शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

मोनिका लंडनला मैदानात कोसळली, तरीही स्पर्धा पूर्ण केलीच...

By समीर मराठे | Updated: March 4, 2019 18:49 IST

जन्म झाल्यापासून मोनिका घराबाहेर आहे. खडतर वाटेवरून धावतेय. धावता धावता अनेकदा ती अडखळली, गेल्या वर्षी लंडनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तर आजारी असतानाही धावली, मैदानातच जवळपास कोसळली, पण तरीही स्पर्धा पूर्ण केली. तिचं धावणं आजही संपलेलं नाही. मोनिका सांगते, या धावण्यानं मला खूप काही दिलं, या प्रवासात अनेकांची साथ लाभली, त्यांचं ऋण कशात मोजणार?

ठळक मुद्देश्री शिवछत्रपती पुरस्कार.. अथक संघर्षाचं नाव मोनिका आथरे..२०१३मध्येही मोनिकाचं नॅशनल कॅम्पमध्ये सिलेक्शन झालं, पण त्यावेळीही याच कारणानं मोनिकाला कॅम्प सोडावा लागला.

- समीर मराठे

मोनिका आथरेचा मैदानावरचा प्रवास आजही सुरूच आहे. या प्रवासात अनेक अडथळे आले, अनेकदा मैदानावर दुखापत झाली. करिअरच संपण्याची परिस्थिती निर्माण झाली, पण त्या त्या प्रत्येक वेळी ती पुन्हा उभी राहिली. नव्यानं संघर्ष केला. शुन्यातून पुन्हा सुरुवात केली. युवा खेळाडूंपुढे आज ती आदर्श आहे. संघर्ष आणि जिद्द काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव हे खेळाडू तिच्याकडून घेताहेत.२००८मध्ये मदुराईला ज्युनिअर युथ नॅशनलच्या स्पर्धा होत्या. या स्पर्धेत तीन हजार मीटर आणि १५०० मीटर स्पर्धेत मोनिकानं गोल्ड मेडल पटकावलं. तीन हजार मीटर स्पर्धेत तर ते त्यावेळचं नॅशनल रेकॉर्ड होतं.

मोनिका सांगते, याआधीही मी अनेक स्पर्धा खेळले, जिंकले, पण माझ्या प्रोफशनल करिअरला सुरुवात झाली ती इथूनच..याचवेळी आणखी एक घटना घडली. मोनिकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही घटना होती. खेळाडूंची प्रगती, त्यांची कामगिरी पाहून, उच्च दर्जाचं प्रशिक्षण त्यांना मिळावं यासाठी उत्तम खेळाडू निवडून भारत सरकारतर्फे नॅशनल कॅम्पमध्ये त्यांना पाठवलं जातं. देशातले उत्तमोत्तम खेळाडू इथे राहून प्रशिक्षण घेतात. त्यावेळी झालेल्या निवड चाचणीतून मोनिकाचंही बंगळुरुच्या सिनिअर नॅशनल कॅम्पसाठी सिलेक्शन झालं. मोनिका खरं तर ज्युनिअर खेळाडू, पण सिनिअर खेळाडूंच्या कॅम्पसाठी तिची निवड झाली! भारतात हे प्रथमच घडत होतं! याआधी कोणत्याच ज्युनिअर खेळाडूला सिनिअर कॅम्पमध्ये प्रवेश मिळालेला नव्हता. कविता राऊत, ललिता बाबरसारख्या देशातल्या सर्वोत्तम खेळाडूही तिथे होत्या. कविता तर मोनिकाची रुम पार्टनरच होती.नॅशनल कॅम्पमध्ये सिलेक्शन होणं ही कोणत्याही खेळाडूसाठी तशी खूपच मोठी गोष्ट. भारताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर जावेत यासाठी भारत सरकारनं त्यावेळी रशियन कोचची नियुक्ती केली होती.खेळाडंची या ठिकाणी चोख बडदास्त ठेवली जाते, देशातलं सर्वोत्तम दर्जाचं प्रशिक्षण इथे दिलं जातं, देशातले सर्वोत्तम खेळाडूही तुमच्या सोबत असतात, पण तरीही मोनिकाची म्हणावी तशी कामगिरी इथे होत नव्हती. पदकं तर येत होती, पण परफॉर्मन्स वाढत नव्हता. कॅम्पमध्ये दाखल झाल्यावर लहान-मोठ्या काही इंज्युरीजही तिला झाल्या. नी इंज्युरी झाली. गुडघ्यात पाणी झालं. ही इंज्युरी बरी व्हायला सहा महिने लागले.मोनिका सांगते, ‘दोन वर्षं मी या कॅम्पमध्ये होते, पण काहीच चांगलं घडत नव्हतं. माझी बॉडी तर अख्खी बसून गेली. ‘रगडा’ प्रॅक्टिसचाही हा परिणाम असावा. मी ‘ज्युनिअर’ होते आणि सिनिअर खेळाडूंचा सराव करीत होते. मसाला-तिखटाचा कण नसलेलं, नुसतं उकडलेलं डाएट माझं शरीर अ‍ॅक्सेप्ट करीत नव्हतं.’नॅशनल कॅम्प सोडून मानिकानं परत नाशिकला, आपले नियमित कोच विजेंद्रसिंग यांच्याकडे परतायचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१३मध्येही मोनिकाचं नॅशनल कॅम्पमध्ये सिलेक्शन झालं, पण त्यावेळीही याच कारणानं मोनिकाला कॅम्प सोडावा लागला.आपल्या कारकीर्दीत मोनिकानं पदकांची लयलूट केली, पण हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडथळ्यांवर मात करत आणि प्रत्येक वेळी स्वत:ला तासत तिला पुढे जावं लागलं. मोनिका सांगते, एक दिवसही सरावाला दांडी पडली, एखाद-दोन दिवस घरी जावं लागलं तरी डोळ्यांसमोर स्पर्धा दिसायला लागतात. सरावात खंड पडला तर काय होईल, या विचारानं मन कासावीस व्हायला लागतं. स्वत:लाच उत्तर द्यावं लागतं. हे स्वत:ाच उत्तर देणं फार फार कठीण असतं..’२००८ची गोष्ट. नॅशनल चॅम्पियनशिपसाठी मोनिकाला पुण्याला जायचं होतं. बस पकडायची घाई होती. झटपट रिक्षा पकडून ती बसस्टॅण्डवर आली. पुण्याच्या बसमध्ये चढणार तोच लक्षात आलं, सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट्सची फाईल ती रिक्षातच विसरली होती. त्यातच पासपोर्टही होता! ही सर्टिफिकेट्स नसती तर या स्पर्धेतलं तिची कामगिरी ग्राह्य धरली गेली नसती, स्पर्धेनंतर काही दिवसांत ही कागदपत्रं तिला सादर करायची होती.. मोनिका फारच टेन्शनमध्ये आली. विचार करायलाही वेळ नव्हता. ती तशीच स्पर्धेला गेली. तिथून परतल्यानंतरही तिनं फाईलची शोधाशोध केली. आठवडाभर मोनिका आणि तिचे आई-वडील प्रत्येक रिक्षावाल्याच्या घरी जाऊन चौकशी करीत होते. हवा तो रिक्षावाला शेवटी सापडला! फाईल सुरक्षित होती!मोनिकासाठी सर्वात मोठी घटना होती, ती म्हणजे गेल्या वर्षी सहा आॅगस्ट २०१७ रोजी लंडन येथे झालेली वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा. ४२ किलोमीटरची फूल मॅरेथॉन.वर्ल्ड चॅम्पियनशिप ही स्पर्धा किती कठीण असते, हे सांगताना मोनिका म्हणते, खरं तर आॅलिम्पिकपेक्षाही ही स्पर्धा कठीण मानली जाते. आॅलिम्पिकवर ज्यानं अधिराज्य गाजवलं, तो उसान बोल्टही या स्पर्धेत तिसरा आला, यावरुन या स्पर्धेचं काठिण्य लक्षात यावं!’पण यावेळीही मोनिकाचं दुर्दैव आडवं आलं. लंडनमधलं वातावरण, डाएट तिला मानवलं नाही. स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्या आठ किलोमीटरमध्येच तिचं पोट दुखायला लागलं. एकेक पाऊल टाकणं मुश्कील होत होतं..मोनिका सांगते, ‘स्पर्धेच्या वेळी खूप ऊन होतं, स्पर्धेच्या सुरुवातीलाचच अचानक पोटात भयानक कळा यायला लागल्या, डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली, कितीदा तरी वाटलं रेस सोडून द्यावी, पण प्रत्येक वेळी आठवला तो आपला देश, आजवर घेतलेले कष्ट, मेहनत, लोकांच्या अपेक्षा, या स्पर्धेसाठी भारतातून माझं एकटीचंच सिलेक्शन झालेलं, स्पर्धा मध्येच मी कशी सोडू शकत होते? हिंमत एकवटून मी पळत राहिले, पळत राहिले..’मोनिकानं स्पर्धा पूर्ण केली आणि जवळपास कोसळलीच. मैदानावरच मग तिच्यावर उपचार करण्यात आले.. पण याही अवस्थेत स्पर्धा पूर्ण केल्याचं अतिव समधान तिच्या डोळ्यांत झळकत होतं..लहानपणापासून मोनिका घराबाहेर आहे. गेली सतरा वर्षं झाली ती धावतेय. नाशिकच्या भोसला कॉलेजमध्ये तिनं शिक्षण घेतलं. तिथल्या मैदानावर सराव केला, करतेय, गेली दहा वर्षे झाली तिथल्याच होस्टेलमध्ये राहतेय, ‘डाएट’ सांभाळण्यासाठी बऱ्याचदा स्वत:च ते शिजवतेय, आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी एलआयसीची नोकरी तिनं पकडलीय, नोकरी सांभाळत स्वत:साठी, साऱ्यांच्या अपेक्षांसाठी, देशासाठी ती धावतेय..एलआयसीमधले तिचे सहकारी, अधिकाऱ्यांनीही तिला, तिच्या धावण्याला खूप उत्तेजन दिलं. प्रोत्साहन दिलं. देताहेत. खेळाडू, कोच, सोबती, मित्रपरिवार, कुटुंबिय.. या साºयांनीही वेळोवेळी तिची सोबत केली, तिचं मनोधैर्य वाढवलं. मोनिका सांगते, या सगळ्यांची मी ऋणी आहे..२०२०चं टोकिओ ऑलिम्पिक हे तिचं ध्येय आहे.. त्या स्वप्नासाठी आपलं सर्वस्व तिनं पणाला लावलंय..(लेखक ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहात उप वृत्तसंपादक आहेत.)sameer.marathe@lokmat.com

(लोकमतच्या ८ मार्च २०१८च्या ‘ऑक्सिजन’ पुरवणीत या लेखातील काही भाग प्रसिद्ध झाला आहे.)

(छायाचित्रे: प्रशांत खरोटे)श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा आणखी मजकूर वाचा याच ठिकाणी..http://www.lokmat.com/oxygen/ वर..

टॅग्स :shri shiv chhatrapati awardश्री शिवछत्रपती पुरस्कार