शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

चहावाला सीए सोमनाथ

By admin | Updated: February 4, 2016 20:48 IST

सोमनाथ गिराम. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील सांगवी गावच्या शेतकरी कुटुंबातला मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पैशापायी शिक्षण सुटलं म्हणून त्यानं पुण्यात येऊन लहानमोठय़ा नोक:या केल्या, चहाची टपरी टाकली, पण शिक्षण सोडलं नाही. आता तो सीए झालाय. आणि महाराष्ट्र शासनाच्या गरीब विद्याथ्र्यासाठीच्या ‘कमवा व शिका’ योजनेचा पहिलावहिला ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर’ही बनलाय.

 सोमनाथ गिराम. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील सांगवी गावच्या शेतकरी कुटुंबातला मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पैशापायी शिक्षण सुटलं म्हणून त्यानं पुण्यात येऊन लहानमोठय़ा नोक:या केल्या, चहाची टपरी टाकली, पण शिक्षण सोडलं नाही. आता तो सीए झालाय.

आणि महाराष्ट्र शासनाच्या गरीब विद्याथ्र्यासाठीच्या ‘कमवा व शिका’ योजनेचा  पहिलावहिला ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर’ही बनलाय.
 
 
स्वत: कमवून आपलं भवितव्य घडवणारा एक तरुण दोस्त. स्वत: कमवा, शिका आणि शिक्षण सोडू नका असं खेडय़ापाडय़ातल्या दोस्तांना सांगणा:या योजनेचा तो आता चेहरा बनलाय!
 
 
  - प्रज्ञा केळकर-सिंग
 
 
 
‘‘अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, आमीर खान यांच्यासारखी वलयांकित मंडळी ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर’ होतात हे माहीत होतं; पण माङयासारखा सामान्य माणूसही ‘ब्रॅण्ड’ची ओळख म्हणून झळकू शकतो हे समजल्यावर आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. आता खूप काम करायचंय, खूप सुखात जगायचंय..’’ - तो अतिशय उत्साहाने बोलत होता. बोलण्यातली चुणूक आणि डोळ्यातली चमक त्याच्या यशाची साक्षीदार होती.
सोमनाथ गिराम त्याचं नाव.
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील सांगवी गावच्या शेतकरी कुटुंबातला हा मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पण, शिक्षणाच्या वेडाने झपाटलेल्या सोमनाथने अपार मेहनत घेत सीएच्या परीक्षेत यश मिळवलं.
आता तो महाराष्ट्र शासनाच्या ‘कमवा व शिका’ योजनेचा पहिलावहिला ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर’ बनला आहे.  
सोमनाथ म्हणतो, ‘‘शिक्षणाशिवाय परिस्थिती बदलत नाही. आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर पुढं जायचं ध्येय खेडय़ापाडय़ातल्या मुलांनीही बाळगलंच पाहिजे.  स्वत:ला झोकून देऊन आपली वाट चालणा:या तरुण दोस्तांना मला मदत करायची आहे.’’ 
मात्र कष्ट आणि जिंकण्यामधलं हे अंतर पार करणं त्याच्यासाठीही सहजशक्य नव्हतं. त्यासाठी नशिबावर अवलंबून न राहता अपार मेहनत आणि आत्मविश्वासाची जोड लागणार होती.  सोमनाथच्या आई-वडिलांची बेताची परिस्थिती. शेतावर मजुरी करून तिन्ही मुलांना शिकवायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. सोमनाथही  शेतमजुरीला जायचा. मात्र घरच्या परिस्थितीमुळे दहावीनंतर शिक्षण सोडावं लागलं. पण आपण शिकायचंच अशी जिद्द बाळगलेला सोमनाथ हरला नाही, रडला नाही. ‘रडायचं नाही, लढायचं’ हेच त्याच्या जीवनाचं ध्येय बनलं. 
तो पुण्यात आला. दुकानात काम करू लागला. जमेल तसे पैसे कमवून बारावीनंतर पदवीर्पयतचं शिक्षण  त्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केलं. मात्र सीए होण्याचं वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यानं हळूहळू सीएच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सीएच्या परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं, क्लासची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून सोमनाथनं सदाशिव पेठेत चहाची टपरी टाकली. 
सकाळी 5 ते 1क् या वेळेत अभ्यास करून तो चहाच्या टपरीवर जायचा. दिवसभर काम केल्यानंतर पुन्हा संध्याकाळी 8 पासून रात्री 1-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा.
 सोमनाथ सांगतो, ‘‘आजवर खूप कष्ट उपसले, त्या कष्टांनी फळ धरलं याचंच समाधान मोठं आहे. मला सामान्य माणसासारखं आयुष्य  कधीच जगायचं नव्हतं. उच्च दर्जाचं आयुष्य जगण्याचं स्वप्न मी उराशी बाळगून होतो. ते स्वप्न आता हळूहळू सत्यात उतरतं आहे. आता संघर्ष संपला आहे. माझा आणि घरच्यांचाही! या मधल्या काळात आई-वडिलांचं आजारपण, बहिणीचं लगA, बाळंतपण यासारख्या जबाबदा:या पेलता पेलता घरच्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आता ते सगळं कर्ज फेडून घरच्यांना मोकळा श्वास घेऊ द्यायचाय.’’
सोमनाथकडून हे सारं ऐकताना त्यानं सांगितलेली अवघड वाटही आठवत राहते. सीए व्हायचं त्यानं ठरवलं, कसून तयारी केली; पण पहिल्या प्रयत्नात काही त्याला यश लाभलं नाही. एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा यश हुकलं. प्रत्येक वेळी 2-3 मार्कासाठी यश वाकुल्या दाखवायचं. या सततच्या अपयशाने सोमनाथ खचला होता. घरचेही हताश होत होते. परीक्षेची तयारी सोडून नोकरी करून घराला हातभार लाव म्हणून त्याच्या मागे लकडा लागला होता.
आता हा शेवटचाच प्रयत्न असं स्वत:ला बजावून त्यानं जीव तोडून रात्रंदिवस अभ्यास केला. ज्या विषयांनी त्याला वाकुल्या दाखवल्या होत्या त्या विषयांवर प्रभुत्व मिळवायचा चंग  बांधला. 
यावेळेस त्याच्या मेहनतीनं दगा दिला नाही. तो सीए परीक्षा उत्तीर्णही झाला. आणि थेट ‘सेलिब्रिटी’ झाला! शासनासह अनेक संस्था, संघटना यांनी त्याचा सन्मान आणि कौतुक केलं.  
 
 
‘‘परिस्थिती शिक्षणात कधीच अडथळा ठरू शकत नाही. प्रामाणिकप्रयत्न, मेहनत आणि  आत्मविश्वासाच्या जोरावर आपण परिस्थितीवर विजय मिळवायलाच हवा. ध्येय गाठण्याच्या आपल्या वाटेवर अनेक चांगली माणसं भेटतात. मदतीसाठी पुढे सरसावतात. आपण प्रयत्न केले तर मदत मिळतेच. मला वाटतं, स्वत:वर विश्वास असेल तर जगातील कोणतीच गोष्ट आपल्याला ध्येयापासून दूर ठेवू शकत नाही.’’
 
 
 
श्रमसंस्काराची योजना
 
 घरची परिस्थिती बेताची असतानाही केवळ शिकण्याची जिद्द, कष्ट घेण्याची तयारी यातून आपल्या क्षमतांचे क्षितिज विस्तारू पाहणा:या तरुण मुलांसाठी ‘कमवा आणि शिका’ ही योजना उपलब्ध आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रथमत: ‘कमवा आणि शिका’चा मूलमंत्र दिला. यातून ग्रामीण भागात, तळागाळात, वाडय़ा-वस्त्यांवर शिक्षणाचा प्रसार झाला. आणि आजही ती योजना तरुण मुलामुलींसाठी मदतीचा हात म्हणून कार्यरत आहे.
उच्च शिक्षण घेत असताना विद्याथ्र्यामध्ये श्रमसंस्कारही रुजावा या हेतूने ‘कमवा आणि शिका’ योजनेतून श्रमालाही प्रतिष्ठा मिळते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप:यातला तरु ण आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने धडपडतो. या धडपडीला या योजनेमुळे मूर्त स्वरूप मिळतं आहे. महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत असताना भरमसाठ फी भरण्याचं ओझं पालकांना वागवावं लागू नये, आपणच कमवून आपला शिक्षण खर्च भागवावा असं ज्यांना वाटतं, ते या योजनेत काम शोधतात.
ही योजना राज्यात सर्वात प्रभावीपणो सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठात राबविण्यात येत आहे. विद्यापीठ व विद्यापीठाअंतर्गत येणा:या पुणो, नगर, नाशिक येथील संलग्न 4क्क् महाविद्यालयात ही योजना सध्या कार्यान्वित आहे. विद्यापीठातून 75क् विद्यार्थी याचा लाभ घेतात. 45क् महाविद्यालयातून तब्बल 15 हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचा लाभ घेऊन शिकलेली अनेक मुलं आज उच्चपदस्थ आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक संजयकुमार दळवी यांनी दिली.
 
 
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?
 
*ज्या विद्याथ्र्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांर्पयत आहे, ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. 
* यापेक्षा कमी उत्पन्न असणा:या विद्याथ्र्याच्या पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. 
* या योजनेत कमीत कमी 3क् टक्के सहभाग मुलींचा असणं अनिवार्य आहे. 
* विकलांग विद्यार्थी, मुली यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. 
* पदवी अथवा पदव्युत्तर वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 
कमवा व शिका योजनेअंतर्गत कुठली कामं केली जातात?
 
सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आणि विविध कौशल्यं अवगत होण्याकरता तरुण मुलांना विविध कामं सांगितली जातात.
1) नर्सरीच्या माध्यमातून रोपं तयार करणं.
2) विद्यापीठास किंवा महाविद्यालयास आवश्यक स्टेशनरी साहित्य तयार करणं. उदा. पॅड, फाईल, वह्या, पाकिटं इत्यादि.
3) टेलिफोन कॉल सुविधेमध्ये वसतिगृह प्रशासनाला मदत करणं.
4) ज्या विद्याथ्र्याना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सुतारकाम अशी कामं येत असल्यास किंवा या कामाची माहिती आणि आवड असल्यास ही कामं करण्याची संधी.
5) विद्यापीठात किंवा महाविद्यालयात शैक्षणिक प्रयोगशाळेत सहायक म्हणून काम करणं. तेथील उपकरणो हाताळण्याचं प्रशिक्षण घेऊन ती कामं करणं.
6) टायपिंगची तसेच मुद्रणालयातील कामं.
7) विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील विभागप्रमुख व प्राध्यापकांना संशोधनासाठी सहायक म्हणून मदत करणं.
8) महाविद्यालय, संस्थेच्या ग्रंथालयात मदतनिस म्हणून काम करणं.
9) विविध विभागांत संगणकावर आधारित कामं करणं.
 
 
कामाचे तास किती?
* विद्याथ्र्याला प्रत्येक दिवशी जास्तीतजास्त चार तास कार्यालयीन काम देता येतं.
* विद्याथ्र्याला प्रत्येक दिवसाला जास्तीत जास्त तीन तास फील्ड वर्क करता येतं. कार्यालयाला सुट्टी असेल त्या दिवशीही फील्ड वर्क करता येतं.
* महिन्याला जास्तीजास्त 9क् तास इतकं काम देण्यात येतं.
*  15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या दिवशी विद्याथ्र्याना कामं दिली जात नाहीत.
 
पैसे किती मिळतात?
‘कमवा व शिका’ योजनेत काम करणा:याला केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ताशी 3क्  रूपये मानधन दिलं जातं.  मात्र  या पैशासह मुलांना मिळणारा प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आत्मविश्वास आणि स्वयंनिर्भर असण्याची जाणीव हे सारं शिक्षण घेऊन पुढे जाण्याच्या वाटेवर बळ देणारं ठरतं.