शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आयटीत काय करतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:09 IST

आयटीत काम करणारे ७० टक्के इंजिनिअर अन्य शाखांचे आहेत. डिग्री कुठलीही असो, टामटूम प्रशिक्षण देऊन कंपन्या त्यांना कामाला लावतात आणि तरुण इंजिनिअर ही नोकरी करतात. कशासाठी? - पैशासाठी!!

डिग्री ‘इकडची’ जॉब ‘तिकडचा’ 

इंजिनिअरिंग झालं.कॅम्पस सुरू झाले की सगळ्यात जास्त नोकºया कुणाला मिळतात? आणि नोकºयांसोबतच चांगली पॅकेजेस कुणाला मिळतात?- हा प्रश्न इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये कुणालाही विचारा, उत्तर एकच- कॉम्प्युटर आणि आयटी. या इंजिनिअर्सना चटकन नोकºया मिळतात. त्याखालोखाल मेकॅनिकल आणि मग इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन यांसह अन्य शाखांचा नंबर लागतो.आयटी-कॉम्प्युटर सोडून बाकीच्या इंजिनिअर्सना कोण नोकºया देतं?उत्तर शोधलं तर आयटी क्षेत्रात सध्या काम करत असणाºया इंजिनिअर्सपैकी अनेक जण हे कॉम्प्युटर किंवा आयटीव्यतिरिक्त इतर शाखांचे इंजिनिअर आहेत. काही अनुभवी लोकांच्या मते त्यांची संख्या ७० टक्क्यांहून अधिक आहे.मेकॅनिकल केलं तर आयटीत काय करतो, असा जाब विचारून या मुलांना निरुत्तर करणं सहज शक्य आहे. पण आयती चालत आलेली उत्तम पगाराची नोकरी ही मुलं का नाकारतील, हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. दुसरा मुद्दा म्हणजे, चार वर्षं घालवून घेतलेल्या पदवी शिक्षणाचा फोलपणाही त्यामुळे ठळकपणे अधोरेखित होतो.शिकताना महत्त्वाची वर्षं एका विशिष्ट शाखेचा अभ्यास करण्यात घालवल्यानंतर पूर्णपणे वेगळ्याच शाखेशी निगडित विषयात निवडलेली नोकरी, त्या शाखेबद्दलची आवड, त्याच्या निवडीमागचे विचार, ही नोकरी करण्यामागची कारणं, ती केल्याने मिळणारं समाधान या सगळ्याच बाबतीत प्रश्न उपस्थित करते.बाकी शाखांमध्ये एवढ्या नोकºया उपलब्ध नाहीत का? असतील तर त्या आयटीइतके पॅकेज देत नाहीत का? - हे प्रश्नही आहेतच. दुसरीकडे यशस्वी इंजिनिअर कोण? जो चांगले पैसे कमावतो तो, हे आपल्या समाजानं तयार केलेलं समीकरण. या साºयातून इंजिनिअर्स मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राकडे आकृष्ट होतात. गेल्या दोन दशकात, विशेषत: जागतिकीकरणानंतर लोकांच्या मनात संपत्ती, यश आणि त्यातून मिळणारी स्थिरता याबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यात आयटी क्षेत्र इतर उद्योगांच्या तुलनेने सर्वाधिक यशस्वी ठरलं. त्यामुळे इतर शाखांमधील अभियंत्यांचादेखील ओढा या क्षेत्राकडे वाढत गेला; मात्र आता याच क्षेत्रापुढे संकटांचा डोंगर उभा राहिल्याचं चित्र दिसतं आहे. आणि त्यामुळे, कुठलीही डिग्री घेऊन जेमतेम इंजिनिअर झालेले पुढे काय करतील, असा एक मोठा प्रश्न इंजिनिअरिंग क्षेत्रापुढे येऊन उभा ठाकला आहे.दुसरीकडे, आयटीत आॅटोमेशन आल्यानं आता त्यांना या जेमतेम डिग्री इंजिनिअर्सचीही गरज उरलेली नाही. त्यामुळे लोंढा भरती आता थांबू शकते. प्रश्न मात्र तसाच आहे की, प्रचंड प्रमाणात इंजिनिअर तयार करणारी व्यवस्था आता एवढ्या इंजिनिअर्सचं करणार काय?त्यात इंजिनिअर झालेल्यांनाही सरसकट सगळीकडे नोकºया उपलब्ध आहेत असं नाही. शहराशहरांगणीक नोकरीच्या संधी बदलतात. मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई या पाच महत्त्वाच्या शहरांत नोकºयांच्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत. आणि देशभर सर्वत्र पसरलेली अभियांत्रिकी महाविद्यालयं मात्र मुबलक आहेत. या महाविद्यालयांमधून मिळणाºया शिक्षणाच्या दर्जाविषयीची परिस्थितीदेखील काळजी करण्यासारखी आहे. 'अ२स्र्र१्रल्लॅ े्रल्ल२ि' नावाच्या दिल्लीस्थित एका संस्थेने मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार जेमतेम सात टक्के विद्यार्थी हे मूलभूत अभियांत्रिकी नोकरीसाठी म्हणजेच खºया अर्थानं इंजिनिअर म्हणून काम करण्याच्या लायक आहेत. इंजिनिअर म्हणून संख्यात्मक वाढ चिक्कार असली, तरी इंजिनिअर म्हणून काम करण्याची कौशल्यं मात्र अत्यंत तुरळक आहेत. इंजिनिअरिंग शिक्षणाची दुर्दशा मोठी आहे ही चिंता तर हल्ली सतत वाहिली जातेच, त्याचंच हे एक मोठं ठळक चित्र आहे.राजकीय आणि आर्थिक हेतूंनी गावोगावी उघडलेली इंजिनिअरिंग महाविद्यालये, त्यात गुणवत्तेकडे होत असलेलं दुर्लक्ष, शिक्षणासाठी आवश्यक उपकरणांची वानवा, सोयीसुविधांचा अभाव या सगळ्याच गोष्टी सर्वत्र सर्रास दिसतात. या महाविद्यालयांतून शिकवणाºया शिक्षकांचा दर्जा, त्यांचं ज्ञान हा तर संपूर्ण वेगळ्याच चर्चेचा विषय. दोष केवळ महाविद्यालयांचा नाही, तर तो एकूणच अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीचा आहे. काळानुरूप न बदललेले अभ्यासक्र म, प्रात्यक्षिकांपेक्षा लेखी अभ्यासावर असलेला अधिक भर या सगळ्यातून उद्योगविश्वाला असलेल्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून पूर्ण होत नाहीत. अभ्यासक्र मात अजूनही जुन्या मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव आहे याकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं ठरवलं तरी अवघडच; कारण मुलांच्या मूलभूत संकल्पनाही कच्च्या आहेत, ही तक्र ार जवळपास सर्वच शाखांत कायम. मूलभूत ज्ञानाचा आणि नावीन्याचा अभाव विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी नोकरीसाठीच्या मर्यादा स्पष्ट करतात. त्यातूनच चांगली नोकरी मिळण्याच्या अडचणी निर्माण होतात. पण शिक्षण पद्धती, महाविद्यालयं यांच्या चुकांवर बोट ठेवतानाच दुसरीकडे या मुलांसमोर असतो माहितीचा महासागर. मोबाइलवर सगळी माहिती उपलब्ध असतानाही आपल्याच इंजिनिअरिंगच्या शाखेत काय नवीन घडतं आहे, जग कसं बदलतं आहे हे अनेक मुलांना कळतही नाही.इंजिनिअर झाल्यावरच काहींना एकदम जाग येते की, आपल्याला तर काहीच येत नाही. आपल्याला आपलं इंजिनिअरिंगही धड कळलेलं नाही.आणि मग इंजिनिअर होऊन कुठंतरी चिकटणं किंवा काहीतरी टामटूम कोर्स करत राहणं एवढंच अनेकांच्या वाट्याला येतं.

१. अन्य ब्रॅँचला भाव नाही हे कुणी ठरवलं?

२. पाच आकडी पगार ही चांगला इंजिनिअरअसल्याची खूण आहे का?

३. पाच वर्षे ज्या शाखेत शिक्षण घेतलं,त्यातलं काहीच इंजिनिअरला येऊ नयेअसं का होतंय?

४. गल्लीतल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपण काय मिळवणार, विचारा स्वत:ला!

भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प सध्या चर्चेत आहे. येत्या पाच वर्षांच्या काळात उत्पादन क्षेत्रात नव्या दहा कोटी नोकºयांच्या संधी उपलब्ध होतील असं सरकारचं म्हणणं आहे. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्र मांतून आणखी संधी उपलब्ध होतील असे दावे केले जातात.खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात नोकºया उपलब्ध होतील का? हा वादाचा मुद्दा असला तरी संधी उपलब्ध होतील हे नक्की. कारण उत्पादन क्षेत्र वाढलं तर त्यातून सर्वच अभियांत्रिकी शाखांना नव्या संधी मिळतील अशी आशा आहे. मात्र त्या संधी स्वीकारण्याची इंजिनिअर्सची तरी तयारी आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उद्योगांची वाढ ही एकमेकांच्या साहाय्याने होत असते. एका उद्योगाच्या गरजेतून बाकी इतर उद्योग उभे राहत असतात. ही प्रक्रि या पुढे चालत राहते. त्यामुळे नव्या नोकºया निर्माण करण्याची जबाबदारी चांगल्या अभियंत्यांच्या जोरावर हे उद्योगच पार पाडू शकतात. फक्त प्रश्न उरतो एवढाच की, असे मूलभूत ज्ञानाने परिपूर्ण, नावीन्याची आस असलेले, प्रयोगशील, ‘चांगले अभियंते’ आपल्याकडे आहेत का?- दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर फारसं आशादायक नाही!