आधी देशाच्या पंतप्रधानांनी विचारला होता, आता ऑक्सिजनची टीम विचारते आहे!
वयात आली की मुलीला म्हणता,
सातच्या आत घरी ये..
तिला विचारता, कुठे जातेस?
काय करतेस?
पण कधी तुमच्या मुलग्यांना
विचारता का, की
कुठे जातोस? काय करतोस? कुणाबरोबर असतोस? का असतोस?
बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करणारे,
शस्त्र उचलून टोळ्यांमध्ये शिरणारे
कुणाचे तरी मुलगेच असतात ना??
त्यांची पावलं वाकड्या वाटेला जातात, याला जबाबदार कोण?’
- १५ ऑगस्टला
लाल किल्ल्यावरून भाषण करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
देशभरातल्या आईबाबांना
विचारलेला हा प्रश्न.
- तो फार गंभीर आहे!
मध्यमवर्गीय घरातली,
सुरक्षित वातावरणात वाढलेली
अनेक तरुण मुलं
गंभीर गुन्ह्यात पोलिसांच्या
हाती लागू लागली आहेत.
का वळतात त्यांची पावलं
गुन्हेगारीच्या आत्मघाती मार्गाकडे?
कोण आहे त्याला जबाबदार?
- एक शोध!
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com