शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

तुम्ही कसले कंधे, तुम्ही तर चान्समारू

By admin | Updated: August 6, 2015 16:45 IST

फिरवण्यासारखी पोरगी भेटली तर तुमच्यासारखी पोरं ती फिरवल्याशिवाय राहत नाहीत. मग वापरण्यासारखा पोरगा सापडला, तर आजकालच्या पोरी सोडतील का?

मुली मुलांना वापरत नाही, ते स्वत:हून कंधा बनतात, कारण आयुष्यात त्यांना दुसरं काहीच येत नाही असं सांगणारं एका मैत्रिणीचं हे पत्र!
 
प्रिय (सुदैवाने माझ्या नसलेल्या) कंध्यास
खरंतर तुझा माझा संबंध तेव्हाच संपला होता, जेव्हा माझ्या ब्रेकअपनंतर पाचव्याच दिवशी मी तुला झापडलं होतं. ‘‘इट्स माय ब्रेक, माय प्रॉब्लेम, इट्स नन ऑफ युवर बिझीनेस.’’ आणि मग सवयीप्रमाणो ‘तू नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो तू भी चलेगी’ असलं काहीसं करत दुस:याच कुणाच्या मागे मुरळत राहिलास.
हे असे ‘कंधे’ मी बरेच पाहतेय, पाहिलेय आजूबाजूला!
आजकाल म्हणो तुमच्या जमातीला फारच ‘बिचारं’ असल्याचं  फिलिंग येतंय. तुमच्यावर म्हणो अन्याय (?) वगैरे होतोय. मग म्हटलं करूनच टाकावं दुध का दुध आणि पानी का पानी!
तर कंध्यांनो, तुमची मला उमगलेली साधी सरळ व्याख्या म्हणजे ‘चान्समारू’! ओळखीची कोणी रस्त्याने चालत जाताना दिसली की जा तिला सोडायला, भले तुम्हाला उलटा फेरा का पडेना. (भाई! पोरगी बसली ना मागे, अजून काय पाहिजे.) एखादीने चेहरा केविलवाणा करून म्हणावं परीक्षेआधी, ‘माझा अभ्यास नाही झालाय’ की बसले रात्रभर तिच्यासाठी रिव्हीजन मारत!! जिसकी स्टेअरिंग से लेके डिक्की तक और टॉवेल से लेके कंघीतक सब तमाम लडकियों के नाम लिखा हो ना, वो होता है कंधा.
आणि म्हणूनच स्वत:ची गाडी स्वत:च मेन स्टँडवर लावू शकणारी, वर्गात गोल्ड मेडल मिळविणारी, रेडलाईट एरियात सेक्सवर्कर्सच्या मुलांसाठी काम करणारी, उंच उडीत नॅशनल खेळणारी, रस्त्यात कोणी छेड काढली तर दोन कानफटात ठेवून देणारी, तात्पर्य म्हणजे ज्यांना तुमची कवडीमात्रही गरज नाही अशा पोरी तुम्हाला पेलवत नाहीत. आयुष्यातले गंभीर प्रश्नही तुम्हाला झेपत नाहीत, त्यामुळे ‘ब्ल्यू टॉप घेऊ की रेड?’ असले प्रश्न सोडवणं तुम्हाला सोपं जातं, त्याच मुलींचे कंधे होण्यासाठी तुम्ही धडपडतात.
बरं, पोरी खूप साव असतात आणि तुमचा वापर करतच नाहीत असं मला बिलकुल म्हणायचं नाही. उलट तुमचा कंधा करणा:या मुली तुम्हाला पार घुमवतात. साधं लॉजिक आहे. फिरवण्यासारखी पोरगी भेटली तर तुमच्यासारखी पोरं फिरवल्याशिवाय राहत नाही मग वापरण्यासारखा पोरगा सापडला तर आजकालच्या पोरी सोडतील का?
खरं सांगू का, तुमची लायकीच कंधा होण्याची असते. आपल्या  वर्गातील रागिणी आठवते का? कॉलेजची स्टार अॅथलिट, तिला तो तुझा दोस्त कंधा नंबर टू फार आवडायचा. कंधा टू ला पण हे माहीत होतं. एक दोनदा मित्रंनी टोकल्यानंतर काय म्हणाला तो माहितेय ना?
‘‘अबे तिला कधीही रात्री फोन केला की म्हणते झोपायचंय आता, पहाटे पाचला प्रॅक्टीस आहे. आता अशी पोरगी काय कामाची!’’ यावर तुम्ही सगळे कंधावर्गीय प्राणी फिदीफिदी हसला होतात. बिचारा कंधा टू पुढे पुढे त्या हिरोईन राजश्रीच्या बॅगा उचलून उचलून, तिची गाडी ढकलून आणि वेळप्रसंगी तिच्या  बॉयफ्रेंडचा मार खाऊन जगला, मार खाऊन खांदा निखळला त्याचा!
तुमच्यावर हसावं की तुमची कीव करावी हे कळत नाही. एखादीला मान टाकायला कंधा देत असताना दुसरीकडे जी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालू शकेल अशी मुलगी तुमच्या आयुष्यात येऊन निघूनही जाते पण तुम्हाला कळत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. मग आयुष्यभर कंधा बनणंच नशिबी येतं.
काये ना बेटा, मला स्वत:ला दोन वैयक्तिक खांदे आहेत. त्यावर मला स्वत:चं एक डोकं आहे. ज्यात स्वत:चाच मेंदू आहे. आणि माझा मेंदू मला माझे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी वापरता येतो. त्यामुळे प्रश्न तुझा आहे. तू आणि तुङया जातकुळीतले असंख्य काय करणार त्याचा आहे.
ब:याच वर्षापूर्वी माङया आयुष्यातून निघून गेलास ना तेव्हाच सांगणार होते मी, माङया प्रेमाचं काय झालं ह्याची चर्चा नको. स्वत: कोणाच्या तरी प्रेमात पड. नुस्ता खांदा नको बनू. कुणाचा तरी जिवलग, कुणाचा तरी प्रियकर, नवरा, भाऊ बन. हे जमलं तर ‘हॅपी जिंदगी’ नाही तर आपली आहेच ‘कंधागिरी’.
- कंधा म्हणून कुणाचाही, कधीही वापर न करणारी एक मैत्रीण