डॉ. संज्योत देशपांडे -
काही वाईट घडलं, चुकलं, नुकसान झालं तर आपण ते का झालं, कसं झालं याचा किती खल करतो. किती कारणं शोधतो. पण आपल्याला आनंद कशानं होतो, का होतो, काय केल्यामुळे छान वाटतं याचा आपण अजिबात विचारच करत नाही.
जरा विचार करा, कशाकशानं होतो आपल्याला आनंद? होऊ शकतो?
सगळं आत्ताच्या आता, इझीली हवं?
पेशन्स? म्हणजे सहनशीलता, कोणत्याही बाबतीत धीर धरण्याची वृत्ती. तुम्ही म्हणाल, बापरे बाकी काहीही सांग पण पेशन्स नको ! आणि त्याचा आनंदाशी काय संबंध?
आजच्या जगात आपल्याला सगळं रीमोट कंट्रोलच्या बटणासारखं सगळं हवं असतं. बटण दाबलं की हवी ती गोष्ट मिळायला हवी. योगायोगानं तशा सुविधा पुरवणा:या यंत्रणाही आपल्या आसपास आता निर्माण होत आहेत. कल्पना करा, एखाद्या दिवशी नेट डाऊन झालं तर काय होईल? अनेकांना तर ते इमॅजिनही करवत नाही, इतक्या वेदना होतात. एटीएममध्ये गेलो आणि ते बंद असलं, कुणी घरपोच वस्तूंची डिलीव्हरी द्यायला उशीर केला तरी आपली चिडचिड होते.
लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीची जरासुद्धा वाट पहायला लागली तरी आपली लगेच चिडचिड व्हायला सुरुवात होते. साध्या साध्या गोष्टी मग आपल्याला सहन होत नाहीत. कोणत्याही गोष्टीत आपल्या कल्पनेपेक्षा वेगळं काही घडतंय असं वाटलं की, आपला मूडच जातो. काही गोष्टी नेटाने करायच्या म्हटलं की आपण लगेच बोअर होतो. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी, आपल्या मनाची कष्ट करण्याची तयारीच नसते अनेकदा. आपल्याला सगळं इन्स्टंट, सहज, इझीली हवं असतं.
एका अर्थाने आपण चक्क लाडावलेलं बाळ होत चाललो आहोत.
आपली एकंदरीतच त्रस सहन करण्याची क्षमताच कमी झाल्याने, म्हणजे फ्रस्ट्रेशन हाताळण्याची आणि स्वीकारण्याची क्षमताच कमी झाल्याने कामातलं सातत्य, अथक प्रयत्न अशा गोष्टी आपल्याला भयानक वाटायला लागल्या आहेत.
जगण्यात काहीतरी अर्थ हवाच ना?
आपण अनेक गोष्टी करतो, कशासाठी? तर आनंद मिळावा म्हणूनच ना ! आपण जे काही करतो ते अर्थपूर्ण वाटणं महत्त्वाचं असतं. आपलं जगणं अर्थपूर्ण व्हावं म्हणून आपण काय करतो, याचाही विचार करायला हवा.
तसा केला तर तुम्ही करत असलेल्या कामातच तुम्हाला आनंद सापडेल.
कण्ट्रोलच नसेल तर.?
रोजच्या जगण्यात कोणत्या गोष्टी माङया नियंत्रणाखाली आहेत आणि कोणत्या गोष्टी माङया नियंत्रणाबाहेरच्या आहेत याचंही भान ठेवायला हवं. ते भानच आपल्या मनावरचा ताण कमी करतं आणि आनंदी राहण्याचा मार्गही दाखवतं.
आनंद मनातच नसेल तर?
स्वत:मध्ये, स्वत:च्या वृत्तीमध्ये खरंतर शोधायला हवा आपला आनंद ! बाहेरच्या जगात, माणसांमध्ये, वस्तूंमध्ये, नात्यांमध्ये आपण आनंदाचे क्षण शोधायला लागलो तर तो आनंद कदाचित मुठीतून चटकन निसटून जाईल. खरा आनंद आपल्या आत्मनिर्भर वृत्तीत असतो. मनानं स्वतंत्र असणं त्यासाठी महत्त्वाचं आहे.
परिणामांना सामोरं जाण्याची उमेद त्यासाठी गरजेची असते. मग आनंदही आपल्या आवाक्यातली गोष्ट वाटते. कारण नाउमेद करणा:या कितीही गोष्टी घडल्या तरी आपली उमेद संपत नाही. आनंद संपत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही आनंदी का नाही?
आनंद मिळवण्यासाठी तुमच्या कल्पकतेला वाव देणा:या किती गोष्टी तुम्ही करता? तुमचं आयुष्य तुम्हीच मोनोटोनस म्हणजेच एकसुरी पद्धतीने जगता आहात का? विचारा स्वत:ला हे काही प्रश्न? तुम्ही आनंदी का नाही याची उत्तरं तुमची तुम्हाला नक्की मिळतील !
1 तुमच्या कामावर तुमचं प्रेम आहे का?
2 तुम्हाला महत्त्वाची वाटतात ती जगण्याची मूल्यं आणि तुमचं प्रत्यक्ष जगणं यात खूप अंतर आहे का?
म्हणजे करावंसं वाटतं एक, करता भलतंच असं काही तुमचं होतं का?
3 तुमच्या नात्यातल्या, जिवाभावाच्या माणसांशी तुमचे संबंध कसे आहेत? तुम्ही त्यांच्याशी कसे वागता ?
4 तुमची तब्येत कशी आहे? सतत तब्येत कुरकुर करतेय का?
त्रस देतेय का ?
5 जे करायचंच असं तुम्ही ठरवता ते काम तुम्ही पूर्ण करता का?
तुमचं काम, लक्ष्य पूर्ण करता का?
तुम्ही आनंदी का नाही?
1) पॉङिाटिव्ह अॅटिटय़ूड ठेवा. पॉङिाटिव्हली विचार करायला शिका.
2) आपल्यात काय बदल करता येतील,
आपला कसा विकास होईल याकडे लक्ष द्या.
3) मुखवटे घालून वावरण्यापेक्षा आपण जसं आहोत तसं जगा. उगीच खोटं खोटं जगू नका.
4) आपल्याकडे जे आहे ते किती मोलाचं आहे, हे सांगा स्वत:ला.
5) सतत व्यायाम करा. योग्य आहार घ्या. निरोगी रहा. एवढं केलं तर आनंदी रहायला वेगळं काही करावं लागत नाही. (खरंच)
6) स्वयंशिस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. जे ठरवलं ते रोजच्या रोज करा.
7) विचारातली ताठरता, हट्टीपणा सोडून द्या.
मी म्हणोल तेच खरं, हा त्रगा सोडा.
8) आपली माणसं, नाती सांभाळा, त्यांना जपा.
9) आपल्यातली संवेदनशीलता जपा.
1क्) रिकाम्या वेळेचा छान उपयोग करा.
11) स्वत: शी बोला. गप्पा मारा.
12) स्वत:वर प्रेम करा.
13) जगणं जसं आहे, तसं स्वीकारा.
14) काही गोष्टी विनोदानं घ्या, हसा, सोडून द्या.