शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

टॅँक-टी-रंगीत चप्पल

By admin | Updated: July 2, 2015 14:59 IST

पावसाळी फॅशनचाही एक मौसम असतोच, यंदा त्या मौसमात स्कर्टसारख्या पॅण्ट आणि निऑन कलरची धूम आहे!

श्रवणी बॅनर्जी
पावसाळी फॅशनचाही एक मौसम असतोच, यंदा त्या मौसमात स्कर्टसारख्या पॅण्ट आणि
निऑन कलरची धूम आहे!
--------------
पावसाळा सुरू झाला की, पहिला प्रश्न असतो, घालायचं काय?
विशेषत: मुलींसाठी?
पावसात कपडे ओले होतात, भिजतात. जिन्स वापरता येत नाहीत कारण त्या भिजल्या की लवकर वाळत नाहीत. घाणोरडे वासही येतात. ओल्याच अंगावर ठेवल्या की, त्यामुळे त्वचेचे आजार सुरू होतात. 
म्हणजे मग आलाच प्रश्न की, घालायचं काय? बरं, आपल्याकडे काही फार लहान कपडे घालून चालत नाहीत. मग असं काहीतरी घालायला हवं जे फॅशनेबल पण असेल आणि तरीही पावसाळ्यात मस्त आणि वावरायला सोपं असेल!
 
पावसाळ्यात
इन  फॅशन
 
1) कुलट्स (culottes) - स्कर्टसारखी पॅण्ट
 
जरा अवघड आहे हा शब्द. पण आहे फार भन्नाट प्रकार. आणि यंदाच्या पावसाळ्यात सगळ्यात फॅशनेबल. फॉर्मलही आहेत, तरीही ट्रेण्डी. या पॅण्टच असतात. पण घेरदार. गुडघ्यार्पयत अॅडजस्ट करता येतात. घातल्यावर स्कर्ट सारख्या दिसतात. पीकूमधे याच प्रकारतल्या लांब पॅण्ट्स दीपीकानं घातलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही यंदा काही वेगळं ट्राय करणार असाल तर हा प्रकार भन्नाट आहे.
 
2) टॅँक आणि लूज टीज
आता हे काय नवीन असं वाटलं असेल तर नवीन काही नाही. हे टी शर्टचेच प्रकार आहेत. या पावसाळ्यात कॉलेजात जाणा:या मुलींमधे तरी याचीच फॅशन आहे. ढगळे शर्ट आणि किंवा हे घट्ट टॅँक आणि त्यावर शर्ट्स हे कॉम्बिनेशन पावसाळी फॅशनचं एक उत्तम रूप आहे.
 
3) एक रंगीला स्कार्फ
आता स्कार्फ ही काय फॅशन होऊ शकते का, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.  एक ब्राईट कलरचा मस्त स्कार्फ ही पावसाळ्यात सगळ्यात आवश्यक गोष्ट. खांद्यावर, गळ्याभोवती हे स्कार्फ गुंडाळता येतात. स्कार्फ हे एक वेगळं फॅशन स्टेटमेण्ट ठरू शकतं. पावसाळ्यासाठी गुलाबी, केशरी, निळा, समुद्री हिरवा अशा रंगाचे स्कार्फ घेता येतील.
 
4) पावसाळी पिकनिकसाठी शॉर्ट्र्स
 
पावसाळी पिकनिक होतेच मग तेव्हा काय घालणार, पंजाबी ड्रेस? त्यापेक्षा थ्रीफोर्थ शॉर्ट्स घ्या. उत्तम मापाची ही पॅण्ट पावसाळी पिकनिकसाठी उत्तम. पण तुम्ही नेहमी ती वापरत नसाल तर घोटय़ार्पयतच्या पॅण्ट घ्या, त्याही  मापातल्या, पावसाळ्यात त्या उत्तम.
 
5) रंगीत चपला
 
त्या रबरी रंगीत चपलांना हल्ली फ्लिप फ्लॉप्स म्हणतात. त्यातही निऑन कलरच्या चपला सध्या मस्ट आहेत. सध्या फॅशन काय आहे तर, आपल्या ड्रेसला मॅचिंग रंगीत चप्पल घालायची.
 
6) छत्री-घडय़ाळ-मोबाईल कव्हर
 
आता या काय पावसाळी वस्तू आहेत का? पण यंदाही त्याचीही धूम आहे. निऑन कलरच्या छत्र्या,  आणि निऑन कलरचे मोबाईल कव्हर, हे सध्या स्वस्तात मस्त फॅशनमधे जमा आहे.