शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कस्सून सराव

By admin | Updated: August 7, 2014 21:37 IST

चंद्रकांत मूळचा कुरुंदवाडजवळील तेरवाडचा. शिरोळ तालुक्यातील हे छोटंसं गाव. चंद्रकांतचा मोठा एकत्र परिवार येथे राहतो

चंद्रकांत मूळचा कुरुंदवाडजवळील तेरवाडचा. शिरोळ तालुक्यातील हे छोटंसं गाव. चंद्रकांतचा मोठा एकत्र परिवार येथे राहतो. त्याच्या कुटुंबात ३९ सदस्य एकत्र राहतात. त्याचे काका सदाशिव मारुती माळी हे कुटुंबप्रमुख आहेत. प्रगतिशील शेतकर्‍याचा पुरस्कारही त्यांनी मिळविला आहे. त्याचे वडील दादू आणि आई कांचन दोघंही अशिक्षित. शेती करतात. घरची व बाहेरची भाडेपट्टय़ानं कसायला घेतलेली अशी सुमारे ७0 ते ८0 एकर जमीन हे एकत्र कुटुंब कसते. त्यामुळे चंद्रकांतला खुराकची कमतरता कधीच भासली नाही. त्याच्या दुधाची व इतर खुराकाची व्यवस्था झाल्यामुळे असेल कदाचित त्यानं जोरदार मेहनत केली. आपली शारीरिक क्षमता वाढविण्यावर भर दिला. खरंतर त्याचा मोठा भाऊ रवी त्याला कायम या खेळासाठी प्रोत्साहन देत असे. पण दुर्दैवानं त्याचा अपघाती मृत्यू झाला. 
चंद्रकांत वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच प्रदीप पाटील यांच्याकडे सराव करत होता.  मात्र त्याची शरीरयष्टी कडक आणि उंच. वेटलिफ्टरला अजिबात न शोभणारी. त्यामुळे त्याला व्हॉलीबॉल खेळण्याचा सल्ला जो तो द्यायचा. त्याची त्याला चीड यायची. जिद्दीनं त्यानं वेटलिफ्टर होण्याचा चंग बांधला. तो रोज सहा सात तास सराव करायचा. दणकून खाणं आणि व्यायाम करून ते जिरवणं हा त्याचा ध्यास बनला. २00८ मधे कझाकिस्थानात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं भाग घेतला. २00९ मध्ये मलेशियात झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळविलं. २0१0 च्या चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यानं भाग घेतला. दक्षिण आफ्रिकेतील २0११ मध्ये राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्यानं रौप्यपदक मिळविलं. २0१२ मध्ये समोआ येथील कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेतही त्यानं रौप्यपदक मिळविलं होतं.
चंद्रकांत सध्या भारतीय सेना दलाच्या सेवेत आहे. यंदा त्याचा लग्नाचा विचार घरच्यांनी सुरूकेला होता, मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याची त्याला खात्रीच होती. त्यामुळे आधी लगीन राष्ट्रकुलचं अशी प्रतिज्ञा करून त्यानं लग्नाला नकार दिला. मंगळवारी मध्यरात्री त्याचा खेळ सर्वांना पाहता यावा म्हणून त्याचे काका विष्णुपंत यांनी गावातील विठ्ठल मंदिर चौकात स्क्रीन लावला. त्याचे काका सदाशिव यांनी चंद्रकांतनं पदक जिंकताच प्रशिक्षक प्रदीप पाटील यांना चक्क उचलून घेतलं आणि मानाचा फेटा बांधला. आईवडील यांना तर मीडियाला प्रतिक्रिया द्यायची म्हणजे नक्की काय बोलावं हेही उमगत नव्हतं इतका आनंद झाला होता. आपल्या गावच्या पोरानं देशाचं नाव मोठं केलं हे पाहून ग्रामस्थांनी तर तेरवाडमध्ये माळी कुटुंबीयांची हत्तीवरून मिरवणूक काढली.