शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक पॅँथर ! - तो लढवय्या होता, त्याची ही गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 14:16 IST

त्याचा संघर्ष जगभरात तरुणांना जगण्याची उमेद देत राहील मग ते तरुण आफ्रिकन असोत नाही तर एशियन. त्याची ही गोष्ट.

ठळक मुद्देअलविदा ब्लॅक पँथर !

सारिका पूरकर-गुजराथी

वर्णसंघर्ष आणि त्याविरुद्धचा लढा हे अमेरिकन वास्तव आहे. आणि वर्णसंघर्ष आणि हक्कांसाठीचा लढा पुन्हा एकदा सुरूअसतानाच ब्लॅक पॅँथर चॅडविक बोसमनने वयाच्या 43 व्या वर्षी एक्झिट घेतली.चॅडविक तरुणाईसाठी आणि विशेषतर्‍ कृष्णवर्णीय युवक व युवतींच्या जनरेशन नेक्स्टसाठी रिल नाही रिअल हिरो होता.चॅडविकच्या ब्लॅक पँथर या भूमिकेने कल्चरल माइलस्टोन म्हणून हॉलिवूडमध्ये इतिहास रचला. 2016मध्ये रिलीज झालेल्या कॅप्टन अमेरिका र्‍ सिव्हिल वार या चित्रपटातील किंग टीचला/ब्लॅक पँथर या पात्राने त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं.लिओनादरे दी कॅप्रिओ, ब्रेडली कूपर, टॉम हॉलेंड, रॉबर्ड डाऊनी यांच्यासारख्या दिग्गज आणि गोर्‍या अभिनेत्यांच्या जमान्यातही चॅडविकला या चित्रपटाने तरुणाईचा सुपरहिरो बनवलं.वाकांडा हे कृष्णवर्णीयांचं एक काल्पनिक जग या चित्रपटात साकारण्यात आलं आहे.त्यात चॅडविकने या देशाचं नेतृत्व करणारा लीडर साकारला होता. वाकांडात कृष्णवर्णीयांनी त्यांचा संघर्ष झुगारत विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं विकसित केलं, कृष्णवर्णीयांकडेही बौद्धिक संपदा असू शकते हे अधोरेखित करणारा हा चित्रपट.सामाजिक समतेसाठीची आपली लढाई कधीच संपणार नाही या निराशेच्या गर्तेत कृष्णवर्णीय तरुण सापडलेले असताना हा चित्रपट येणं ही एक आशादायी गोष्ट ठरली.वर्णभेदाविरुद्ध लढणारा हा सिनेमा, हॉलिवूडमध्ये समीक्षकांनीही खूप गौरविला होता. त्यात या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचे ऑस्करचे नामांकनही मिळालं होतं.

 एखाद्या कृष्णवर्णीय हिरोच्या चित्रपटाला असं नामांकन मिळणं हेही पहिल्यांदाच घडलं. या चित्रपटामुळे मी पार बदलून गेलो. युवा असणं, गिफ्टेड असणं आणि ब्लॅक असणं हे काय असतं ते मला कळलं असं तो त्यावेळी भारावून जाऊन म्हणाला होता. ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ आणि अ‍ॅव्हेंन्जर्स र्‍ एण्डगेम’ या दोन चित्रपटातही त्यानं ब्लॅक पँथरचीच भूमिका निभावली.अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात जन्मलेल्या चॅडविकने करिअरची सुरुवात 2003 मध्ये टेलिव्हिजनपासून केली होती. त्यानंतर 2013मध्ये त्यास हॉलिवूडमध्ये पहिली भूमिका फूटबॉल फ्लिकमध्ये मिळाली. चॅडविकने यानंतरच्या सात वर्षाच्या त्याच्या अतिशय लहानपण दिमाखदार कारकिर्दीत विविध भूमिका  साकारून स्वतर्‍ला ब्लॅक पँथर म्हणून सिद्ध केले. त्याने वर्णद्वेषातून शारीरिक व शाब्दिक हल्ले सहन केलेल्या जॉकी रॉबिनसन, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याचा बहुमान मिळवणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन नागरिक थर्गूड मार्शल, अमेरिकन कृष्णवर्णी संगीतकार, गीतकार जेम्स ब्राउन यांसह ज्या ज्या भूमिका केल्या, त्यातून त्याने नेहमीच मानवता आणि वंश-वर्णभेदाविरुद्ध लढाईला सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, चॅडविकसाठी हा प्रवास खडतर होता. सुरुवातीच्या काळात त्यालाही तीव्र विरोध सहन करावा लागला होता. निर्मात्यांना आपण नेहमी त्याच त्याच आणि  नकारात्मक भूमिका देतात म्हणून प्रश्न विचारायला सुरु वात केल्यानंतर कसं आपल्याला लढावं लागलं? हे सारं त्याने वेळोवेळी सांगितलं होतं. आपल्याकडे खूप पैसा असावा अशी इच्छा असलेल्या तसेच गुंतवणुकीच्या मोहात सापडून एका टोळीत शिरलेल्या एका मुलाची भूमिका करताना माझ्या लक्षात आलं  की, आम्ही काळे/ब्लॅक आहोत या दृष्टिकोनातूनच, काळे लोक हे गुन्हेगारी वृत्तीचे, अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले असेच असतात या गृहीतकातूनच ही भूमिका लिहिली गेलीय. माझ्या भूमिकेत सकारात्मक काहीच नव्हते असं चॅडविकचं म्हणणं होतं. निर्माते व अन्य अधिकार्‍यांच्या बैठकीत चॅडविकने हा मुद्दा संपूर्ण ताकदीनिशी मांडला, बरेच प्रश्न विचारले; परंतु, त्याला उत्तर म्हणून त्याच्याकडून ही भूमिका काढून घेण्यात आली. फारच वेदनादायी होतं हे चॅडविकसाठी.2019च्या स्क्रीन अवॉॅर्ड समारंभात चॅडविक म्हणाला होता, आम्हाला (सर्वच कृष्णवर्णीय कलाकार) हे माहीत होतं की, आम्हाला नेहमीच सांगितलं जाईल की, तुमच्यासाठी कोणतीही स्क्रीन अथवा स्टेज नाहीये. आमची जागा नेहमी शेपटासारखी खालीच राहील. बक्षीस समारंभांमध्येही आम्ही नसू, मिलियन डॉलर्सही आम्ही मिळवून देऊ शकणार नाहीत; परंतु, तरीही आम्हाला ही खात्री होती की आमच्यात काही तरी विशेष आहे जे आम्ही जगाला देऊ शकतो, देऊ इच्छितो. ते म्हणजे आम्ही ज्या ज्या फिल्म्स करू त्यात आम्ही सर्वप्रथम माणूस आहोत हे दाखवू. एक असं जग आम्ही निर्माण करू पाहत होतो की जे अनुकरणीय असेल.चॅडविकने त्याचे हे शब्द त्याच्या भूमिकांमधून अक्षरशर्‍ जिवंत केले.तो लढवय्या होता. लढतच राहिला. वर्णभेदाविरु द्ध आणि  कॅन्सरविरु द्धही.मार्शल चित्रपटापासून ते ‘डा 5’ या चित्नपटापर्यंत.2020च्या सुरु वातीला स्पाईक ली ही फिल्म 2021 साली नेटिफ्लक्सवर रिलीज होणार आहे. ही फिल्म त्याची शेवटची आठवण.अलविदा ब्लॅक पँथर !

(सारिका मुक्त पत्रकार आहे.)