राइव्हवरती हे चॅट बॅकअप घेतले गेले, की त्याची ’एंड-टू-एंड एनक्रिप्शन’ सुरक्षा समाप्त होते हे अनेक यूझर्सला माहितीच नाही. त्यामुळे आपले मेसेजेस गुगल ड्राइव्हवरती सुरक्षित आहेत, अशाच भ्रमात अनेक लोक वावरत असतात.ऐवढेच कशाला, एखादा सामान्य यूझरदेखील व्हॉट्सअॅपच्या ‘रिक्वेस्ट अकाउण्ट इन्फो’ या पर्यायावरती क्लिक करून आठवडय़ाभरात आपला डेटा मिळवू शकतो. आता व्हॉट्सअॅप जर यूझर्सचे मेसेजेस साठवतच नसेल, तर तो हा डेटा कुठून पाठवतो?तो सोचो, समझो और जरा संभालके. 

( प्रसाद विज्ञान/तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहे.)

 

जगातला सर्वात सुरक्षित मेसेजिंग अॅप, असं व्हॉट्सअॅपचं वर्णन करतात; पण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की फिल्मस्टारचे 2/3 वर्षे जुने चॅट कसे काय लीक होतात? व्हायरल होतात? इतरांच्या हाती कसे पडतात? मुळात म्हणजे आता व्हॉट्सअॅपच्या सुरक्षिततेच्या दाव्यावरतीच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. फिल्मस्टार व्हॉट्सअॅपच्या चॅटची चर्चा संपूर्ण देशातच जोरात सुरू आहे. कुणालाही सहज प्रश्न पडेल की दोन व्यक्तींमधलं संभाषण असं बाहेर आलं कसं? ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’ ही भक्कम सुरक्षाव्यवस्था जर व्हॉट्सअॅपची आहे तर मग तिस:याला हे सारं, तेही जुनं मिळतं कसं? एंड-टू-एंड एनक्रिप्शन ही तंत्नज्ञानाच्या जगात अत्यंत सुरक्षित आणि खासगी अशी सुरक्षाव्यवस्था मानली जाते. म्हणजे एक प्रकारचं आभासी कुलूप-किल्लीच आहे. या सुरक्षाव्यवस्थेमुळे आपण समोरच्या व्यक्तीला पाठवलेले मेसेज फक्त तोच वाचू शकतो. आपण मेसेज सेंड केला, की जणू एक अदृश्य कुलूप लावूनच तो समोरच्या व्यक्तीकडे पोहोचतो. या कुलपाला उघडायची किल्लीदेखील फक्त त्याच व्यक्तीकडे असते. सुरक्षेच्या कारणास्तव असे मेसेजेस पाठवणारा आणि मिळवणारा हे दोघे सोडले तर इतर कोणीही तो संदेश वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅपदेखील हे मेसेजेस वाचू शकत नाही आणि खासगीपणा जपण्याच्या उद्देश्याने आपण हे मेसेजेस आपल्या सव्र्हरवरती स्टोअरदेखील ठेवत नाही असा व्हॉट्सअॅपचा दावा आहे. मात्न आता जुने व्हॉट्सअॅप चॅट कसे काय बाहेर येत आहेत? आणि प्रश्न असा आहे की व्हॉट्सअॅप खरंच कितपत सुरक्षित आहे? त्यांच्या सुरक्षेच्या बाबत केलेल्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे? म्हणजे हे उघड आहे की व्हॉट्सअॅपच्या सुरक्षाप्रणालीमध्ये प्रचंड गडबड आहे, तसं मत सायबर गुन्हेगारी विषयातील तज्ज्ञ ठामपणो सांगत आहेत. जर व्हॉट्सअॅप यूझर्सचे मेसेज आपल्या सव्र्हरवरती साठवत नाही, तर काही वर्षे जुने व्हॉट्सअॅप संभाषण आता 2क्2क् साली कसे काय समोर आले आहे? आणि जर व्हॉट्सअॅप असे मेसेजेस साठवून ठेवतच नसेल, तर ते आपल्या यूझर्सला डेटा बॅकअपची सुविधा कशी काय प्रदान करू शकत आहेत? असे महत्त्वाचे प्रश्न हे सायबर गुन्हेतज्ज्ञ विचारत आहेत. काही आंतरराष्ट्रीय सायबर विशेषज्ञांच्या मते, कोणीही थर्ड पार्टी ही व्हॉट्सअॅपचे मेसेजेस सहजपणो कायदेशीर किंवा बेकायदेशीर प्रकारे अॅक्सेस करू शकते. अनेक यूझर्स गुगल ड्राइव्हमध्ये आपल्या व्हॉट्सअॅपच्या डेटाचे बॅकअप घेतात. मात्न एकदा गुगल ड्राइव्हवरती हे चॅट बॅकअप घेतले गेले, की त्याची ’एंड-टू-एंड एनक्रिप्शन’ सुरक्षा समाप्त होते हे अनेक यूझर्सला माहितीच नाही. त्यामुळे आपले मेसेजेस गुगल ड्राइव्हवरती सुरक्षित आहेत, अशाच भ्रमात अनेक लोक वावरत असतात. ऐवढेच कशाला, एखादा सामान्य यूझरदेखील व्हॉट्सअॅपच्या ‘रिक्वेस्ट अकाउण्ट इन्फो’ या पर्यायावरती क्लिक करून आठवडय़ाभरात आपला डेटा मिळवू शकतो. आता व्हॉट्सअॅप जर यूझर्सचे मेसेजेस साठवतच नसेल, तर तो हा डेटा कुठून पाठवतो? तो सोचो, समझो और जरा संभालके. - प्रसाद ताम्हनकर ( प्रसाद विज्ञान/तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहे.)