शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पोरं प्रेमात पडतात, तेव्हा काय मॅटर होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 07:05 IST

थोडी लालूच दाखवलं की पार खुळे होतात पोरं़ आणि त्यातून प्रत्येकाच्या हातात मोबाइल. त्यातल्या त्या बिप्या! 30 मिनिटे बिप्या पाहिल्यानंतर सहज पापण्या पडल्या तरी समोर काय काय दिसतं. लय किचाट पोरांच्या डोक्यात!

ठळक मुद्दे सुंदर मुलीसाठी पोरं पार वेडे होतात़ तिला जसं आवडेल तसंच राहातात़

- साहेबराव नरसाळे

अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्टॅण्ड़ पोरांचा एक जथा वांबोरी बसभोवती पिंगा घालतो़  या खिडकीतून डोकाव, त्या खिडकीतून पहाय़़  असं त्यांचं चाललेलं़; पण ‘ती’ काही सापडत नाही़  शेवटी निराश होऊन सर्वजण बस स्टॅण्डच्या बाकडय़ांवर पाय दुमडून बसतात़ मित्राला चिडवायला लागतात़ ‘तुला गुंगारा देऊन ती उडाली भुर्ऱ  तू बस इथंच घिरटय़ा घालत़़  किती दिवस असं शेळपाटासारखं वागणाऱ’तो पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणारा़  आई-बाप दोघेही नोकरदाऱ शिडशिडीत देहयष्टीचा़ दिसायलाही काळासावळा़  तो शहरी अन् ती खेडूत़; पण दिसायला सुंदर,़  शहराला रुळलेली़  शिक्षणासाठी ती रोज बसने येत होती़  कॉलेज सुटल्यावर हा तिचा पाठलाग करीत थेट तिच्या गावार्पयत जायचा़  बसमध्ये त्यांचं गॉटमॅट जुळलं़  बर्‍याच दिवस टिकलंही़  रोज दोघे कॉलेज सुटल्यावर हॉटेलमध्ये जेवायच़े  रोज नवी चव तिच्या जिभेवर रेंगाळायची़  त्याच्या पैशावर ती वाटेल ती हौस पूर्ण करायची़  त्याच्या महागडय़ा गाडीवरचा वेगाचा थरार तिला हवाहवासा वाटायचा़  तिचा रोजचा खर्च वाढतच चाललेला़  आई-बाप पैसे द्यायला कानकूस करू लागल़े  मित्रांची उधारीही डोईजड झाली़  शेवटी तो किटूकमाटूक चोर्‍या करायला लागला़  नंतर दुचाकी चोरीर्पयत त्याची मजल गेली़  काही चोर्‍या त्याला पचल्या़ शेवटी पोलिसांचे हात त्याच्यार्पयत पोहोचलेच; त्याला अटक झाली़ आई-बापांना कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागल्या़  काही दिवसांनी कोर्टातून जामीन मिळाला़  थोडे दिवस तो शांत राहिला; पण शारीरिक घुसमट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती़  पुन्हा तो बस स्टँडवर घिरटय़ा घालायला लागला़  रोज बस स्टँडवर त्याच्या वार्‍या होऊ लागल्या; पण ती काही सापडत नव्हती़  कंटाळून तो घरी जायचा कधीतरी ती सापडेल या आशेऩे रोजच्यासारखा तो आजही कंटाळून घरी गेला़  तो गेल्यानंतर काहीवेळातच ती आली़  त्याच्याच मित्रासह. प्रेमात पोरांचं काय होतं कधीकधी याच्या कहाण्या सांगणारा एक तरुण दोस्त मला सांगत होता, ही ‘त्या’ एकाची गोष्ट.दुसरा एक म्हणाला, ‘माझं नाव नको छापू; पण आपण स्वतर्‍च्या एक्सपिरिअन्सने सांगतो. पोरी भलत्या स्मार्ट. प्रेमाचं थ्रिल अनुभवायला, माफक ‘मजेला’ ना नसते त्यांची. त्यांना कळून चुकलंय की थोडं लालूच दाखवलं की पार खुळे होतात पोरं़  भाव तर देतातच काही येडे मोबाइल सीम आणि रिचार्जही मारून देतात. शायनिंग मारता येते आणि बोलता येतं तिच्याशी म्हणून हॉटेलात नेऊन जेवूखाऊ घालतात. पैशापायी काही शिडशिडे किडे तुरुंगवारीही करून येतात!’दुसरा एक तरुण सांगतो, ‘पोरं पोरींच्या मागं लागतात़ हे खरंय. ती नाही म्हटली की नको ते घडून जातं़ हे पण खरंय; पण सापडले की मार पोरांनाच बसतो नि लोकं पार जातीपाती शोधत हाणतात ते येगळंच!’ ***********नगरमधील एक महाविद्यालय़ कट्टय़ावर पोरांचा घोळका़ अकरावी-बारावीची पोरं़ एकाच मोबाइलमध्ये डोकावून सारे काहीतरी पाहत होत़े आम्ही तेथे गेलो तर घपकन मोबाइल बंद़ सारे कावरेबावरे होऊन पहायला लागल़े आम्ही तेथून थोडे पुढे आलो तर पुन्हा ते मोबाइलमध्ये गुंग झाल़े पोरांच्या हातातून मोबाइल पहिला काढला पाहिज़े - माझ्यासोबत असलेला मित्र बोलला़ कॉलेजात भेटलेल्या एका कॉलेजकुमाराशी या विषयावर बोलणं झालं. त्यातला एक सांगत होता, मोबाइलनं सगळं वाटूळं करून ठेवलंय़ यांना जवळपास फुकटातच नेट पॅक मिळतो़ मग ही साइट ती साइट़ सोशल मीडिया़ यातून या पोरांचे मेंदू पार कावलेत़ हाती काहीच लागत नाही़ नुसती फॉरवर्डची ढकलगाडी खेळायला म्हणूनच मोबाइल वापरतात़ या मोबाइलमधून थेट गावातल्या झोपडीर्पयत बिप्यांचा साठा झिरपत जातो़ काहींनी त्यासाठी वेगळं मेमरीकार्डच केलेलं़ मग थोडा एकांत मिळाला की असे मोबाइलमध्ये डोके अडकून शरीर आक्रसून बसतात़ मग सुरू होते मोबाइलमधल्या त्या बाईशी कॉलेजातल्या पोरींची तुलना़ हिची साइज अशी़, तिची तशी़  या बिप्यांनी पोरांच्या डोक्यात पार किचाट झालाय़  कोणतीही पोरगी पाहिली की तिच्याकडे फक्त सेक्स टॉइज म्हणूनच हे पोरं पाहतात़  तेवढय़ात दुसरा एकजण म्हणाला, ‘30 मिनिटे बिप्या पाहिल्या आणि नंतर सहज पापण्या पडल्या तरी समोर काय काय दिसतं. मोबाइलने खटक्यांचं प्रमाण लई वाढलंय.खटके म्हणजे असं विचारलं तर म्हणाला,  मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आलंय़ फेसबुक आलंय़ त्याच्यावर पोरी त्यांचे वेगवेगळे फोटो टाकतात़ पोरं ते फोटो पाहत बसतात़ तिचा सगळा अंदाज लावतात़ आणि मग एखाद्या दिवशी हळूच एक मेसेज पाठवतात़ त्याला उत्तर आलं की सुरू होतं चॅटिंग़ मग व्हिडीओ कॉल़ मग प्रपोज आणि नंतर पुढचं बरंच काही़ दुसर्‍या कुणी मित्रानं हे पाहिलं की त्यावरून राडे. लै किचाट होतोय.**********आजच्या पोरांना भावना, प्रेम, शारीरिक आकर्षण यात फरक करता येत नाही़, अशी चर्चा असते. तरुण मुलांशी बोललो आणि विचारलं की तुला जी मुलगी आवडते ती का आवडते?तर उत्तर एकच, ती दिसायला भारी आह़े गोरी आह़े  बाकी तिचे गुण, कौशल्य, हुशारी असं काहीच न पाहता फक्त दिसणं त्यांना आवडतं़ म्हणजेच हे शारिरीक आकर्षण असतं़ मग तिला गठवणं हेच थ्रिल वाटतं. या ‘थ्रिल’चा कीडा जसा पोरांना चावतो. त्यातून प्रेमप्रकरण जमतं. फिरणं सर्रास होतं; पण समजा भांडं फुटलं, नको तो घोळ झाला, मारझोड झालीच, घरच्यांनी विरोध केला आणि आर या पार करण्याची वेळ आली की मात्र अनेक पोरी पलटतात. लपतात आईबापाच्या पदराआड असं अनेक मुलं सांगतात. त्याच्या बर्‍याच कहाण्या आहेत, त्यांच्याकडे. पोरगा मात्र मार खातो आणि असेल नसेल ती लायकीही गमावून बसतो़ प्रसंगी पोलीस लॉकअपमध्ये जातो़ मुलीनच फसवलं ही मनातली गाठ वाढत जात़े रागाचा पारा चढत जातो़ नियंत्रण सुटतं़ त्यातून होणारा राडा वेगळाच़ 

(साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़े)