शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जिद्दी मोनिकाची धाव...

By समीर मराठे | Updated: March 4, 2019 18:45 IST

मोनिका आथरे ही नाशिकची उत्कृष्ट धावपटू. मॅरेथॉन रनर. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं नाव गाजवलं. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी तिला अक्षरश: घरदार सोडावं लागलं. दिवसरात्र मेहनत घ्यावी लागली. चक्क सुवर्णकन्या पी. टी. उषानंही तिला तिच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी बोलावलं होतं, पण ही सुवर्णसंधीही मोनिकाला सोडावी लागली, मात्र मेहनत आणि जिद्दीवर तिचा विश्वास होता. त्याचं फळ तिला मिळालं. महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानंही तिला नुकतंच गौरवण्यात आलंय..

ठळक मुद्देमोनिका तेव्हा शाळेत शिकत होती. ऑलिम्पिकचं पदक एक शतांश सेकंदानं हुकलेली सुवर्णकन्याच थेट दाराशी आली होती आणि ती मोनिकाला सांगत होती, ‘चल माझ्याकडे, माझ्या शाळेत, मी तुला घडवते, तयार करते!’

- समीर मराठे

जवळपास १२-१३ वर्षं झाली, बहुदा २००७चं वर्षं असावं, पय्योली एक्सप्रेस; सुवर्णकन्या पी. टी. उषा नाशिकमध्ये आली होती. ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ ग्रुप आणि पी. टी. उषा स्कूल आॅफ अ‍ॅथलेटिक्सतर्फे खेळाडूंसाठी एक राष्ट्रस्तरीय योजना तयार केली जात होती. या योजनेद्वारे राज्याराज्यांत जाऊन अ‍ॅथलेटिक्सचे चांगले खेळाडू निवडून त्यांना पी. टी. उषा केरळला आपल्या स्कूलमध्ये प्रशिक्षण देणार होती.प्रत्येक राज्यातून सात खेळाडू निवडले जाणार होते. त्यासाठी त्यांची कस्सून चाचणी घेतली जाणार होती. त्यासाठी पी. टी. उषा देशभर राज्याराज्यांत आणि गावागावांत फिरत होती. त्यासाठीच ती नाशिकला आली होती. सर्व खेळाडूंच्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्या. त्यातून फक्त आणि फक्त एकच खेळाडू निवडली गेली. तिचं नाव होतं मोनिका आथरे.

मोनिका तेव्हा शाळेत शिकत होती. ऑलिम्पिकचं पदक एक शतांश सेकंदानं हुकलेली सुवर्णकन्याच थेट दाराशी आली होती आणि ती मोनिकाला सांगत होती, ‘चल माझ्याकडे, माझ्या शाळेत, मी तुला घडवते, तयार करते!’पण मोनिकानं नकार दिला!मोनिकाच्या वतीनं तिच्या घरचे आणि तिच्या प्रशिक्षकांचंही तेच मत होतं. पण अंतिम निर्णय मात्र मोनिकाचाच होता.दोन मुख्य कारणं..एकतर मोनिका लहान होती, पण त्याहून मोठं कारण होतं, मोनिका शिकत होती ते मराठी माध्यमाच्या शाळेत!मोनिका केरळला पी. टी. उषाच्या स्कूलमध्ंये दाखल झाली असती, तर शिक्षणाचा पार बोऱ्या वाजला असता. कारण तिथे केरळी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिला प्रवेश घ्यावा लागला असता आणि आतापर्यंतचं शिक्षण फुकट गेलं असतं!परवा संध्याकाळी मोनिकाला भेटायला ग्राऊंडवर गेलो, तर आपला सराव संपल्यानंतर मैदानातल्या कोपऱ्यात आपल्या पायांना ती आइसमसाज करीत होती. गेले काही दिवस झाले, तिची जुनी इंज्युरी पुन्हा उफाळून आली होती आणि दुसºयाच दिवशी तिला दिल्लीला जायचं होतं. दिल्ली नॅशनल मॅरेथॉनसाठी. फूल मॅरेथॉन. ४२ किलोमीटरची रेस. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्ससाठीचं सिलेक्शन याच स्पर्धेच्या कामगिरीतून होणार होतं.गेल्या वर्षीही मोनिका ही स्पर्धा जिंकली होती. गोल्ड मेडल! त्यामुळे लंडनला झालेल्या सिनिअर वर्ल्ड चॅम्पियशनशिपसाठी तिचं सिलेक्शन झालं होतं.

दहा-बारा वर्षांपूर्वीचा तोच धागा धरून मोनिकाला विचारलं, ‘काय वाटतं तुला? पी. टी. उषाबरोबर न जाण्याचा तुझा निर्णय चुकला कि बरोबर होता? तुझा परफॉर्मन्स आणखी बेटर झाला असता आणि खूप आधीच तू आंतरराष्टÑीय स्तरावर पोहोचली असतीस?..’मोनिका क्षणार्धात सांगते, ‘पी. टी. उषाला नकार देण्याच्या निर्णयाचा मला आजही पश्नाताप वाटत नाही. कारण खेळाइतकंच शिक्षणही माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. थेट सुवर्णकन्येकडूनच प्रशिक्षण मिळणं ही अभूतपूर्व अशीच गोष्ट होती, पण ती माझ्या भाग्यात नव्हती, एवढंच मी म्हणेन..’२६ वर्षीय मोनिकानं डिफेन्समध्ये एमए केलं आहे आणि तिच्यासाठी शिक्षण इतकं का महत्त्वाचं आहे ते तिच्या घराण्याच्या इतिहासात आहे.तिचे वडील शेतकरी आहेत.मोनिका तशी नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी या खेड्यातली, पण लहानपणापासून तिचं सारं शिक्षण नाशिकमध्येच झालं.आज आपल्याला अश्चर्य वाटेल, पण अतिशय विरळा असं उदाहरण त्यांच्या घराण्यात सापडतं.मोनिकाचे वडील आजही पिंपळगाव केतकीला शेती करतात. ते एकूण चार भाऊ. साऱ्यांनाच शिक्षणाची आवड आणि मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी साºयांचाच आटापिटा. पण शिक्षणाबरोबरच खेळातही त्यांनी प्रगती करावी असंही त्यांना वाटत होतं.गावात राहून मुलांना चांगलं शिक्षण, खेळाचं प्रशिक्षण कसं मिळणार, म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला, चौघा भावांपैकी एकानं नाशिकमध्ये शिफ्ट व्हायचं. मोनिकाच्या धाकट्या काकांनी ही जबाबदारी घेतली. ते नोकरीला बाहेरगावी होते. त्यांनी नोकरी सोडली आणि पत्नी, कुटुंबासह ते नाशिकला मखमलाबाद नाका परिसरात स्थायिक झाले.चौघा भावांपैकी कोणालाही मूल झालं आणि ते शाळकरी वयात आलं की त्याला शिक्षणासाठी नाशिकला पाठवायचं हा शिरस्ता.मोनिका सांगते, ‘काकांच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये एकाच वेळी आम्ही सतरा जण राहात होतो. त्यात सहा मुली आणि सात मुलं! काका, काकू सगळ्यांचं अगदी प्रेमानं करत होते, पण एक शिस्तही त्यांनी सगळ्यांना घालून दिली होती. कामं वाटून दिली होती. खरं तर तो संस्कार होता. जेवणापूर्वी झाडून घ्यायचं, जेवण झालं की आपलं ताट धुवून ठेवायचं.. छोट्या छोट्याच गोष्टी.. त्यावेळी कंटाळा यायचा, पण लहानपणीच लागलेल्या त्या शिस्तीचं महत्त्व आज कळतंय. कुठल्याही खेळात सर्वात जास्त महत्त्वाची असते ती शिस्त, त्या शिस्तीनंच मला आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आणून ठेवलं. त्यात काकांचा वाटा खूपच मोठा आहे. मला शाळेत सोडण्यापासून ते पहाटे आणि संध्याकाळी मेैदानावर ने-आण करण्यापर्यंत सारं काही काकांनी केलं.’इतकी मुलं, पुन्हा त्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवायचं, शिक्षणापासून ते त्यांच्या कपड्यालत्त्यापर्यंतचा सारा खर्च, घरखर्च.. काकांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ मुलं सांभाळण्याचा निर्णय घेतलेला.. कसा ओढायचा हा गाडा?..धाकटे काका ज्यावेळी नाशिकला आले, त्याचवेळी सर्वानुमते निर्णय घेतला होतो, शेतीतून जे काही उत्पन्न निघेल, त्यातून हा खर्च चालवायचा. त्यामुळे तिघे भाऊ गावी शेती करायचे आणि हा खर्च चालायचा. दहावीपर्यंत मोनिका काकांकडेच होती.मोनिकाच्या सर्वच भावंडांनी चांगलं शिक्षण घेतलं, पण तिच्याशिवाय खेळात मात्र कोणीच चमकू शकलं नाही. मोनिका नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेत शिकत होती. त्यावेळी शाळेत लहान मोठ्या स्पर्धा, खेळ होत, लहान मुलांसाठी एक-दोन किलोमीटरच्या मॅरेथॉन होत.. या साºयाच स्पर्धांत मोनिका कायम पहिली यायची. तिच्या शाळेतले हॅण्डबॉलचे कोच हेमंत पाटील सर तिला म्हणाले, तू इतकं चांगलं धावतेस, तर आणखी चांगलं प्रशिक्षण मिळण्यासाठी तू भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर, तिथल्या कोचकडे का जात नाहीस?सातवीत असताना २००३मध्ये मोनिका मग विजेंद्रसिंग सरांकडे आली. भोसलाच्या मैदानावर खेळाडूंचा बराच मोठा ग्रुप होता. नॅशनल खेळणारे खेळाडू होते. मिनी सुवर्णा, कविता राऊत यांच्यासारखे मोठे खेळाडू तिथे होते. मोनिकाची प्रगती व्हायला मग वेळ लागला नाही. मोनिकाच्या जिद्द आणि चिकाटीमुळे पुढच्याच वर्षी म्हणजे २००४ पासून नॅशनलची मेडल्स यायला सुरुवात झाली...

(क्रमश:)

(लेखक ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहात उप वृत्तसंपादक आहेत.)

sameer.marathe@lokmat.com

(लोकमतच्या ८ मार्च २०१८च्या ‘ऑक्सिजन’ पुरवणीत या लेखातील काही भाग प्रसिद्ध झाला आहे.) 

(छायाचित्रे: प्रशांत खरोटे)

श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा आणखी मजकूर वाचा याच ठिकाणी..www.lokmat.com/oxygen वर..

(मोनिका लंडनला मैदानात कोसळली, तरीही स्पर्धा पूर्ण केलीच..)