शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भारताला ‘चवदार ऊर्जा’

By admin | Updated: March 23, 2017 09:25 IST

ग्रामीण भागात ऊर्जेची मोठी गरज असते, विशेषत: स्वयंपाकासाठी. गॅस परवडत नाही आणि बहुतांश ठिकाणी आजही चुलीला पर्याय नाही.

 ‘गॅस’ साठवू शकणारं युनिट

ग्रामीण भागात ऊर्जेची मोठी गरज असते, विशेषत: स्वयंपाकासाठी. गॅस परवडत नाही आणि बहुतांश ठिकाणी आजही चुलीला पर्याय नाही. त्यासाठीचा लाकूडफाटा मिळणंही आता तितकंसं सोपंही राहिलेलं नाही आणि तो स्वस्तही नाही. शिवाय स्वयंपाकासाठी चुलीत लाकडं जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होतं ते वेगळंच. सतत धुराजवळ बसल्यामुळे तर ग्रामीण भागातल्या बायकांच्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा आणि दूरगामी वाईट परिणाम होत आहे.ग्रामीण भागात ‘बायोमास’ म्हणजे जैविक इंधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं, असंही ते वायाच जातं, त्याचं ऊर्जेत रुपांतर करून स्वयंपाकासाठी निर्धोक अशी यंत्रणा बायोगॅस प्लान्ट्समुळे अस्तित्वात आली. मात्र एक मुख्य त्रुटी या बायोगॅस प्लान्ट्समध्ये होती आणि आजही आहे ती म्हणजे, या प्लान्ट्सपासून तुमचं घरं किंवा स्वयंपाकाची खोली जर जास्त लांब असेल तर या प्लान्टचा तुम्हला फारसा उपयोग नाही. शिवाय या ‘बायोगॅस प्लान्ट्स’मधून तयार होणारा गॅस साठवायची कोणतीच सोय त्यात नाही.उत्तर प्रदेशातल्या अजयकुमार शर्मा या तरुणानं हीच गैरसोय नेमकी ओळखली आणि बायोगॅस युनिटपासून तयार होणारा गॅस सिलिंडरमध्ये साठविण्याची एक नवी पद्धत विकसित केली. हे सिलिंडर कुठेही नेता येऊ शकत असल्याने आणि अतिरिक्त गॅस तयार झाल्यास तो दुसऱ्या ठिकाणी वापरण्याचीही मोठी सोय झाली.यामुळे ‘बायोगॅस प्लान्ट’ तुमच्या अंगणातच असण्याची गरजही संपली. वैयक्तिक गरजेपोटी केलेल्या या संशोधनातून संपूर्ण ग्रामीण भारताला त्याचा उपयोग होऊ शकतो.अजयनं त्यासाठी काय केलं?त्यानं तयार केलं एक छोटंसं बायोगॅस कॉम्प्रेसर मशीन. ते ऊर्जेची बचत करणारं तर आहेच, पण तुलनेनं स्वस्तही आहे.शेतकऱ्यांनी आपल्या अंगणात बसवलेल्या ‘बायोगॅस प्लान्ट’मधून तयार होणारा गॅस साठवून ठेवण्याची कोणतीच सोय पूर्वी नव्हती, अजयनं तयार केलेल्या या कॉम्प्रेसर मशीनमुळे हा गॅस भरून ठेवता येण्याची खूप मोठ्ठी सोय झाली. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त गॅस या सिलिंडर्समध्ये बसवता यावा अशीही सोय अजयनं आपल्या मशीनद्वारे करून दिली आहे. एक इंच जागेत तब्बल दोनशे पाऊंड गॅस या यंत्रामुळे बसवता येऊ शकतो. अजयनं आपल्या युनिटला दीड हॉसपॉवरची मोटर बसवली असून तीन हॉर्सपॉवरचं कॉम्प्रेसर त्यावर चालू शकतं. त्याशिवाय बॅटरीवरही चालू शकणारी एक हजार वॅटेजची डीसी मोटर या युनिटला जोडलेली आहे. कुठल्याही कारणानं हे युनिट बंद राहू नये यासाठी सोलर एनर्जीवर हे युनिट चालवण्याची सोयही अजयनं करून ठेवली आहे. हे कमी म्हणून की काय, या युनिटला त्यानं एक फ्लाय व्हीलही बसवलेलं आहे. समजा वीज नसेल, तुमच्याकडे बॅटरी नसेल आणि सूर्यप्रकाशही नसेल, तरीही तुमचं काही अडू नये यासाठी त्यानं आपल्या युनिटला दोन गिअर, एक पुली आणि एक फ्लाय व्हील बसवलेलं आहे. हातानं हे व्हील फिरवलं की तुमचं काम झालं! कुठल्या इतर ऊर्जेचीही मग तुम्हाला गरज नाही. तुमची शारीरिक ऊर्जा तुम्हाला ‘नवी ऊर्जा’ मिळवून देईल. तयार होणारा गॅस कोणत्याही कारणानं दुषित किंवा कमी प्रतिचा राहू नये यासाठी बायोगॅस अगोदर फिल्टर केला जातो, पाणी आणि लिंबानं तो स्वच्छ केला जातो. त्यामुळे त्यातील दुषित वायू आणि कार्बन डायआॅक्साईड निघून जातो. त्यानंतरच हा गॅस कॉम्प्रेसरद्वारे त्यावर दाब देऊन कमी जागेत बसवला जातो. स्वयंपाकासाठी तयार झालेला हा गॅस सहजपणे भरता यावा यासाठीचे सिलिंडर्सही अजयनं विकसित केले आहेत. यासाठीही विजेची गरज भासू नये याचीही त्यानं काळजी घेतली आहे. अजयनं तयार केलेल्या या बहुपयोगी युनिटमुळे ग्रामीण भागाला नवी ऊर्जा मिळाली नाही तरच नवल!