शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

लग्न नावाचा वन वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:45 IST

हे स्थलांतर मुलीचं आयुष्यच बदलून टाकतं, कायमचं !

- वैष्णवी श्रीकांत तर्कसे, परभणी

स्थलांतर ही एक अशी घटना आहे, जी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणते. प्रत्येकाचे स्थलांतराचं कारण आणि अनुभव अतिशय वेगवेगळे असतात, कधी परिस्थितीमुळे, कधी शैक्षणिक कारणांमुळे तर कधी अगदीच आवड म्हणून लोक स्थलांतर करत असतात.स्थलांतर नेहमीच ऐच्छिक असेल असंही नाही; पण ते अनिवार्य मात्र नक्कीच असतं. अशाच एका अनिवार्य स्थलांतरणाचा अनुभव प्रत्येक मुलीच्या कपाळी लिहिलेला असतो.ते स्थलांतर म्हणजे लग्न.लग्न करून सासरी जाणं. आपलं घर सोडणं आणि कायमचं निघून जाणं. हे खरंच वन वे तिकीट आहे. क्षणभर विचार केला तर जाणवतं की हे स्थलांतर करायला किती मोठं धाडस लागत असेल.स्थलांतर एरव्ही काही अंशी सुसह्य असतं, कारण त्या प्रकारच्या स्थलांतरणात एक मनस्वी स्वातंत्र्य असतं. आपण ठरवून गाव-शहर बदलतो. स्वतंत्र होतो, अनेकदा एकटेच होतो. पण लग्न करून एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिचं आयुष्य अनेक नात्यांमध्ये बांधलं जातं. सासरी गेल्यावर कुठलाही निर्णय घेताना त्या निर्णयाच्या परिणामांचा सर्वांगाने विचार तिला करावा लागतो. एवढंच नव्हे तर हे स्थलांतर करताना तिला पुष्कळ पूर्वतयारीसुद्धा करावी लागते, जसं की स्वत:च्या स्वभावात थोडाफार बदल करावा लागतो, स्वभाव जर हट्टी असेल तर त्याला मुरड घालावी लागते. सासरच्या लोकांचे स्वभाव लक्षात घेत तिला स्वत:च्या सवयींमध्ये बदल करावे लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुळवून घेण्याची वृत्ती अंगीकारावी लागते. लग्न करून ती एका गावातून दुसऱ्या गावात, शहरात जात असली किंवा अगदी एका गावातच दुसºया घरी जात असली तरी हा स्थलांतरानंतरचा बदल मोठाच असतो. संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणारा असतो.या प्रकारच्या स्थलांतरणात यू टर्न घेण्याची मुभाच नसते. सासरी जाणं हा वन वे आहे. या वन वेवरून मुलगी पुन्हा मागे फिरूच शकत नसता. जगण्याच्या वन वेवर जोडीदाराच्या साथीने स्वत:च्या आयुष्याची गाडी व्यवस्थितपणे चालवण्याचं सामर्थ्य कमवावं लागतं. ती ते कमावतेही, नवीन जग निर्माण करते.सासरी गेलेल्या मुलीला अनेक प्रकारची माणसं तर भेटतात आणि इतकंच नव्हे तर त्या माणसांच्या रूपानं तिच्या आयुष्यात अनेक नवीन नातीही डोकावतात. ती नाती निभावत असताना तिला अनेक जबाबदाºया निभवाव्या लागतात. त्यासाठी जोडीदाराचा भक्कम आधार मात्र आवश्यक असतो.तिचं हे स्थलांतर अनेक सुखदु:खाचे क्षण देतं. आपलं आयुष्य किती बदललं लग्नानंतर असंही तिला वाटतंच. तेव्हा तिचाही विश्वास बसत नाही की या एका स्थलांतरानं आपल्याला इतक्या गोष्टी शिकवल्या..आयुष्याचा नूरच बदलून टाकला..