शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्र व्होटर - हे घ्या मतदारांसाठी खास अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 07:20 IST

तुमच्या हातातल्या मोबाइलवर मतदानाची तयारी करा, तीही एका क्लिकवर

प्रा. योगेश हांडगे 

निवडणूक जवळ आली आहे. आपलं नाव मतदान यादीत आहे की नाही हे तपासा.त्यासाठी तुम्ही अ‍ॅपचाही वापर करू शकता.या अ‍ॅपचा उपयोग मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र किंवा यादीतील आपला क्रमांक मोबाइलमध्ये एका क्लिकवर आपल्याला शोधण्याकरता होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्या ‘ट्र व्होटर’ हे अ‍ॅप मतदारांकरता उपलब्ध करून दिले आहे.ट्र व्होटर अ‍ॅपद्वारे मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्र मांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणं, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणं, मतदानाबाबतची माहिती घेणं, स्वतर्‍ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणे, सोबत आधार तसेच मोबाइल क्र मांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणं, कुटुंब व मित्नांचा गट तयार करणं, गैरहजर, स्थलांतरित, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करून कळवणं, स्वतर्‍चे मत सिक्युरिटी प्रश्नाद्वारे सुरक्षित करणं, आपात्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्र मांक जतन करणं, एकाच मोबाइलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणं शक्य आहे. निवडणुकीचा निकाल पाहणं इत्यादी कामं सहजपणे  या अ‍ॅपद्वारे करता येणार आहे.

सिटिझन ऑन पॅन्ट्राँल (कॉप)‘‘कॉप’’चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणं हा आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये एखादा पक्ष किंवा उमेदवार आचारसंहितेचा भंग करीत असेल तर त्याची तक्र ार आता आपल्याकडे असलेल्या मोबाइलवरून थेट निवडणूक यंत्नणेकडे करता येणार आहे. या अ‍ॅपच्या नावातच जनतेची गस्त किंवा नजर असा आशय सामावला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारही निवडणूक प्रक्रि येवर नजर ठेवू शकतील. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रचाराच्या कालावधीत काही गरप्रकार आढळल्यास छायाचित्नासह तो प्रकार अ‍ॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्नणांच्या निदर्शनास आणून देता येईल.या अ‍ॅपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्र ारीवर जलद गतीने कारवाई  करणे आहे. या अ‍ॅपद्वारे तक्र ार करणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्याची व्यवस्था आहे.प्रचाराच्या कालावधीत काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्नासह तो प्रकार अ‍ॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्नणांच्या निदर्शनास आणून देता येईल. त्यानंतर निवडणूक संनियंत्नण समिती त्यावर योग्य ती कार्यवाही करेल.या कॉपद्वारे मतदारांना पुढील गैरप्रकाराना आळा घालणं सहज शक्य झालं आहे. पैसे, भेटवस्तू, मद्यवाटप, शस्र बाळगणे, सरकारी गाडय़ांचा गैरवापर, लहान मुलांचा वापर, प्राण्यांचा वापर, घोषणा व जाहिराती, पेड न्यूज, सोशल मीडिया, प्रचार रॅली, प्रार्थना स्थळांचा वापर,  भूमिपूजन व उद्घाटन समारंभ, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर, इत्यादीसाठी सिटिझन ऑन पेट्रोल हे अ‍ॅप वापरता येईल.या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाच्या तक्र ारी नागरिक सुलभपणे दाखल करू शकतील. तसेच मतदारांना उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येईल व गैर आढळल्यास त्याची तात्काळ तक्र ार नोंदवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवालदेखील तक्र ारदारास अ‍ॅपमार्फत दिसून येईल.