शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ये मास्क नहीं, स्टाईल स्टेटमेंट है ! मग तुमचं स्टेटमेंट कोणतं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 17:38 IST

मास्क न घालता 500 रुपये दंड की मास्क घालून रिबेल, बोल्ड, फॅशनेबल, ट्रेण्डी म्हणून मिरवणं सोपं, चॉइस तुमचा!

ठळक मुद्देमास्कवालं स्टाइल स्टेटमेण्ट

मार्चमधली ही गोष्ट. पॅरिस फॅशन वीकवर कोरोनाची काळी सावली होतीच. फॅशन इंडस्ट्रीला मोठा दणका बसेल असा अंदाज तेव्हाच वर्तवला जाऊ लागला होता.मात्र त्या फॅशन वीकमध्ये काही डिझायनर असेही होते, ज्यांनी इनकन्व्हिनियन्स हीच अपॉच्यरुनिटी म्हणत डिझायनर मास्क रॅम्पवर उतरवले आणि आगामी काळात मास्क हेच स्टाइल स्टेटमेण्ट नाही तर सोशल स्टेटमेण्ट बनतील असं म्हणत एक नवी वाट चालून पाहिली. अर्थातच त्याकाळी त्याचं कोणी कौतुक केलं नाही. मात्र आता सप्टेंबर मध्यावर येता येता  यूएस ओपन चॅम्पियन नाओमी ओसाकाने तर मास्क हे एक मोठं सोशल स्टेटमेण्ट करून टाकलं आणि अनेकांच्या लक्षात आलं की जे आपल्याला बोलायचं आहे ते, किंवा जे आपण आहोत ते या मास्कच्या मदतीने बोलता येतं. इतके दिवस टी-शर्ट लाइन्स हा एक बोल्ड स्टाइल प्रकार मानला जात होता, आता टी-शर्ट आणि मास्क यांचं कॉम्बिनेशनही लवकरच बाजारात येईल अशी चिन्हं आहेत. तरुण मुलंच कशाला, तरुणांच्या जगात ज्या स्टाइल स्टेटमेण्टची अलीकडे बरीच चर्चा झाली त्यात सर्वात वरचा नंबर होता तो इंग्लंडची राणी क्विन एलिझाबेथ यांचा. त्या प्रत्येक ड्रेसवर सध्या मॅचिंग रंगाचा मास्क घालत आहेत.आणि मॅचिंग-कॉण्ट्रा मॅचिंग, एथनिक, बोल्ड, रिबेल असे मास्कचे एकेक नवेच चेहरे आता समोर येत आहेत.अलीकडे गाजलेल्या मास्कची ही एक यादी पाहा, म्हणजे 500 रुपये दंड भरून मास्क न घालण्यापेक्षा मास्क वापरून फॅशनेबल होणं आता सोपं आहे.

1. यूएईची ख्यातनाम सिंगर अहलामने ज्वेलरी एम्ब्रॉयडरी केलेला एक मास्क घातलेला स्वतर्‍चा फोटो अलीकडेच ट्विट केला, त्याची जगभर चर्चा झाली. एम्ब्रॉयडरीवाले मास्क ही सध्याची नवी फॅशन आहे.2. इजिप्तचा डिझायनर सामे हग्राम याने ब्रायडल मास्क तयार केला, मोती लावलेला. तो पॅरिस फॅशन वीकमध्ये गाजला. मात्र आपल्याकडे त्याचं कोणाला कौतुक असावं, महाराष्ट्रात पैठणीचे, दक्षिणेत कांजीवरम, उपाडाचे आणि आसाममध्ये मुगा सिल्कचे मास्क लग्नात सजलेच.

3. डिस्ने कॅरॅक्टर्स मास्क ही सध्या एक जगभर आवडती लाट आहे.

4. अलीकडेच वेअरिंग मेकअप ऑन मास्क नावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात खूप फिरला, मास्क लावून मेकअप ही भलतीच क्रेझ ठरते आहे.