शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

थोडा प्रेम, थोडा गेम!- स्त्रीलिंग-पुल्लींग भेटा या हॉट वेबसिरीजच्या कलाकारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:08 PM

‘शुद्ध देसी मराठी’ या यू-टय़ूब चॅनलवर केवळ महिनाभरात दीड लाखाहून अधिक सबस्क्राइबर मिळवणार्‍या भन्नाट वेबसिरीजचा लेखक-दिग्दर्शक आणि तरुण कलाकारांशी विशेष गप्पा

ठळक मुद्देथोडा प्रेम, थोडा गेम या कॅचलाइनसह सांगणारी एक वेबसिरीज सध्या चर्चेत आहे; तिचं नाव ‘स्त्रीलिंग-पुल्लींग’

स्त्रीलिंग-पुल्लींग - हे सारं आपण शाळकरी वयात शिकतो, व्याकरण म्हणून! मात्र कॉलेजमध्ये जाता जाता या शब्दांचे वेगळे अर्थ उलगडत जातात, त्यातून काही गुंते होतात, काही प्रश्न निर्माण होतात आणि त्यातून बाहेर पडायची वाट शोधता शोधता आपलीच वाट बदलून जाते.अशाच काहीशा वळणानं जाणारी कॉलेजातल्या तारुण्याची गोष्ट. थोडा प्रेम, थोडा गेम या कॅचलाइनसह सांगणारी एक वेबसिरीज सध्या चर्चेत आहे; तिचं नाव ‘स्त्रीलिंग-पुल्लींग’ कॉलेजात शिकणार्‍या मुलीला कळतं की आपण प्रेग्नण्ट आहोत आणि त्यानंतर ती, तिच्या मैत्रिणी काय करतात याची गोष्ट उलगडत ही वेबसिरीज पुढं जाते.व्हॅलेण्टाइन्स डेनिमित्त ‘ऑक्सिजन’ने या वेबसिरीजचा लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील, त्याच्याबरोबर आरती, भाग्यश्री, सायली आणि नीलेश या तरुण कलाकारांशीच गप्पांचा एक अड्डा जमवला आणि त्यांनाच विचारलं की, वेबसिरीजच्या निमित्तानं तुम्ही कॉलेजात शिकणार्‍या आजच्या तारुण्याचा जो अभ्यास केला, जी निरीक्षणं नोंदवली, त्यांच्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज घेतला तेव्हा तुमच्या हाती काय लागलं? प्रेम-ब्रेकअप-शारीरिक जवळीक यात ही मुलं-मुली मनापासून गुंततात की ‘कॅज्युअल’ आहे म्हणतात, काय दिसलं या वेबसिरीजसाठी तपशील जमवताना?

कॅज्युअल; तरीही कमिटेड! ‘ आज कनेक्टिव्हिटी खूप वाढली आहे. खूप माणसं असतात प्रत्येकाच्याच संपर्कात. तरुण मुलांचंही तेच होतं. अनेकजण संपर्कात असतात. ऑप्शन्स खूप तयार झालेले असतात. त्यामुळे ब्रेकअप झाले तरी परत दुसरी कमिटमेण्ट करायला संपर्कात कुणी तरी असतं, ऑप्शन्स असतात. मात्र ते करताना आधीच्या नात्याबद्दल मनात फक्त कटुता राहिली आहे का, हे बघायला हवं. ती कटुता वाढत राहिली तर सोबत फक्त कडू आठवणी असतात. आयुष्य तो तो क्षण जगणं असतं, असे आपल्याला आनंदी-श्रीमंत करणारे क्षणही आठवायला हवेत. अर्थात, हे कॉलेजच्या वयात आठवत नाही, कुठंतरी तिशी उलटल्यावर जाणवतं. मुळात आताचेच तरुण चुकतात असं काही नाही, तर तारुण्यात चुका होतातच. आजवरच्या सर्व पिढय़ांनी तारुण्यात चुका केल्या. त्या चुकांमधूनच आयुष्य घडतं. चुका करण्याचंच असतं हे वय. मात्र आपण चुकतोय हे काहीजणांना लवकर कळतं, ते वेळीच सावरतात. काहींना उशिरा कळतं. मात्र तरुण मुलं प्रत्येकच पिढीत कन्फ्युज असतात, मात्र त्या गोंधळातून बाहेर पडण्याचा प्रय} करतात. त्यात चुका होतात, ते चुकांमधूनच शिकत जातात.हे जे बाकी आयुष्याचं आहे, तेच प्रेमाचंही. अनेकजण म्हणतात की, हल्ली मुलं प्रेमप्रकरणात फार ‘कॅज्युअल’ असतात. रीलेशनशिप कॅज्युअल असतात; पण मला वाटतं कॅज्युअल असणं ही पण एक प्रकारची मानसिक गुंतवणूकच आहे. मनानं गुंतल्याशिवाय कुठलंच नातं निर्माणच होऊ शकत नाही. त्यामुळे कॅज्युअल आहे की इण्टेन्स आहे असं नातं मोजण्यापेक्षा, ते टिकलं किती, त्यानं माणसांना दिलं काय, त्या नात्यात खटके किती उडाले असंही पहायला हवं. अनेकदा नात्यात राहून काही घडत नाही. अनेकदा नातं मोडायचं असून मोडता येत नाही. आणि कधी कधी तर ते नातं तोडून पळून गेलं तरी मनातून तो माणूस जात नाही, असं अनेकांच्या बाबतीत आजही होतं. हल्ली लॉँग डिस्टन्स नाती बरीच दिसतात. प्रियकर-प्रेयसी लांब लांबच्या शहरात राहातात. तरी ते कमिटेड असतात. चार-चार वर्षे नुस्तं फोनवर बोलून नातं निभावतात. एकत्र राहाणं म्हणजे कमिटमेण्ट, तर ही मनाची कमिटमेण्टही महत्त्वाची.  हे असे नात्याचे पोत लग्नाच्या कमिटमेण्ट इतकेच महत्त्वाचे दिसतात.

- समीर आशा पाटील(लेखक, दिग्दर्शक- स्त्रीलिंग-पुल्लींग)

भाषा ‘कनेक्ट’ होणं, साधंसं, काहीही आव न आणता व्यक्त होणं हे आमच्या आजच्या तरुण पिढीचं एक मोठं सूत्र आहे. ते मला महत्त्वाचं वाटतं.- आरती मोरे

पाश्चात्त्य संस्कृती, वन नाइट स्टॅण्ड याविषयी बोललं जातं, तरुण प्रेमात कॅज्युअल असतात अशी चर्चा होते. मात्र हे प्रत्येक माणसानुसार बदलतं, असं एकच सरसकट सगळ्यांसाठी काहीही नसतं.- भाग्यश्री न्हालवे

आपल्याला आत्ता या क्षणाला काय वाटतं, काय घडेल किंवा घडावंसं ते करण्यात गंमत आहे. तेच आता तरुणांना महत्त्वाचं वाटतं.- सायली पाटील

 सध्या क्लब कल्चर वाढलं आहे. डेट- हॅँग आउट हे शब्द कॉलेजात जाणार्‍या मुला-मुलींच्या जगण्यातही दिसतात. ते सगळं अनेकजण ट्रायआउट करून पाहतात आणि मग लक्षात येतंही अनेकांच्या की यात फार अर्थ नाही. आपण वेळीच दुरुस्त करायला हवं.- नीलेश चव्हाण

 

ही वेबसिरीज पाहा - https://www.youtube.com/watch?v=MnE5Ti3UMXQ&t=92s

 

मस्त रंगलेल्या या गप्पांचा व्हिडीओ पाहा -   चर्चा संयोजकअजय परचुरेhttps://www.facebook.com/lokmat/videos/1242577172567270/