शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

झगमगीत सिक्विन्स घालताय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:14 IST

ग्लॅमरस किंवा पार्टी लूक देणा-या, सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया चकचकीत सिक्विन्स किंवा ब्लिंगची सध्या मोठी चर्चा आहे.

- श्रुती साठेग्लॅमरस किंवा पार्टी लूक देणा-या, सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया चकचकीत सिक्विन्स किंवा ब्लिंगची सध्या मोठी चर्चा आहे. करिश्मा, करिना या बहिणी आणि मलाईका अरोरा यांनीही अलीकडे ह ब्लिंग वापरलेले दिसतात. गेल्या डिसेंबरपासून खूप ठिकाणी हे ब्लिंग पाहायला मिळत आहे. कपडे, फूटवेअर, ते अगदी नखांच्या सजावटीसाठी त्यांचा वापर सुरेख केलेला दिसतो.तुलनेने महाग असतं हे सिक्विन्स कापड. कपडे बनवायला अतिशय जिकिरीचं असतं. अतिशय बारीक नेट किंवा पातळ कापड - जॉर्जेट, शिफॉन किंवा होजिअरी कापडावर हे सिक्विन्स मशीन किंवा हातानं शिवले जातात. फॅब्रिक ग्लू नं चिकटवलेसुद्धा जातात. सिक्विन्स कापड हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. वापरताना स्टाइलही अतिशय साधी ठेवावी लागते, जेणेकरून हे कापड कापणं व शिवणं सोयीचं जातं. वेलवेटप्रमाणे सिक्विन्ससुद्धा आॅल इन इटसेल्फ असल्यानं याच्यात साधी स्टाइलही लक्षवेधी ठरते.सिक्विन्स टॉप्स आणि ड्रेसेससिक्विन्स टॉप स्लिव्हलेस किंवा छोट्या बाह्यांचे चांगले दिसतात. असे टॉप्स बजेटमध्ये ठेवण्यासाठी पाठीच्या बाजूस मॅचिंग होजिअरी किंवा साजेसं कापड वापरलं जातं. करिना कपूरने नुकताच एका पार्टीसाठी घातलेला सिक्विन्स टॉप सगळ्यांच्या लक्षात राहिला. चकाकी असलेल्या या शर्ट फीट टॉपने अतिशय सोबर; पण ग्लॅमरस लूक दिला.हे ड्रेस खास पार्टीसाठी, इव्हनिंग वेअर म्हणून वापरले जातात. इतर ड्रेसपेक्षा महाग असलेले हे ड्रेस शॉर्ट आणि मॅक्सिलेन्थमध्ये सुरेख दिसतात.जॅकेटसिक्विन्स जॅकेट बेसिक काळ्या आणि आॅफ व्हाइट टॉपवर खुलून दिसतं. झटपट पार्टी रेडी व्हायचं असल्यास सिक्विन्स जॅकेट हा अचूक पर्याय आहे.ग्लिटर नेल्सचमचमत्या हिरेजडित ब्रेसलेट्स, बांगड्या, अंगठ्या यांना मागे टाकत नखांवर सिक्विन्स वर्क तरुण मुलींना चांगलंच आवडू लागलेलं पहायला मिळतंय. परदेशात नखांवर काम करून देणारे नेल आर्ट स्टुडिओ प्रसिद्ध आहेत.पायात चमचमते जोडेसगळ्याच फॅशन फूटवेअर ब्रॅण्डनी स्निकर, वेजेस, सॅण्डल्स, फ्लॅट्स इत्यादी प्रकारात सिक्विन्सचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसतो. असे फूटवेअर कॅज्युअल, तसेच पार्टीवेअरसाठी छान दिसतात.

 

 

टॅग्स :fashionफॅशन