पोटावर बिस्किटं हवीत?

By admin | Published: April 26, 2017 04:30 PM2017-04-26T16:30:36+5:302017-04-26T16:30:36+5:30

- फक्त घाम गाळून काय उपयोग?

Want biscuits on the stomach? | पोटावर बिस्किटं हवीत?

पोटावर बिस्किटं हवीत?

Next

 - ऑक्सिजन टीम

 
आजकाल प्रत्येकालाच बॉडी बनवायची हौस असते. त्यासाठी जिममध्ये घाम गाळायची आणि अगदी काहीही करायची  त्यांची तयारी असते. पण यातल्या बर्‍याच जणांना हवी असते ती सिक्स पॅक बॉडी!
 
जिममध्ये लावलेल्या पोस्टरवरील बॉडीबिल्डरसारखी किंवा ‘सप्लिमेण्ट्स’च्या डब्यावर असलेल्या चित्रासारखी!.
 
पण त्यासाठी काय करायचं?
 
ते मात्र शंभरातल्या 99 जणांना माहीत नसतं आणि कुठल्यातरी अयोग्य मार्गांचं अनुकरण करून आपल्या शरीराचं नुकसान ते करून घेतात.
 
मग त्यासाठी काय कराल?
त्यासाठीच्याच या टिप्स..
 
 
‘सिक्क पॅक’ बॉडीसाठी सर्वसामान्यपणे ‘फिट’ असलेल्या व्यक्तीने किमान सहा महिने नेमून दिलेला व्यायाम सिरियसली केला आणि जोडीला योग्य आहार, विर्शांती, डाएट घेतल्यास पोटावर ‘बिस्किटं’ आकार घेऊ लागतील. 
 
सहा महिन्यांच्या पुढे किती काळ लागेल हे सांगता येणार नाही; पण किमान सहा महिने तरी घाम गाळावाच लागेल. 
 
अर्थात किती लवकर ते आकार घेतील हे तुमच्या जिन्सवरही अवलंबून असेल.
 
तुम्हाला जर व्यायामाची सवय असेल, तुमचं शरीर अँथलिटला साजेसं असेल तर परिणाम लवकर दिसेल.
 
वयाच्या चाळिशीनंतरही शाहरुखला हे जमलं, कारण त्याची बॉडी अँथलिटला साजेशी आहे आणि शाळा, कॉलेजात असल्यापासून तो स्पोर्ट्समन आहे. विविध खेळांत तो भाग घ्यायचा.
 
स्पेशलाईज्ड ट्रेनरच्या हाताखाली तीन वर्षं घाम गाळल्यानंतर आणि त्यातही काही महिने केवळ अँब्जवर लक्ष दिल्यामुळेच त्याला ‘सिक्स पॅक’ मिळवणं सोपं गेलं.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती घाम गाळता यापेक्षाही तुम्ही काय आणि कसा आहार घेता, तुमची लाइफस्टाइल काय याला अधिक महत्त्व आहे. 
 
‘सिक्स पॅक’साठी व्यायामाकडे केवळ तीस टक्के लक्ष दिलं तरी चालेल; पण आहाराकडे मात्र सत्तर टक्के लक्ष द्यावं लागेल.
 
‘सिक्स पॅक’विषयी खरंखुरं!
 
खरं सांगायचं तर ‘सिक्स पॅक’ म्हणजे एकदम अफलातून, जगावेगळं असं काही नाहीच. 
हा ‘सिक्स पॅक’ प्रत्येकाकडे, अगदी प्रत्येकाकडे असतो. पोटाच्या स्नायूंना (खरं तर हा एकच स्नायू असतो) ‘सिक्स पॅक’ हे नाव दिलं गेलंय.
 

Web Title: Want biscuits on the stomach?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.