शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या केसात स्टायलिंगचे कोंबडे

By admin | Updated: June 19, 2015 04:02 IST

हेअरस्टाईल्स हा मुलींचा विषय हा समजच आता तरुण मुलांनी मोडीत काढलाय ! अनेक भन्नाट आणि बिंधास हेअरस्टाईल्स करत, केस रंगवत तरुण मुलं स्वत:लाच एक स्मार्ट लूक देत सुटलेत ! ‘कटिंग’ बंद करून ‘स्टायलिंग’ करत एक नवाच ट्रेण्ड आता जन्माला आलाय !

- रवळनाथ पाटील
 
हेअरस्टाईल म्हटलं की मुलींच्याच हेअरस्टाईलचे चर्चे !
पण तरुण मुलांच्या डोक्यावरील बदलत्या नक्षीचा कुणी वेध घेतंय का?
अलीकडे तरुण मुलांच्या जगात नवनव्या हेअरस्टाईलने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. अक्षरश: केजीपासून ते कॉलेजर्पयतच्या सर्वच मुलांकडे सरासरी पाहिले तर आपल्याला त्यांच्यात सध्या काहीतरी बदल झालेला जाणवेल !  
त्यांच्या पर्सनॅलिटीलाच या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स एक नवा आयाम देत आहेत.
आपल्या सौंदर्यात आणि व्यक्तिमत्त्वात मोलाची भर देण्यासाठी नेहमीच्या हेअरस्टाईलपेक्षा एक वेगळी स्टाईल करण्याकडे तरुणांचा मोर्चा वळत आहे. विशेष म्हणजे, अनेकांचे पालकसुद्धा या बदलत्या हेअरस्टाईल्सकडे कौतुकानं पाहत आहेत.
बलून कट, स्टेप कट, मशरूम कट, स्पाईस कट, झीरो कट, क्र ॉस कट या हेअरस्टाईल सध्या चर्चेत आहेत. बझकट स्टाईल, मोहॉक स्टाईल, क्रेझी केसी स्टाईल, ट्रॉय स्टाईल, माइटी मॅक्स स्टाईल, कूल केसी स्टाईल, इग्जी इडी स्टाईल, झॉन स्टाईल, चिक्की मेटी स्टाईल, स्केटर लॉरेंझो स्टाईल, हँडसम स्टाईल, लुकास स्टाईल, रॉकर रिगन या अनेकांनी नावंही न ऐकलेल्या स्टाईलची मोठी क्रेझ आहे. त्यातच हेअर कलरिंगचाही ट्रेंड आला आहे. मुलींच्या प्राबल्याचं हे क्षेत्र आता मुलांनी जणू खालसाच करायला घेतलं आहे. 
गेल्यावर्षी 2014 मध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डमध्ये खेळाडूंनी ठेवलेल्या हेअरस्टाईलचा ट्रेंडही तितकाच चर्चेचा ठरला आणि खेळाडूंची ही हेअरस्टाईल अनेक तरुणांच्या डोक्यावर उतरली. यात ख्रिस्तिआनो रोनाल्डो, डिले ब्लिंड, रहीम स्टेरलिंग, केली बकरमन, अॅसमोह ग्यान, जिरॉर्ड यासारख्या टॉपच्या खेळाडूंनी ठेवलेली हेअरस्टाईल मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झाली होती. याचबरोबर यंदाच्या क्रिकेट वल्र्डकपमध्येही खेळाडूंची आणि त्यांच्या फॅनची हेअरस्टाईलसुद्धा पाहण्यासारखी होती. तसेच चित्रपटांसाठी हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या क लाकारांनी केलेल्या हेअरस्टाईलचीही कॉपी करण्यात तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ वाढत आहे. भारतात तर आपल्या आवडत्या कलाकाराची कॉपी करण्यात त्यांचे फॅन काही आपल्याकडे कमी नाहीत. त्यातच त्यांच्यासारखी वेशभूषा आणि केशभूषा म्हणजेच हेअरस्टाईल करण्यात मागे नाहीत. 
म्हणून मुलांच्या डोक्यावर स्वार झालेल्या या हेअरस्टाईलिंगची ही एक झलक.
 
तरुणांच्या डोक्यावर चढलेल्या टॉप फाइव्ह हेअरस्टाईल्स....
 
1) मोहॉक हेअरस्टाईल...
मोहॉक हेअरस्टाईल ही मोहॉक या देशापासून आली आहे. येथील लोकांनी त्यांच्या डोक्यावर बाजूने बारीक आणि मध्यभागी कोंबडय़ाला असलेल्या तु:यासाखरे केस राखून एक वेगळ्या प्रकारची ठेवलेली ही हेअरस्टाईल. तसेच या स्टाईलमध्ये डोक्यावर वेगवेगळे टॅटू आणि कलरिंगही तयार करण्यात येते. यामध्येही अनेक उपप्रकार पाहायला मिळतात. तसेच, मोहिकन किंवा माहिकन असेही या हेअरस्टाईलला संबोधले जाते. डोक्यावर जास्त तु:यांसारखे केस ठेवल्यावर केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. गेल्या फिफा वल्र्डकपच्या ख्रिस्तिआनो रोनाल्डो, न्येमार, रहीम स्टेरलिंग, केली बकरमन, अॅसमोह ग्यान, जिरॉर्ड हे खेळाडू अशा हेअरस्टाईलमध्ये दिसून आले होते. तसेच सध्या क्रिकेटमध्ये आक्रमक असलेला खेळाडू विराट कोहली आणि सुनील नरेन यांनीही या हेअरस्टाईलमधील एक प्रकार ठेवला होता आणि त्याची चर्चाही झाली होती. खासकरुन विराटची हेअरस्टाईल पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये अशी हेअरस्टाईल पाहायला मिळाली आणि ती काही ठिकाणी त्याच्या नावानेही म्हणजेच कोहली स्टाईल अशी संबोधण्यात येऊ लागली आहे.
 
2) बझ कट हेअरस्टाईल...
बझ कट हेअरस्टाईल मुलांसह अनेकांना आवडणारी आहे. ही हेअरस्टाईल वेगवेगळ्या देशांत परिचयाची असून, अशी हेअरस्टाईल जास्त करुन सशस्त्र दलातील जवानांच्या ताफ्यात दिसून येते. तसेच, जवानांच्या ट्रेंनिग परेडमध्ये बझ कट हमखास दिसून येतोच. एकदा का बझ कट केल्यास के सांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते. कारण डोक्यावर कमी केस असल्यामुळे लो-मेंटेनन्समध्ये काम होते. म्हणून ही हेअरस्टाईल कोणीही विचार न करता ठेवण्याचा निर्णय घेतो. तसेच कोणत्याही वयामध्ये ठेवता येते. 
 
3) कर्ली हेअरस्टाईल...
कर्ली हेअरस्टाईल ही अनेक तरुणांना भावली ती म्हणजे, श्रीलंकेचा किक्रेटपटू मसिथ मलिंगामुळेच. मलिंगाने ठेवलेली ही कर्ली हेअरस्टाईल खूपच पॉप्युलर झाली आहे. कर्ली स्टाईल करताना केस लांब ठेवून त्यांना कुरळे करण्यात येते आणि कलरिंग करण्यात येते. परंतु मुळात केस कुरळे असणा:यांना अशी स्टाईल शोभून दिसते. यामध्येसुद्घा केस मध्यम, लांब असे वाढलेले असतील तर त्यांना मशीनद्वारे कुरळे करुन योग्य अशा पद्धतीने ब्राऊन, व्हाइट अशा वेगवेगळ्या कलरचे टेक्चरिंग करण्यात येते. यामुळे लूकमध्येही फरक जाणवतो आहे. मात्र या हेअरस्टाईलची जास्त काळजी घ्यावी लागते. गेल्या विश्वचषक आणि आयपीएलच्या फिव्हरमध्ये जणू अनेक यंगस्टर्समध्ये ही हेअरस्टाईल दिसून आली होती. त्याचबरोबर अनेक तरुणांसोबतच कोरिओग्राफर, म्युङिाक डायरेक्टर अशा मंडळींमध्येही सर्रास दिसून येते. 
 
4) स्पाइक हेअरस्टाईल...
स्पाइक हेअरस्टाईल ही तर सर्वत्र परिचयाची आहे. डोक्यावर मध्यम प्रमाणात केस ठेवून ही स्टाईल करण्यात येते. म्हणजेच कानापासून ते डोक्याच्या मध्यभागार्पयत एकसारखेच केस ठेवलेले असतात. तसेच वेडेवाकडे झालेले केस सरळ करुन स्ट्रेटनिंगद्वारे जेल लावून उभे केले जातात. यामुळे केस सिल्की आणि स्टाईलीश दिसतात. ही स्टाईल जास्त करुन कॉलेजच्या तरुणाईमध्ये दिसून येते. यात जास्त केसांची काळजी घेण्याची गरज नसते. मात्र केस सतत उभे राहण्यासाठी जेलचा वापर करावा लागतो. स्पाईक हेअरस्टाईलचा ट्रेंड आला, तो आमीर खानच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून. या चित्रपटात आमीरने ही स्टाईल ठेवली आणि त्याच्या चाहत्यांसोबतच अनेकांनी आपल्या डोक्यावर उतरवली. 
 
5) क्रू कट हेअरस्टाईल...
क्रू कट हेअरस्टाईल ही अठराव्या शतकापासून ते आत्तार्पयत जगभरात ओळखली जाणारी आहे. या क्रू कट स्टाईलला टाईड कट, फेड कट, ब्रश कट किंवा पोम्पाडोअर स्टाईल असेही संबोधले जाते. दुस:या महायुद्धात अमेरिकेतील जवानांनी अशी हेअरस्टाईल ठेवली होती. ही स्टाईल म्हणजे डोक्यावर ट्रीमर या मशीनद्वारे केस ठेवण्याचे प्रमाण कमी आणि दोन्ही बाजूने एकदमच बारीक केले जातात. सर्रास कोणत्याही व्यक्तीला शोभेल असा असणारा हा कट जास्त करून शाळा आणि कॉलेजमधील मुलांमध्ये पाहायला मिळतो. तसेच लष्करातील जवान आणि खेळाडूंमध्ये क्रू कट हेअर स्टाईल दिसून येते. 
 
तरुणांच्या  डोक्यावर स्टायलिंग किडा
सध्या मोहॉक स्टाईल करुन घेण्यात तरुणाईचा कल आहे. यामध्ये अनेक उपप्रकार आहेत. तसं पाहिलं तर गेल्यावर्षी 2014  च्या फिफा वर्ल्डकपपासून या नव्या स्टाईलचा किंवा ट्रेंडचा प्रवाह येण्यास सुरुवात झाली. मात्र यंदाच्या क्रिकेट वल्र्डकपमध्ये विराट कोहली, सुनील नरेन या खेळांडूसोबत अन्य काही खेळाडूंनी अशा प्रकारची हेअर स्टाईल ठेवली आणि त्यांच्या चाहत्यांसह एकंदरीत यंगस्टर्समध्ये या स्टाईलचे पेव फुटले. मोहॉक स्टाईलमधील टेम्पोरिअर मोहॉक कट, मोहॉक पोनीटेल कट स्टाईल करून घेण्यात 18 ते 25 वयोगटातील ग्राहक मोठय़ा प्रमाणात दिसून आले. त्यानंतर स्पाइक स्टाईलमध्ये क्रॉकोडाईल स्पाइक हेअरस्टाईलही काहींनी पसंत केली. त्याचबरोवर कर्ली हेअरस्टाईल, वाइल्ड र्क ल कट, टेम्पोरिअर क्रॉप कट, पॉम्पेडॉअर कट, साल्यसिंग क्रॉप कट म्हणजेच बझ कट, क्रू  कट या पद्धतीचीही हेअर स्टाईल काही जण करुन घेतात. तसेच यामध्येही अनेक ग्राहक असे आहेत की, त्यांच्या बॉडी लॅँग्वेजनुसार, पर्सनॅलिटीनुसार आणि प्रोफेशन पाहून कटिंग करून घेत असतात. गेल्या समर व्हेकेशनमध्ये लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या स्टाईलची आवड दिसून आली. कारण सर्रास शाळांमध्ये ठरावीक एकाच प्रकारच्या स्टाईलला कंटाळलेली असतात. मग यामध्ये अशा लहानग्यांना काहींचे पालक बझ कट किंवा क्रू  कट करण्यास सांगतात. नोकरी किंवा व्यवसाय करणारेही कॅज्युअल हेअरस्टाईल मोठय़ा प्रमाणात पसंत करतात. तसेच, आता केसांना चांगला नवा लूक द्यायचा म्हटला की त्यात कलरिंगही आलेच. मग त्या-त्या हेअरस्टाईलनुसार लाल, बरगंडी, ब्लॅक, ब्राऊन अशा कलरचे टेक्चरिंग करण्यात येते. कारण संपूर्ण केस कलर केल्यावर फारसा चांगला लूक येत नाही. मग केसांमध्ये स्पॉटसारखे थोडे कलर करायचे किंवा मग एकच बाजू कलर किंवा शेंडी (पोनी) असेल तर शेंडीला कलरिंग केले जाते. पण, सध्या व्हाईट केस करण्याची क्र ेझ आलीय. काही मंडळी मुद्दाम आपल्या केसांचा रंग व्हाईट करवून घेताना दिसत आहेत. केसांना कलर करण्याची स्टाईल तर आता फारच कॉमन झाली आहे. सध्या नव्या-नव्या ट्रेंडनुसार हेअरस्टाईल बदलताना दिसून येत आहे. त्यामुळे अत्याधुनिक प्रकारच्या मशीनरी वापरु न तरुण आपल्या डोक्यावर प्रयोग करत आहेत.
- तुषार चव्हाण,  मेन्स पार्लरचे संचालक