शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
3
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
4
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
5
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
7
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
8
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
9
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
10
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
11
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
12
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
13
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
14
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
15
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
16
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
17
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
18
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
19
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
20
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात

सोशल मीडीयातल्या या चार चुगल्या तुमची नोकरी घालवू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 13:03 IST

सोशल मीडियात आपण काय कमेंट्स करतो याचा आणि नोकरी मिळण्याचा काय संबंध?

ठळक मुद्दे अटेन्शन सिकर लोकांनाही काम देण्यात कुणाला रस नसतो. त्यामुळे जरा जपून!

- निशांत महाजन

नुकतीच निवडणूक झाली. निकाल लागले. कोण जिंकलं, कोण हरलं यावर आपण सार्‍यांनी हिरिरीने वाद घातले, कमेंट्स केल्या.मग ते होत असतानाच पाऊस सुरू होता, तर त्यावरही आपण पोस्ट केल्या.ते सुरूच असताना दिवाळी सुरू झाली. मग पुढचे पाच दिवस आपण तेजानं दिवे उजळले. आपले, फराळाचे आणि अजून कसकसले फोटो टाकले. पोस्ट लिहिल्या, इतरांच्या पोस्टवर आपण लाइकठोकले, कमेंट्स केल्या. आपण चर्चा केली, गप्पा मारल्या.हे सारं छान झालं की नाही, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं म्हणून आनंद वाटला की नाही. मुळात आपल्याला प्रत्येक गोष्टीवर मतं आहेत आणि ती आपण बेधडक व्यक्त करतो. कुणाची पाबंदी नाही हे सारंही आपल्याला महत्त्वाचंच वाटतं. हीच तर सोशल मीडियाची खरी ताकद आहे.हे सारं इथवर ठीकच आहे. त्यात गैर किंवा चुकीचं काही नाही.मात्र हा सारा जो काही डेटा आपण ऑनलाइन तयार करून ठेवतो आहोत, त्यातून उद्या आपल्याला नोकरीची संधी मिळणार असेल किंवा हातची जाणार असेल तर?तुम्हाला तर माहितीच आहे, आता ते काही ओपन सीक्रिट उरलेलं नाही की हल्ली नोकरी देतानाच काय पण लग्नासाठी स्थळाला होकार देतानाही लोक इतरांचे सोशल मीडिया अकाउण्ट आधी तपासून पाहतात. कोण बोलतंय, कुणाशी बोलतंय, किती जवळकीने गप्पा होत आहे, त्यातली भाषा कशी आहे, शब्दांची निवड कशी आहे, किती सलगी आहे, फोटोत कपडे कसे घातले आहेत हे सारं तपासलं जातं. इतरांकडे काय बोट दाखवायचं हे सारं आपणही करतोच.तेच आता नोकरी देतानाही होत आहे, या एकाच मुद्दय़ाकडे मात्र लक्ष द्यायला हवं. आणि आपल्याला नोकरी मिळणार की आपण कटाप होणार हे सारं बर्‍यापैकी इथल्या पोस्ट्सवरही ठरणार असतं हे लक्षात ठेवलेलं बरं!आता तुम्ही विचाराल की, मग काय सोशल मीडियात काही बोलायचंच नाही का? मग नेटवर्किग कसं होणार? मुळात हातात साधन आहे तर ते वापरायचं नाही का?तर वापरायचं.पण सजगपणे वापरायचं.आणि चार मुख्य चुका करायच्या नाहीत.अलीकडेच एन्फ्ल्युएन्स नावाच्या एका बडय़ा मार्केटिंग कंपनीनं एक सव्र्हे केला. सोशल मीडियात व्यक्त होताना किंवा आपल्याविषयी बोलताना लोक काय चुका करतात आणि त्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ओळखीवर, करिअरवर आणि एकूणच त्यांच्याकडे पाहण्याच्या लोकांच्या नजरेवर काय परिणाम होतो यासंदर्भात ते काळजी व्यक्त करतात. आणि सांगतात की, या चार गोष्टी सांभाळा, अन्यथा करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतात.त्या 4 चुका कोणत्या?

1. इतरांच्या कमेंट्सवर आक्रमणकुणीतरी एखादी पोस्ट लिहितं, ती आपल्याला पटत नाही. आपण आपलं मत मांडतो इथवर ठीक. मात्र त्याचं बुलिंग करायचं, शिव्याशाप द्यायचे, भाषा पातळी सोडून वापरायची, मुद्दा मिटवायचाच नाही, खेचत राहायचा आणि दुसर्‍या माणसाला नकोसं करून सोडायचं. हे असं ‘बुलिंग’ तुम्ही करत असाल तर सावधान. तुम्हाला मार वाटतही असेल की आपली बाजू योग्य आहे, तो माणूस चुकतोय पण किती ताणायचं आणि काय भाषेत बोलायचं याचं भान राखलं नाही, तर हेकेखोर आणि ट्रोलच लेबल लागू शकते. शक्यतो अशा बुलिंग करणार्‍यांना, ट्रोलर्सना कुणी नोकरी देईल अशी आता परिस्थिती नाही.

2. भेदभाव करणार्‍या पोस्टअनेकांना वाटतं, आपला स्वभाव फार मिश्कील, मग बायकांवर कमेंट्स करणार्‍या पोस्ट लिहिल्या जातात, जोक मारले जातात. कधी तरुणांवर, कधी राजकीय कार्यकत्र्यावर तर कधी रंगावरून, जातीवरून, धर्मावरून पोस्ट लिहिल्या जातात. भेदभाव करणार्‍या, जाहीर अशी भूमिका घेऊन इतरांना कमी करणार्‍या, रेशियल किंवा जेंडर बायस पोस्ट करणार्‍यांना यापुढे कार्यालयीन कामकाज संस्कृतीतून वगळलं जाण्याचीच शक्यता आहे.

3. अतिआक्रमक लेखन

काहीजणांना फार भारी वाटतं, ते सोशल मीडियावर तलवार घेऊनच येतात. कुणालाही काहीही बोलतात, अपमान करतात, उद्धटासारखं बोलतात. त्यांना इतर लोक लाइक करतात, ते वाद घालतात, त्याचीही चर्चा होते. मात्र अशा अतिआक्रमक आणि बेताल बोलणार्‍यांनाही नोकरीच्या संधी दुर्मीळ होत जातील.

4. अतिपर्सनल शेअरिंग

ही गोष्ट खरं तर कॉमनसेन्स आहे. खासगी आयुष्याची जाहिरात सोशल मीडियात किती करायची याची एक मर्यादा हवी. अतीच खासगी माहिती, रडगाणी अगदी सर्दी- खोकला झाला, आज काय खाल्लं, आज कोण काय म्हणालं हे लिहिणारे अटेन्शन सिकर ठरतात. अशा अटेन्शन सिकर लोकांनाही काम देण्यात कुणाला रस नसतो. त्यामुळे जरा जपून!