शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाटसरू...जिथं गेलो तिथं जगायला शिकलो..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 05:00 IST

चौथीत असताना घर सोडलं, त्यानंतर पाचवेळा स्थलांतर केलं, पण कुठंही गेलो तरी उपरेपणा जाणवला नाही. कारण मी जिथं गेलो तिथं जगायला शिकलो..

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात बालाघाट डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेले देवठाणा हे माझं गाव. गावात पहिंली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. तिथंच माझं तिसरीपर्यंत शिक्षण झालं. आजोबांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. त्यामुळे लहानपणीच मला तुकाराम महाराजांच्या अभंगांची ओळख झाली. मी कीर्तनकार व्हावं ही त्यांची इच्छा होती. मात्र वडिलांवर डाव्या विचारांचा प्रभाव आणि त्यांना शिक्षणाची विशेष आवड असल्यानं माझी रवानगी तिसरीनंतर अंबाजोगाईला झाली. हे माझं पहिलं स्थलांतर. योगेश्वरी नूतन विद्यालयात मी चौथीला प्रवेश घेतला. अंबाजोगाई माझ्या गावापेक्षा मोठं, मात्र तसं छोटंसंच शहर होतं.नवीन नवीन मी घाबरून गेलो. मात्र लवकरच मी इथल्या शहरी वातावरणात एकरूप झालो. शाळेत मी हुशार विद्यार्थी होतो. मला आठवतंय चौथीचा निकाल लागला आणि मी शाळेत दुसरा आलो तेव्हा मी राहत असलेल्या वसतिगृहातले संभाजी लांडे सर मला खांद्यावर घेऊन नाचले होते. ती प्रेरणा आजही मी माझ्या मनात जिवंत ठेवली आहे. आठवीत असताना त्यावेळेस आम्हाला इतिहासाला कराड सर होते. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करत होते. त्यांचा माझा व्यक्तिमत्त्वावर विशेष प्रभाव पडला तो आजही कायम आहे.नववीत मला नवोदय विद्यालय, गढी (ता. गेवराई, जि. बीड) येथे प्रवेश मिळाला. हे झालं माझं दुसरं स्थलांतर. बारावीपर्यंत माझं शिक्षण तिथंच. आम्हाला दहावीला गणिताला विनोद सर होते. त्यांच्यामुळे मला गणिताची प्रचंड आवड निर्माण झाली. बारावीनंतर अभियांत्रिकी सीईटीच्या तयारीसाठी एक वर्ष लातूरला गेलो. येथे नरहरे सरांचं विशेष मार्गदर्शन मिळालं.मला पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्थात सी.ओ.ई.पी.त प्रवेश मिळाला. मी पुण्यात आलो. तिथून जवळच आळंदी आणि देहू होते. या गावांशी माझी भावनिक जवळीक होती. पुण्यातील दहीहंडीचा, गणपती उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. जवळचे किल्ले पाहिले. मात्र पुण्यात आल्यावर प्रथमच मराठवाड्याचं मागासलेपण जाणवलं. लक्षात येत गेलं. पुढे पदवी पूर्ण झाली आणि माझी निवड महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात माझी नियुक्ती झाली. मी पुन्हा स्थलांतर केलं. तुळजापूर व परंडा तालुक्यात असताना विद्युत रोहित्र दुरु स्ती, नवीन वीज जोडणी यामुळे शेतकºयांच्या नेहमी संपर्कात आलो. शासकीय अधिकारी म्हणून काम करताना मी माझ्यातला शेतकºयाचा मुलगा कायम जिवंत ठेवला.दरम्यान माझी एम.पी.एस.सी. मार्फत सहायक अभियंता म्हणून राज्य शासनात निवड झाली.आता मी पाचव्यांदा स्थलांतर करत अकोला मुख्यालयी रु जू झालो. प्रथमच मला विदर्भ पाहायला, अनुभवायला मिळाला. इथली माणसं प्रेमळ, कष्टाळू व प्रामाणिक आहेत. वºहाडी भाषा बोलण्याचा प्रयत्न आता मी करतोय.स्थानिक भाषा, परंपरा, रीती, परिस्थिती समजून घेतली की आपल्या वाट्याला उपरेपणा येत नाही हा माझा अनुभव आहे.चौथीत घर सोडून स्थलांतर केलेला दिवस मला आजही आठवतोय. घरची संस्काराची शिदोरी सोबत घेऊन एक वाटसरू बनून निश्चित ध्येय पूर्ण करण्याचा प्रवास आजही सुरूच आहे. आज शासनात चांगल्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. आई- वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं याचा आनंद मनाशी घेऊन प्रवास सुरू आहे..

- अजित सुदासराव सोळंके, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन.रा. देवठाणा, ता. धारूर, जि. बीड