शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

जंगलातला तंबू.

By admin | Updated: May 1, 2014 14:53 IST

ओऽऽऽ ठोका आरोळी.. किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव घ्या आणि मारा तिला हाक. घनघोर दरीच्या दुसर्‍या टोकाकडून तीच साद आपल्याला परत ऐकायला येते.

 कॅम्पिंगओऽऽऽ ठोका आरोळी.. किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव घ्या आणि मारा तिला हाक. घनघोर दरीच्या दुसर्‍या टोकाकडून तीच साद आपल्याला परत ऐकायला येते. वार्‍याचा तो वेग, समुद्राची गाज, निसर्गाचं संगीत, झर्‍यांचं गीत, घनगर्द जंगल, धरतीवर पोहोचण्याआधीच संपलेला चांदण्याचा प्रकाश, आकाशात पोहोचलेले कडे आणि हातात हात घालून डोंगरांनी केलेली लांबच लांब साखळी.डोंगरदर्‍यातून आणि दगडधोंड्यातून वाहणार्‍या नितळ, स्वच्छ पाण्याचा वेडावणारा गोडवा, मधूनच कुठून तरी दिसलेल्या जंगली प्राण्यांच्या खुणा, त्यांचे अस्तित्व किंवा अगदी समोरून त्यांनी दिलेलं दर्शन.अंगावर सरसरून उभा राहिलेला काटा, काळाकभिन्न अंधार, उघड्यावरच टाकलेली पाठ, तंबूत घालवलेली रात्र, मी म्हणणार्‍या थंडीत शेकोटीच्या साक्षीनं आणि मित्र-मैत्रिणींच्या साथीनं त्या वैराण रात्री गाणी-गप्पांच्या मैफलीत सरलेली अविस्मरणीय रात्र.सिमेंट कॉँक्रीटच्या आपल्या जंगलात असला अनुभव कुठला मिळायला?.त्यासाठी पाठीवर सॅक अडकवून, मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं जमवून निसर्गाच्या संगतीत काही रात्री घालवाव्याच लागतात.कधी अनुभवलाय हा रोमांच?फार विचार नको, बॅग पॅकिंग करा आणि सुटा.नाहीच विसरता येणार ते क्षण.अनुभव१६ जुलै १९९८ची रात्र.मी कधीच विसरू शकणार नाही.त्या रात्रीनं माझं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. माझं मूळ गाव परभणी. तिथेच माझं शिक्षण झालं. त्यावेळी मी कॉलेजला होतो. एका कॅम्पमध्ये ‘व्हॉलंटिअर’ म्हणून काही मित्रांबरोबर मेळघाटात गेलो होतो.हातरू. मेळघाटातलं एक अगदी लहानसं आदिवासी गाव. परभणीहून अमरावती, परतवाडा अशा गाड्या बदलत रात्री आठ वाजता हातरूला पोहोचलो. तिथून पुढे चिलाटीला जायचं होतं. दोनच किलोमीटरचं अंतर, पण रात्री तिथे जाणं शक्यच नव्हतं. तिथल्या एका रेस्ट हाउसच्या पडवीत आम्ही मुक्काम ठोकला. पडवी चारही बाजूंनी उघडीच, वर फक्त पत्रा टाकलेला. त्या पडवीतच आम्ही सार्‍यांनी अंग टाकलं.माझ्या आयुष्यातला हा पहिलाच ‘कॅम्प’, एका वेगळ्या अनुभवासाठी आणि स्वत:लाही चाचपून पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो.घरापासून इतक्या लांब मी पहिल्यांदाच आलो होतो.सारं काही माझ्या कल्पनेपलीकडचं.माझा जन्म खेड्यातला असला आणि खेडी मी पाहिलेली, अनुभवलेली असली तरी आता मी शहरात राहात होतो. पण असलं गाव आणि खेडं मी पहिल्यांदाच पाहात होतो.संपूर्णपणे आदिवासी गाव, तिथली माणसं जंगलात राहणारी, माणसांना घाबरणारी, शहरी, अपरिचित ‘माणसं’ पाहून पळून जाणारी, आपल्याला न समजणार्‍या अगम्य आदिवासी भाषेत बोलणारी.तिथलं जंगलही तसंच. अफाट. चारही बाजूंनी फक्त झाडी आणि जंगल. ‘जंगल’ मी पाहिलं होतं, पण याला ‘जंगल’ म्हणतात, हे मला पहिल्यांदाच कळलं. पाऊस इतका धो धो कोसळत होता की, असा प्रपाती पाऊस पाहून मला भीतीच वाटली. खेड्यातल्या रात्री मला नव्या नव्हत्या, पण इथली रात्र. आणि तिथला काळोख. अंधार इतका दाट असतो मला माहीतच नव्हतं.आम्ही पडवीत झोपलेलो. सगळंच काही नवीन आणि अपरिचित. त्यात ‘उघड्या’वर झोपलेलो. भयाण अंधारी रात्र आणि छाताडावर ताडताड नाचणारा पाऊस. खरंच खूप भीती वाटत होती. टक्क जागा. रात्रभर एक सेकंदही डोळ्याला डोळा लागला नाही. थकव्यामुळे पहाटे चार वाजता डोळ्यावर थोडी झापड आली, १५-२0च मिनिटं, पण थोड्याच वेळात थोडासा गलका सुरू झाला. लगेच उठलोही, तर कळलं, पडवीपासून जवळच असलेल्या बकरीला वाघानं फाडून खाल्लं होतं. अंतर फक्त काही फूट! डोक्यात विचार आला, त्या काळोखात वाघानं आपल्यावरच झडप घातली असती तर?. - एकदम काळीजच हललं.वाटलं, कशाला मरायला आलो, आपण इथे?.- माझ्या पहिल्याच कॅम्पचा हा थरारक अनुभव. पण काही दिवस तिथे राहिलो, काही महिन्यांनी नंतरही पुन्हा एकदा तिथे आलो.कोण, कुठला मी, कधी जंगल आणि आदिवासीही न पाहिलेला एक कोवळा तरुण.पण त्यावेळी कुठे माहीत होतं, त्या घनदाट जंगलातले आदिवासी आणि आजही रस्ता, वीज नसलेला हा परिसरच माझं आयुष्य होणार आहे. मला वेड लावणार आहे.१९९८च्या डिसेंबरपासून मी त्या जंगलातच राहायला गेलो. आदिवासींमधला एक झालो. १६ वर्षं झाली, आजही मी तिथेच आहे.- रामेश्‍वर फड, ‘मेळघाट मित्र’ चिलाटी, परतवाडा, अमरावतीकाय करावं / टाळावं?1. रामेश्‍वरचा अनुभव थोडा वेगळा आहे, तो ‘कॅम्प’ ला गेला आणि तिथलाच झाला, पण कुठल्याही कॅम्पला जाण्याआधी कोणाबरोबर आपण जात आहोत, त्यांचं रेप्युटेशन काय, हे बघायला हवं.2. मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं जमवून आपण स्वत:च जाणार असू, तर त्यात कोणीतरी किमान एक जाणकार हवा. 3. निसर्गात आपण जात आहोत, तर तिथे निसर्गाचेच नियम पाळायला हवेत, आपल्या घातक आणि वाईट ‘सवयी’ किमान इथे तरी बाजूलाच ठेवायला हव्यात.प्रशिक्षण कुठे, कोण देईल?महाराष्ट्रात आजकाल अगदी लहान गावापासून तर मोठय़ा शहरापर्यंत अनेक जण कॅम्पचं आयोजन करत असतं. ‘खात्री’ करून त्यांच्याबरोबर जायला हरकत नाही.