शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमृता खानविलकरचे डार्क फ्लोरल फुलाफुलांचे ड्रेस पाहिलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:21 IST

डार्क फ्लोरल म्हणजे एक सहज, सुंदर ट्रेण्ड!

ठळक मुद्दे कुठंही हमखास फ्रेश दिसायचं असल्यास मग अगदी  कॉलेज, कॅज्युअल ड्रेस म्हणून, पार्टीसाठी डार्क फ्लोरल हा अचूक नेम ठरतो!

- श्रुती साठे  

डार्क फ्लोरल म्हणजे एक सहज, सुंदर ट्रेण्ड! अगदी लहान मुलींपासून, कॉलेजात शिकणार्‍या मुली, नोकरी करणार्‍या तरुण मुली, स्त्रिया सगळ्यांना आवडणारा आणि शोभून दिसणारा असा हा डार्क फ्लोरल ट्रेण्ड! कोणी फ्लोरल प्रिंटेड मॅक्सी वापरावी, कोणी शॉर्ट ड्रेस, कुर्ता, टॉप म्हणून वापरावे, तर कोणी फक्त स्कार्फ घ्यावा! टवटवीत आणि बांधेसूद दिसायला डार्क फ्लोरल नक्कीच मदत करतात.     अमृता खानविलकरने एका सोशल साइटवर आपले फोटोज शेअर केले ज्यात ती डार्क फ्लोरल प्रिंटेड टॉप्समध्ये दिसली. काळ्या रंगाचा लांब स्लिट असलेला शर्ट टॉप त्यावर असलेल्या मोठय़ा लाल-हिरव्या  फ्लोरल प्रिंटमुळे सुंदर दिसला. लॉन्ग शर्ट आणि त्याखाली काळे लेगिंग्स आणि स्टिलेटोज यामध्ये ती खुलून दिसली. कुर्ता, लॉन्ग टॉप आणि  लेगिंग हे अगदी आपले आवडीचे, रोजचेच कॉम्बिनेशन आहे. तेव्हा नेहमीच्या कॉटन कुत्र्याला ब्रेक देऊन शिफॉन, जॉर्जेट कापडामध्ये फ्लोरल प्रिंटेड कुर्ता नक्की ट्राय करा.  

अमृताचा दुसरा लूक कॉलेज तरु णींना नक्कीच ट्राय करावा वाटेल! लाल रंगाचा फ्लोरल सॅटिन रॅप टॉप आणि  डेनिम शॉर्ट्स एकदम पार्टी परफेक्ट आहे! गडद रंगाच्या बेसवर मोठे फ्लोरल प्रिंट हे कोणत्याही वेळेसाठी छान दिसणारं कॉम्बिनेशन आहे. कुठंही हमखास फ्रेश दिसायचं असल्यास मग अगदी  कॉलेज, कॅज्युअल ड्रेस म्हणून, पार्टीसाठी डार्क फ्लोरल हा अचूक नेम ठरतो! शिवाय बिझी प्रिंट असल्याने फ्लोरल प्रिंट पावसाळ्यासाठी अगदी योग्य पर्याय ठरतो.