शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

जिनिअसच्या गबाळ्या कपडय़ांचं काय?

By admin | Updated: April 16, 2015 17:04 IST

सध्या एक व्हिडीओ कार्पोरेट जगात व्हायरल आहे! त्याचं नाव आहे, ‘व्हाट यू रिअली सेइंग विथ युवर क्लोथ्स’! कार्पोरेट जगात म्हणजे आपल्याच नाहीतर सगळीकडच्याच कार्पोरेट ऑफिसेसमध्ये अशी चर्चा आहे की, हा व्हिडीओ म्हणजे आपल्या ऑफिसात असलेल्या अनेक चेह:यातूनच साकार झालेला आहे;

कार्पोरेट जगात व्हायरल असलेल्या एका व्हिडीओत दिसतं आपलंच एक रूप!
 
सध्या एक व्हिडीओ कार्पोरेट जगात व्हायरल आहे!
त्याचं नाव आहे, ‘व्हाट यू रिअली सेइंग विथ युवर क्लोथ्स’!
कार्पोरेट जगात म्हणजे आपल्याच नाहीतर सगळीकडच्याच कार्पोरेट ऑफिसेसमध्ये अशी चर्चा आहे की, हा व्हिडीओ म्हणजे आपल्या ऑफिसात असलेल्या अनेक चेह:यातूनच साकार झालेला आहे; सगळे नमुने आपल्या अवतीभोवती दिसतातच. ( त्यात एक आपणही आलोच)
तर हा व्हिडीओ काय आहे?
एक साधा व्हिडीओ आहे; ज्यात काही तरुण कर्मचारी आहेत. वेगवेगळ्या कपडय़ातले, वेगवेगळ्या रंगरुपाचे, वेगवेगळ्या पदांवरचे! ते फक्त सांगताहेत की, मी हे कपडे का घालतो! ते सांगतातही; पण ते जे सांगतात तेच खरं नसतं, त्यांच्या कपडय़ांवरून त्यांच्याविषयी लोक जे समजतात, ते वेगळं असतं!
तर एक तरुणी, अत्यंत कळकट अवतारात, झोपेतून उठून आल्यासारखी. ती सांगते, मी जिनिअस आहे. खूप हुशार, खूप काम करते. मी कसेही कपडे घालीन, आय डोण्ट केअर.
एक बॉस एकदम सुटाबूटातला, पण पायात एकदम गुलाबी मोजे. तो सांगतो, ‘ मी खूप काम करतो, पण मी रसिक आहे, मला पाटर्य़ा करायला आवडतं.!’
एक बाई जाडजूड. घट्ट-तंग कपडे, खोल गळे, वाढतं वय. ती म्हणते, मला वाटतं वर्क फ्रॉम होमच असावं कायम!
- असे अनेक नमुने. सगळे आपल्याविषयी काहीतरी सांगत असतात पण ते खरं नसतं!
खरं असतं ते हेच की, आपापली वेगळी कारणं आपल्या कपडय़ाआड झाकत ते वेळ मारून नेत असतात. आपापल्या उणीवा झाकत असतात, लोकांचं अटेन्शन मागत असतात. स्वत:ला ऑफिसमध्ये चर्चेचा विषय बनवत असतात.
हा व्हिडीओ पाहताना वाटतं की, आपण तरी काय वेगळे?
आपल्या गबाळ्या राहणीमानाचं, आपल्या इस्त्री नसलेल्या कपडय़ांचं, आपल्या कपडय़ांवरच्या डागाचं, आपल्या घट्ट किंवा सैल कपडय़ांचं, आपल्या कपडय़ांच्या खोल गळ्याचं, आपल्या अतीच विचित्र रंगसंगतीचं, एकेक करून समर्थन करतो.
मात्र आपली वृत्ती-स्वभाव-झळकतोच त्यातून!
हा व्हिडीओ म्हणून तर कार्पोरेटमध्ये गाजतोय सध्या!
- चिन्मय लेले