शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

नात्यातील ग्रॅव्हिटीचा फोर्स काय सांगतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST

सहा महिने झाले नात्याला. नीट गणित मांडून आपण एकत्र राहिलो. पण त्या एकत्र राहण्याचं गणित जुळतंय का?

-श्रुती मधुदीप

‘‘किती वेळ शांत बसणार आहोत आपण अरे ?’’ अखेर पंधरा मिनिटांच्या शांततेचा तिनं भंग केला. आज त्या दोघांच्या नात्याला सहा महिने पूर्ण झाले होते म्हणून ते भेटले होते; पण पहिल्या पंधरा मिनिटांचं म्हणणं काहीतरी वेगळंच होतं बहुतेक. 

‘‘अं. तसं नाही काही. ते. आपली ऑर्डर येतेय ना म्हणून.’’ तो हे वाक्य बोलला आणि  त्याच्या लक्षात आलं की बोलण्याचा आणि ऑर्डर येण्याचा काही एक संबंध नाहीये. आपण उगाच काहीही बरळतोय, हे जाणवून त्यानं त्याची नजर खाली घेतली. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या हातातल्या गाडीच्या चावीसोबत ती नकळत चाळे करू लागली. 

‘‘मग, काय करायचं आता ?’’ तो अस्वस्थ होऊन म्हणाला. ‘‘तू सांग.’’ ती म्हणाली. ‘‘नाही म्हणजे, शूड वी गो अहेड ऑर नॉट ?’’त्याने एका घोटात विचारलं. ‘‘तुला काय वाटतं ?’’ तिने आपल्या कोर्टात आलेल्या बॉलला त्याच्याकडे भिरकावला. ‘‘पहिल्यांदा तू सांग, प्लीज’’ तो म्हणाला.हतबलतेने तिने तो प्रश्न स्वीकारला आणि  म्हणाली,‘‘संजू!’’ तिने  त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिला स्वत:च्या डोळ्यांची भीतीच वाटली. डोळे खरं बोलले तर म्हणून तिने तिची नजर खाली घेतली. ‘‘हे बघ, मला काहीही चालणारे. माझा काही तुला किंवा कुणालाच कसलाच फोर्स नाहीय. आपण आपल्या स्वत:चा निर्णय घेऊ शकतो.’’ ती म्हणाली. 

‘‘अगं हो, पण तुझं मत काय आहे ? आपल्या नात्याला सहा महिने पूर्ण झालेत. आपण ठरवलं होतं तसं आपल्या नात्याचं सहा महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालंय. आता आपण पुढं जायचं की नाही म्हणजे पुढच्या काही महिन्यांचं किंवा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट.’’ असं म्हणून तो थांबला. काही वेळ तीदेखील काहीच बोलली नाही. ‘‘म्हणजे जो काही निर्णय घ्यायचाय तो आपल्या हातात आहे. सो तू बोल प्लीज’’ तो म्हणाला. ‘‘हे बघ संजू. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, माझा काही आग्रह नाहीय. तुला तुझा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. वी आर लिबरल बडीज! स्वतंत्र लोक आहोत आपण. आपण एकमेकांच्या आड कशाला यावं ! तू सांग, पुढे जायचं की नाही ?’’ ती म्हणाली. 

‘‘माझा तरी फोर्स का असेल गं तुला ? आपण एकमेकांना आवडलो. सोबत सहा महिने राहून बघूया म्हटलं. आपल्या प्रायव्हेट स्पेसला एकमेकांचा धक्का न लागू देण्याचं कॉण्ट्रॅक्ट केलं. तू कधी उगाच माझ्या वेळेत आड आली नाहीस, कधी मी तुझा फोन चेक केला नाही. कधी माझ्या बाकी मैत्रिणींविषयी तू विचारलं नाहीस, कधी मी तुला तू कुठे जातेस म्हणून शंका घेतली नाही. सगळं काही मस्त सेट केलं आपण. आजही आवडतेसच तू मला.’’  तो म्हणाला. ‘‘हो आपण नेहमी आपली लिबर्टी जपत आलोय, हे खरंच छान आहे. उगाचच बाकी मुलींसारखं कधीही, कुठेही, तासन्तास बोलत बसले नाही मी तुझ्याशी कधी. ना कधी खूप गिफ्ट्सची अपेक्षा केली. सगळं काही कसं ठरलेल्या वेळेत ठरलेल्या मापात! कॅल्क्युलेटिव्ह! सेट ! खरंच माझा फिजिक्स स्पेशल असणं आणि तुझं गणित हेदेखील किती मिळतंजुळतं या सगळ्याशी !’’ ती बोलत गेली.

‘‘हं. पण तुला मी आवडतो की नाही आज? सहा महिन्यांनंतर?’’ त्याने अचानक प्रश्न केला. काही वेळ ती शांत राह्यली. तो अस्वस्थ झाला. 

‘‘हो’’ इतकंच म्हणाली ती काही वेळाने. त्याच्या चेह-यावर किंचित हसू उमटलं. पण त्या हसूमधेही काहीतरी अधुरं, अपुरं वाटतं राह्यलं. ‘‘मग ? करूया पुढचं कॉन्ट्रॅक्ट’’ इतक्यात त्याला तोडत ती त्याला म्हणाली,

‘‘खरं सांगू संजू! पण तुला फिजिक्सपल्याडची मी माहीत नाहीय.’’ तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ‘‘न्यूटनचा लॉ, ह्याचा लॉ-त्याचा लॉ त्यापल्याडही खूप गणितं आहेत जी तुला माहीत नाहीयेत संजू. तुला आवडणारी मी, ती नाहीय. त्यापल्याडही मी खूप काही आहे’’ तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर घरंगळत आलं. तो तिच्याकडे पहात राह्यला. काय करावं त्याला सुचेना. 

‘‘ही अशी रडणारी मी माहीत आहे का तुला ?’’ तो तिच्याकडे अवाक् होऊन पाहू लागला. ‘‘हो! मला माहीतेय, तुझी जाण्याची वेळ आता झालीय. आपलं फक्त एक तास भेटायचं असंच ठरलं होतं.  ती वेळ आता होईलच, तू जावंसं तुझी वेळ झाली तर. तुझ्या जाण्याच्या वाटेत मी येणार, हे निश्चित! इतकंच माझं म्हणणं आहे. आणि माझ्याही वाटेत तू येणार नाहीस याचीही मला पूर्ण कल्पना आहे. आपल्याला माहितेय रे हे जगणं कसलं कॉम्प्लिकेटेड आहे ते. साला! कोण कुणाच्या आड येत नाही..’तो तिच्याकडे आ वासून पाहत होता. पाहत राहिला काही वेळ.‘‘काय रे? असं काय बघतोयस ?’’ जणू काहीच झालं नाही असं बोलली ती.‘‘काही नाही. इतकंच सांगायचं होतं की गणित स्पेशल असला तरी गणिताच्या आकड्यांपल्याड तुझ्या डोळ्यातले पाण्याचं गणित मांडता येत नाहीये मला.’’ तो म्हणाला. 

‘‘प्रेमात पडलास काय माझ्या? असं काय बोलायला लागलास तू एकदम! हे बघ आपलं ठरलंय  force of gravity = GMm/d square.   ‘जी’ची किंमत काय आहे आपल्याला माहीतेय. आपण क्लीअर आहोत एकदम !  डोळ्यातलं पाणी वगैरे काही नाही. चल कॉफी घे.  निघूया आपापल्या वाटेने.’’ ती. त्याने कॉफीच्या मगाकडे पाहिलं आणि म्हणाला.

‘‘प्रिया, तुझ्यासोबत राहायचंय मला विदाउट एनी कॉन्ट्रॅक्ट. तुझ्या डोळ्यात येणार्‍या ह्या पाण्यामागचा सगळा इतिहास समजून घ्यायचाय. तू हवीयेस मला माझ्या वाटेत येऊन धडकणारी, मला ‘थांब ना. नको जाऊस’’ असं म्हणाणारी. तासन्तास गप्पा मारणारी. मला आपल्या सोबत असण्याचा एक वेगळा फॉम्र्युला तयार करायचाय’’ त्याच्या अंगावर शहारे उमटले. तिलाही अचानक थंडी वाजली. आणि  ती प्रचंड रडू लागली. त्याने तिचे डोळे पुसले आणि थंड झालेली कॉफी आता त्यांना आणखीनच टेस्टी लागली.