शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

काय आहे करिअरचं  नवं गुगल ++ मॉडेल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:24 IST

काही दिवसांनी मुलंच शिक्षकांना विचारतील, गुगलवर जे नाही, ते तुम्ही शिकवता का? स्वतंत्र विचार, अॅप्लिकेशन आणि अनुभव या तिघांचा मेळ घातला तर कोरोनोत्तर काळात ‘टिकाल!’

ठळक मुद्देनव्या शिक्षणधोरणासह या नव्या सूत्रचा हात धरणंही का आवश्यक आहे?

-डॉ. भूषण केळकर

मायक्रोसॉफ्टचा सीईओ आणि गुगलचा सीईओ भारतीय आहे; पण मायक्रोसॉफ्ट/गुगल भारतात तयार होत नाहीत, असं का?- हा चिरंतन प्रश्न. चावून चावून चोथा झालेला प्रश्न.आपण या प्रश्नाकडे संवादाच्या शेवटी येऊ ;पण मी जेव्हा करिअर समुपदेशनाच्या वेळी असं सांगतो की, अमेरिकेत तुम्हाला मुख्य पदवी जीवशास्नत करतानाच मायनर म्हणजे दुय्यम पदवी ही चित्रकलेत मिळू शकते तेव्हा आपल्या पालकांचा त्यावर विश्वास बसत नाही. मला खात्री आहे की, भारतीय विद्यापीठात विज्ञान, कला, वाणिज्य अशा साचेबद्ध विचारांचीच सवय आहे, त्यामुळे हे ऐकून कुणाला भोवळ आली तर कांदाही आणावा लागेल. वर्षानुवर्षे झापडं लावून विचार करण्याची ही सवय आहे.माझा मुलगा अमेरिकेत शिकत असतानाचं उदाहरण, चार वर्षाची पदवी असताना तो तिस:या वर्षाच्या सुरुवातीलाच भौतिकशास्नकडून संगणक अभियांत्रिकीला जाऊ शकला असता, सहज.आता जाहीर झालेले नवे शैक्षणिक धोरण यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे, तरलता, तो स्वागतार्ह आहे.बोर्डाचे महत्त्व कमी करून, कला-वाणिज्य-विज्ञान यातील आवडते विषय मुलांना शिकता येणं ही चांगली कल्पना आहे. कारण मानवी मेंदू काही कला-वाणिज्य-शास्र अशा साचेबद्ध प्रकारचे काम करू शकतो, घोका-ओका, एकवीस अपेक्षितवर सारं निभावतं या गृहीतकालाच हे धोरण गदागदा हलवणार आहे.नव्या शैक्षणिक धोरणात इंटरडिसिप्लीनरी म्हणजे बहुविद्याशाखीय अशा शिक्षणाबरोबरच एक महत्त्वाचा भाग आहे मल्टिपल एण्ट्री व एक्ङिाट आणि क्रेडिट बॅँक पद्धत.परवाच समुपदेशनाला आलेले एक मध्यमवर्गीय जोडपे. मुलगा इंजिनिअरिंगच्या दुस:या वर्षात तिस:यांदा ‘बसला’. घरात अर्थातच प्रचंड तणाव. ते म्हणत होते, आम्ही त्याला सांगतोय की वर्ष वाया घालवण्यापेक्षा कसातरी हो, इंजिनिअर मग काय ते मॅनेजमेण्टचं बघ.-आता नव्या धोरणाचा विचार केला तर अशा प्रसंगी काय होऊ शकेल?चार वर्षाच्या इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण करून हा मुलगा त्या दोन वर्षाचे क्रेडिट घेईल, अॅडव्हान्स डिप्लोमा होऊन बाहेर पडेल. आणि त्याचं मॅनेजमेण्ट करू शकेल, - सन्मानाने.आताच्या पद्धतीत तो बाहेर पडला तर बारावीपासून सुरुवात, सोबत नैराश्य आणि तणाव.इंडस्ट्री 4.क् आणि कोरोनोत्तर जगात आपल्या आता गुगल प्लस प्लस असावं लागेल.शिक्षकांनाही गुगलपेक्षा अधिक काहीतरी वर्गात द्यावं लागेल. नाहीतर मुलंच म्हणतील, गुगलवर अमुक आहे मग आम्हाला तुमची गरज काय?आता हे गुगल प्लस प्लस होणं म्हणजे काय?स्वतंत्र विचार, उपयोजित (अप्लाइड) व अनुभवसिद्ध (एक्सपेरिएन्शल) पद्धतीने ज्ञानग्रहण यामुळे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया हे ख:या अर्थाने वेग पकडतील. अन्य देशात बनलेले सुटे भाग भारतात असेम्बल करणं म्हणजे आत्मनिर्भर भारत नव्हे.एक चांगली गोष्ट म्हणजे व्होकेशनल कोर्सेसना नव्या धोरणात चांगलं महत्त्व देण्यात आलं आहे.सर्व प्रगत राष्ट्रांत वेल्डर, सुतारकाम, प्लबिंग यांना मान आहे. श्रमाचा मान राखणारी व्यवस्था उभी राहणं गरजेचं आहे. म्हणूनच व्होकेशनल कोर्सेसना अनावश्यक जोखडातून हे नवीन धोरण मुक्त करणारं आहे, ते स्वागतार्ह आहे.या नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात एक सभा पुण्यात झाली होती. आमंत्रणानुसार मी गेलो होतो. तेव्हा स्वत: डॉ. कस्तुरीरंगन व डॉ. वसुधा कामत यांनी या नव्या धोरणाचं वर्णन ‘लाइट बट टाइट’ असं केलं होतं.नोकरी शोधणारे आणि मागणारे बनवण्यापेक्षा नोक:या तयार करणारे असे उद्योजक/स्वयंरोजगारपूरक निर्मिती करणं हे महत्त्वाचं आहे.एक उदाहरण सांगतो, एक माणूस आपली हरवलेली अंगठी शोधत असतो. तेवढय़ात दुसरा येतो, तो विचारतो काय झालं? हा सांगतो, माझी अंगठी हरवली, मागच्या चौकात?मग तो म्हणतो, मागच्या चौकात हरवली तर तुम्ही या चौकात का शोधताय?तर पहिला म्हणतो, कारण तिथं अंधार आहे, इथं प्रकाश आहे म्हणून इथं शोधतोय.गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट भारतात का तयार होत नाही याचं उत्तर सांगणारी अंगठी अशी भलत्याच चौकात हरवली, आपण भलतीकडेच शोधत राहिलो आजवर!

मल्टिडिसिप्लीनरी शिक्षणाची गरज काय?

जेव्हा तुम्ही असे शिक्षण घेता, एक प्रमुख डिग्री, दुसरी दुय्यम तेव्हा ते शिक्षण एखाद्या विषयातील ज्ञानापुरते मर्यादित राहत नाही. ते बहुआयामी बनते. त्यातून शिकणा:याची एम्प्लॉयबिलीटी वाढते.पुढील शिक्षण, रोजगार, नोकरी, स्वयंरोजगार यासाठी तुम्ही अधिक सक्षम होता.पुढे भविष्यातही एका प्रकारच्या नोकरी, व्यवसायातून दुस:या प्रकारच्या नोकरी व्यवसायात सहज जाऊ शकता.कोरोनानंतरच्या काळात या लवचिकतेला फार महत्त्व येईल. ज्याला गिग इकॉनामी म्हणतात. म्हणजे प्रोजेक्टवर काम करण्याची पद्धत. परमनंट नोकरी, कायम हाताला काम लक्षणीयरीत्या कमी होता जाईल.अशा परिस्थितीत जर बहुआयामी शिक्षण असेल त्याचा उपयोग होईल, महत्त्व वाढेल.

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)