आता लवकरच आकाशात झेपावणार विजेवर उडणारं विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 07:00 AM2019-11-21T07:00:00+5:302019-11-21T07:00:04+5:30

विजेवर चालणार्‍या गाडय़ा आल्या; पण विजेवर उडणारं विमान आलं तर? नासानं नुकतंच असं एक विमान बनवलं आहे, भविष्यात कदाचित अशी विमानं आकाशात झेपावतील.

Soon, a plane will fly in the sky | आता लवकरच आकाशात झेपावणार विजेवर उडणारं विमान

आता लवकरच आकाशात झेपावणार विजेवर उडणारं विमान

googlenewsNext
ठळक मुद्देनासाचे हे नवे विमान एक चांगली बातमी आहे.

- प्रसाद ताम्हनकर

प्रदूषण आणि इंधनाची समस्या सध्या जगभरच भेडसावत आहे. अनेक मोठे देश या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी प्रय} करत आहेत. आणि जोडीलाच विविध नियमदेखील बनवत आहेत. मात्न फक्त रस्त्यावरची वाहनंच विद्युत अर्थात इलेक्ट्रिक बॅटरीवरती चालवून यावर तोडगा निघेल का? यासंदर्भात बरीच मतमतांतरे आहेत, मात्न फक्त वाहन निर्मात्यांचेच हे स्वप्न नसून, आता चक्क नासाने पूर्णपणे विद्युत संचलित असे विमान बनवून या क्षेत्नात एक अनोखं कार्य केले आहे. जमीनच नाही, तर अवकाशातदेखील आता विद्युत संचलित विमानं चालतील असे भविष्य नासाने दाखवले आहे. नासाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियाच्या एडवडर्समधील अंतराळ एजन्सीच्या आर्मस्ट्रॉँग फ्लाइट रिसर्च सेंटरमध्ये नासाने आपले पहिले प्रायोगिक ऑल-इलेक्ट्रिक विमान तयार केले आहे. 2015 पासून या विमानावरती काम चालू होते. या विमानाला एक्स-57 मॅक्सवेल (किंवा एक्स-प्लेन) असं नाव देण्यात आलं आहे. भविष्यातील विमानांना विद्युत कसं बनवता येईल हे समजून घेण्यासाठी नासाने या पुढेदेखील या प्रयोगावरती काम सुरू ठेवण्याची योजना आखली आहे. नासाचे हे विद्युत एक्स -57 हे ट्विन-इंजिन टेकनम पी 20036 टीचे एक इलेक्ट्रिक रूपांतर आहे. हे चार सीटर लाइट विमान असून, 2006 मध्ये इटलीमध्ये ते डिझाइन करण्यात आलं.   सध्या जास्तीत जास्त एक तासासाठी उड्डाण करण्यात हे विमान सक्षम असेल. एक्स-57ची क्षमता सध्यातरी 280 किलोमीटर आहे एवढी आहे. इलेक्ट्रिक एक्स प्लॅनर प्रोजेक्ट हे नासाच्या अंतराळातील विद्युत वाहतुकीच्या दृष्टीने पाहिलेल्या स्वप्नाचं महत्त्वाचं पाऊल असल्याचं नासाचं मत आहे. हे विमान वाहतूक वा इतर अंतराळ कार्याच्या दृष्टीने किती प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे, हे समजण्यासाठी याच्या पहिल्या चाचणीची वेगवान तयारी नासाने चालवली आहे. स्वतंत्नपणे कार्यरत राहणार्‍या मोटारी हे याचे खास वैशिष्टय़ आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आणि त्याच्या प्रवासासाठी हवेचा वेग, तिची दिशा आणि एकूण परिस्थिती याचा अभ्यास नासाचे तंत्नज्ञ ‘इलेक्ट्रिक प्रॉपल्शन सिस्टीम’ या तंत्नाद्वारे करणार आहेत. प्रदूषणाचा विळखा जगाला ग्रासत असताना आणि मुख्य म्हणजे अंतराळ प्रवासाच्या विश्वात नव्या नव्या संकल्पना राबवल्या जात असतानाच, नासाचे हे नवे विमान एक चांगली बातमी आहे.
 

Web Title: Soon, a plane will fly in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.