शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावरच्या वातावरणात 15 दिवस राहण्याचा थरारक अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 06:45 IST

पनवेलचा प्रणीत पाटील. मंगळावरच्या वातावरणात 15 दिवस जाऊन राहिला. खराखुरा मंगळावर नव्हे तर नासा अमेरिकेत मंगळाविषयी जे संशोधन करतेय त्याचा भाग म्हणून कृत्रिमरीत्या मंगळासारखं वातावरण तयार करून त्या वातावरणात माणूस कसा जगेल, यासाठीच्या संशोधनात त्याचा सहभाग होता. मात्र त्यासाठी मंगळावर जगावं लागेल तसं त्यानं जगून पाहिलं.

ठळक मुद्देमंगळाचा अभ्यासच थरारक आहे, तिथं जाण्याचा टप्पा अजून काहीसा दूरच आहे.

-भक्ती सोमण

माणसाला आकाशाची, नव्या ग्रहाची, नव्या जीवसृष्टीची ओढ आहे. ते गूढ माणसांना हाका घालतं. आता तर माणूस मंगळावर जायची तयारी करतोय याच्या बातम्या आपण वाचत असतो. माणूस मंगळावर खरंच जाऊ शकेल का, राहू शकेल का, गेला तर परत कसा येईल, असं सगळं कुतूहल असतंच. अर्थात अजूनही अनेकांच्या पत्रिकेत मंगळाचा दोष असतोच, तो छळतोच. गेल्या आठवडय़ात एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं. अलीकडेच म्हणजे 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2019  दरम्यान नासाच्या मार्स सोसायटीनं मार्स डेझर्ट रिसर्च स्टेशनमध्ये मंगळ ग्रहाविषयी केलेल्या संशोधनात पनवेलच्या प्रणीत पाटीलचा सहभाग होता. प्रणीत पनवेलला परतल्यावर त्याच्याशी मंगळ, त्यासंदर्भातले अभ्यास यासंदर्भात गप्पा झाल्या. सायंटिस्ट अ‍ॅस्ट्रोनॉट कॅण्डीडेट असलेला हा प्रणीत. तो सांगतो, ‘मंगळ ग्रहावर वास्तव्य करणं माणसाला शक्य आहे का, यासंदर्भात नासाचं संशोधन सुरू आहे. या संशोधनातील अत्यंत महत्त्वाचा संशोधन प्रकल्प असलेल्या मार्स सोसायटीने अमेरिकेतील युटा राज्यात एका अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी सन 2001 मध्ये मार्स डेझर्ट रिसर्च स्टेशन (एमडीआरएस) सुरू केलं आहे. अर्थात एमडीआरएसमधील वास्तव्य म्हणजे मंगळावरील अंतराळ मोहीम नाही.  एमडीआरएस म्हणजे मंगळावरील कृत्रिम वातावरणात मानवी वास्तव्याचा अभ्यास. या वातावरणात मानवाने जगण्यासाठी करण्याचे प्रत्यक्ष प्रयत्न, मानवाच्या शरीरावर होणारे परिणाम अभ्यासणं असा हा एकूण उपक्रम होता. मंगळासारखं वातावरण कृत्रिमरीत्या इथं तयार करण्यात आलं होतं.’आता मंगळावर जाणार्‍या माणसांच्या निवडीची चर्चा आहे. ते खरं का, हा अभ्यास त्याविषयी काय सांगतो, असं प्रणीत म्हणतो. मंगळावर ऑक्सिजनचं प्रमाण पृथ्वीच्या तुलनेत खूप कमी आहे. आम्ही जो अभ्यास केला त्याचा रिपोर्ट आणि माहिती रोजच्या रोज संध्याकाळी 7 ते 9 यावेळी द्यावी लागत असे. या मोहिमेत आम्ही चौघे भारतीय होतो. त्यात पश्चिम बंगालमधील आणि सध्या इंग्लंडमध्ये स्पेस रिसर्चमध्ये कार्यरत असलेले अविशेख घोष,  मूळची महाराष्ट्रातलीच पण सध्या फ्रान्स येथे संशोधन करत असलेली सोनल बाबरेवाल आणि गुजराथचा पण सध्या ग्रीसमध्ये एरोस्पेस अभ्यास करत असलेला कुणाल नाईक यांचा समावेश होता. हे काम करताना खूप मजा आली. भविष्यात मंगळ ग्रहावर काय अपेक्षित असेल याची चुणूक यादरम्यान दिसली. मंगळाचा अभ्यासच थरारक आहे, तिथं जाण्याचा टप्पा अजून काहीसा दूरच आहे.प्रणीतशी या गप्पाच्या ओघात आपणही त्याच्यासोबत काही क्षण मंगळाच्या वातावरणात जाऊन आल्यासारखं वाटतं.

प्रणीतसह चार दोस्तांनीअसा अनुभवला मंगळ

एमडीआरएसच्या क्रू -204 चा कार्यकारी अधिकारी आणि ग्रीनहब  संशोधक म्हणून मी तिथे कार्यरत होतो. मंगळासारखा परिसर आणि वातावरण कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलं होतं. मंगळावरचा दिवस हा 24 तास 37 मिनिटांचा असतो. त्यावेळेप्रमाणे घडय़ाळ सेट करावं लागलं. एक गृहिणी ज्याप्रमाणे घरी काम करत असते अगदी त्या सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या. अनेक एक्स्ट्रा व्हेईक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी  रोज कराव्या लागत होत्या. आमच्या सगळ्यांच्या कामाचे रिपोर्ट्स आणि गरजा आम्हाला नासाच्या टीमला सांगाव्या लागत असत. इंटरनेट सेटेलाइटच्या माध्यमातून मर्यादित डेटा त्यासाठी आम्हाला मिळाला होता. आमची चार जणांची भारतीयच टीम असल्यानं त्यांच्याशी लगेच जुळवून घेता आलं. कित्येक दिवस बाहेरील जगाशी पूर्णपणे संपर्क बंद होता. प्रत्येक दिवस नवा असायचा. प्रत्येक दिवशी संशोधन सुरू असायचंय. त्यामुळे 15 दिवस मंगळावर राहण्याचा अनुभव घेत असल्यासारखं जगलो. ***जेवणार काय?त्या वातावरणात जेवण हा एक कंटाळवाणा प्रकार होता. प्रत्येक पदार्थाची पावडर वापरून तो पदार्थ फिल करून खाण्याची कसरत पार पडली. चिकनची पावडर, टोमॅटोची पावडर, कांदा पावडर, लसूण पावडर, अंडय़ाची पावडर, अशा सगळ्या न्यूट्रिशियन व्हॅल्यू जास्त असलेल्या पावडरी आम्ही मिक्स करून खात होतो. भुर्जी करायची असेल तर अंड, टोमॅटो, कांदा पावडर एकत्र करायची. त्यात पाणी घालून मिक्स करून खाताना किती चविष्ट खात आहोत असा फिल निर्माण करावा लागायचा.चार जणांच्या संपूर्ण क्रूला दिवसाला केवळ 20 लिटर पाणी मिळत असे. परिणामी अंघोळीच्या ऐवजी फेस न येणार्‍या जेलनं अंग पुसावं लागत होतं. आपली शारीरिक, मानसिक पात्रता कु ठंर्पयत आहे याची जाणीव या दिवसांत झाली. तिथे मी मेथीचे दाणे नेले होते. ते तिथल्या कृत्रिम मातीत लावले. आठ दिवसांनी त्यांना पाने आली. ते सलाड म्हणून खाल्लं. त्याचा रिपोर्टही तयार करून तो द्यावा लागला. आमच्या आधी आलेल्या काही टिमने त्या मातीत बटाटे, टोमॅटो लावून पाहिले. मी मेथीबरोबर मोड आलेले मूग, मटकीही लावली; पण आमचा दौरा संपेर्पयत काही उगवलं नाही! ते का, याचाही अभ्यास करावा लागणार आहे. -प्रणीत पाटील

****

 

* प्रणीतचे वडील गजानन पाटील रायगड पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल होते.  1991 मध्ये पनवेल येथे वडिलांची बदली झाल्यावर प्रणीतचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या पनवेलच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये झालं. *  2009 मध्ये त्यानं आयटी एमजीएम कॉलेज कामोठे येथे इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवी संपादन केली. त्यावेळी त्याला डॉ. राजेंद्र पाटील यांनी खूप मदत केली. 2010 मध्ये घाटकोपर येथील अ‍ॅक्सेंचर कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यानं नऊ महिने काम केलं. 2010-11 मध्ये अमेरिकन अलायन्झ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून तो रुजू झाला. ही कंपनी नासा एन्स्पायर सिस्टिममध्ये सिलिका सप्लाय करते. ही कंपनी नासाची एक वेंडर होती. प्रणीत त्याच्यासाठी प्रपोजल मॅनेजमेंट करीत असे. * अमेरिकन अलायन्स सोबत काम करत असताना अंतराळाबद्दल असलेली आवड अधिक चांगल्या प्रकारे जोपासता आली. त्यांच्याकडून इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती मिळू लागली. सुरुवातीपासूच अंतराळाविषयी एक आकर्षण त्याला होतं. अंतराळाबद्दल शास्त्रीय माहिती घेण्यासाठी ऑक्टोबर 2014 मध्ये अमेरिकेतील अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या एम्री रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्यानं प्रवेश मिळवला. काम सांभाळून तो शिक्षणही घेऊ लागला. *सप्टेंबर 2016 मध्ये सबऑर्बिटल मिशन सिम्युलेशन यात पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री संपादन केली. त्यानंतर नासाच्या फ्लाइट अपॉच्यरुनिटीज प्रोग्रॅमच्या प्रोजेक्ट पोसमध्ये बॅच क्र.1602 मध्ये सायंटिस्ट अस्ट्रेनॉट कँडिडेट या पदासाठी निवड झाली. 

( भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)