शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उत्तर कोरियातून पळालेल्या मुलीची गोष्ट

By admin | Updated: May 4, 2017 07:24 IST

गेल्या ५० वर्षांपासून जगाला उत्तर कोरिया देत असलेल्या पोकळ धमक्यांची जगाला सवयच झाली आहे. पण गेल्या

 गेल्या ५० वर्षांपासून जगाला उत्तर कोरिया देत असलेल्या पोकळ धमक्यांची जगाला सवयच झाली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या धमक्या अधिकाधिक तीव्र आणि हिंसक होत चालल्या आहेत. त्यात परत कोरियाने नुकतीच, त्या देशाच्या ६८ व्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने, एक अणुचाचणी केल्यामुळे या धमक्यांना जरा टोक यायला लागलं आहे असं वाटतं. ही उत्तर कोरियाने केलेली खरंतर पाचवी अणुचाचणी.या देशाबद्दल माहिती आणि तिथे काय घटना घडतात याबद्दल माहिती हवी असेल तर हा लेख वाचायलाच हवा. या लेखामध्ये हेओन्सिओ ली या मुलीची गोष्ट सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. हेओन्सिओ ली ही त्या देशाच्या वातावरणाला कंटाळून कशी पळून जाण्यात यशस्वी झाली, त्यानंतर तिथे चीनच्या दक्षिणी भागात कसा आश्रय मिळवला याबद्दल माहिती दिली गेली आहे. या घटनांबद्दल वाचताना आपल्याला मिळत असलेलं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीच्या शक्यता याबद्दल नवाच आदर निर्माण होतो. त्याबरोबरच अनेक वेळा आपण ‘खरंतर भारतात एखादा हुकूमशहाच पाहिजे, सैन्याचं राज्य हवं’ अशी पोकळ विधानं करत असतो. या चित्रफिती आणि हा लेख वाचले तर आपण अशी विधानं करू धजणार नाही हे निश्चित!  

वाचा - http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/northkorea/11138496/Escape-from-North-Korea-How-I-escaped-horrors-of-life-under-Kim-Jong-il.html

 

किम जोंग नावाचं कोडंकसं असतं ना, प्रत्येक देशाची अशी स्वत:ची एक ओळख असते. म्हणजे जपान म्हटलं तर तंत्रज्ञान, दुसऱ्या महायुद्धाच्या हाहाकारानंतरही सावरलेला आणि प्रगती करत असलेला देश. ब्रिटन म्हटलं तर राणी, अमेरिका म्हटलं तर तिथल्या शिक्षण संस्था, हॉलिवूडचे चित्रपट आणि आता ट्रम्प असं डोळ्यासमोर येतं. पण उत्तर कोरिया असं म्हटलं तर दुसरा तिसरा काहीही न विचार येता, तिथला सर्वेसर्वा हुकूमशहा किम जोंग उन आणि त्याचे क्रूर कारनामे एवढंच डोळ्यासमोर येतं. कारण त्या देशानं म्हणजेच तिथल्या हुकूमशहानं तसं ठरवूनच केलं आहे ना! कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य तिथल्या नागरिकांना दिलं जात नाही. लोकशाही वगैरे शब्द उच्चारले तरीही आपण मारले जाऊ की काय अशी भीती तिथल्या लोकांना वाटते. तिथं इंटरनेट नाही. त्यामुळे फेसबुक किंवा इतर प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला होते तशी जगाची ओळखच तिथल्या नागरिकांना होत नाही. कला, क्र ीडा किंवा कोणत्याही प्रकारच्या अभिव्यक्तींवर प्रचंड निर्बंध आहेत. थोडक्यात, तुम्ही उत्तर कोरियाच्या हुकूमशाहीची वाहवा करणारे, उत्तर कोरियन सरकारने तिथल्या जनतेसाठी तयार केलेले चित्रपट, गाणी सोडून काहीही बघू, ऐकू शकत नाही. इतकी क्रूर असावी आपली इमेज असं कुणाला का वाटत असेल? उत्तर सापडतं किम जोंगच्या लहानपणात. नॅशनल जिओग्राफिकने तयार केलेली डॉक्युमेंटरी ते सांगते. किम जोंग आणि त्याचे भाऊ शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये होते असा खुलासा त्यात केला आहे. त्याबरोबरच ते तिघे तिथे कसे सामान्यांसारखे राहत असत, त्यांचे मित्र कसे होते, हे अभ्यासात हुशार होते का यावर प्रकाश टाकला आहे. त्याच्या या बालपणाच्या वर्णनातून आपल्याला त्याच्या मानसिकतेची ओळख होऊ शकते. त्याबरोबरच त्या देशाच्या राजकीय इतिहासाबद्दलही अतिशय रंजक पद्धतीने माहिती मिळू शकते. या उत्तर कोरियाबद्दल माहिती शोधताना एक अजून व्हिडीओ मी पाहिला. तो पाहिला नाही तर त्या देशाबद्दल आपण कधीच पूर्ण माहिती घेऊ शकणार नाही असं वाटत. तो व्हिडीओ म्हणजे हेओन्सिओ ली या महिलेचा टेड टॉक आहे. या व्हिडीओचं नावच मुळी ‘माय एस्केप फ्रॉम नॉर्थ कोरिया’ म्हणजे उत्तर कोरियामधून माझी सुटका. या व्हिडीओमुळे आपल्याला तिथल्या क्र ौर्याची कल्पना येऊ शकते. सरकार त्यांच्या शत्रूंना मोठ्या मैदानात मोठा समारंभ करून देहदंड देत असे. असे अनेक कार्यक्रम तिनं पाहिले होते. पण तिच्या आईलाही तशीच शिक्षा झाली. तिची चूक एकच, ती म्हणजे साउथ कोरियामध्ये प्रकाशित झालेल्या चित्रपटांच्या डीव्हीडीज तिनं पाहिल्या आणि शेजारणीला बघायला दिल्या. आपल्या आईला अतिशय क्रूर पद्धतीने मारलेलं पाहून हेओन्सिओची तिच्या देशाबद्दची प्रतिमा डागाळायला लागली. आणि वयाच्या सतराव्या वर्षी ती तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. ते तिचं भाषण अवश्य पाहा. पहा-