शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

सोलो ट्रॅव्हलर- एकटय़ानं जग पाहण्याचा धाडसी ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 3:10 PM

ऐन विशीतले तरुण, खिशात पैसे जेमतेम. एकटेच निघतात प्रवासाला. कधी बस-रेल्वे, कधी सायकल-बाइक, कधी पायीच. कशासाठी हा एकल प्रवास?

ठळक मुद्देसोलो ट्रॅव्हलर्स फार इंटरेस्टिंग आहे हे!

प्राची  पाठक 

आजकाल खूप तरुण मुलंमुली एकेकटे फिरतात. अशी सतत चर्चा. असं एकेकटे प्रवास करणार्‍यांचे, बाइकर्सचे, सायकलस्वारांचे फोटो, अनुभवकथा वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात.आपण एकटय़ानं माहीत नसलेलं जग फिरून येणं, आपलीच आपल्याला सोबत असणं ही कल्पना तारुण्यात कुणालाही रोमॅन्टिकच वाटते. पुण्याचा मयूर या अशा सोलो ट्रॅव्हलर्सच्या गोष्टी वाचत असे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी घरांमध्ये या एकटय़ानं प्रवास कल्पनेविषयी काय चित्र असतं, ते समजून घेत असे. मात्र त्याच्या आवतीभोवती त्याला कोणीही असं एकेकटं फिरताना दिसत नसे. पण सोशल मीडिया मात्र सोलो ट्रॅव्हलच्या लिंक्सने भरून वाहताना दिसायचा. हे दूर कुठेतरी परदेशात होत असेल असंही त्याला काहीकाळ वाटलं. दुसरीकडे सोलो ट्रॅव्हलचे फायदे वाचून तो अवाक् होत असे. विचारात पडत असे. अनोळखी जागी एकदम जायला घाबरणारे आपण असं काहीतरी वेगळंच, एकटय़ानं करायचं हे वाचून भारावून जातोय की काय हा आणखीन एक नवीनच मुद्दा डोक्याचा भुगा पाडत असे. कालांतराने त्याला सोशल मीडियावरच असे एकेकटे फिरणारे लोक सापडू लागले. त्यात मराठी बोलणारे लोक दिसू लागले. एखादी तरु ण मुलगी एकटी कुठे फिरते आहे, त्याबद्दल सोशल मीडियावर किती वेगवेगळ्या पैलूंचं लिहिते आहे, मुख्य म्हणजे अशा पोस्टवर कमेन्ट्स केल्यावर मोकळेपणी संवादसुद्धा साधायची शक्यता आहे, हे समजल्यावर मयूरचा सोलो ट्रॅव्हल प्रयोग मनात पक्का झाला. लहानपणापासून आपल्याला असलेलं बसमधल्या विंडो सीटचं आकर्षण आजही तसंच आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं. इतरांसोबत असताना ती सीट कायमच आपल्याला मिळेल असं नसतं. सोलो ट्रॅव्हलमध्ये मात्र अनेकदा तशी संधी सहजच मिळू शकते. कुटुंबासोबत, मित्रांसोबत प्रवास करताना एक वेगळी मजा असते; पण त्यात वेगळे लिमिटेशन्ससुद्धा असतात. आपल्याला आवडतं ते त्यांना आवडेलच असं नसतं. कुठे चटकन पुढे जावं लागतं, कुठे आपली आवड नसून थांबावं लागतं. अशा बर्‍याच बर्‍यावाईट मुद्दय़ांचा नीट विचार करून, स्वतर्‍च्या भीतीवर मात करून मयूर कुलकर्णी हा तरुण घराबाहेर पडला. त्याच्या पहिल्यावहिल्या मोठय़ा प्रवासाला. जसजसा प्रवास सुरू झाला, तसतसे वेगवेगळे नवे मुद्दे त्याला जाणवू लागले. दिवसभर प्रवास करून रात्री कुठे हॉटेल वगैरेला जाऊन झोपल्यावर पुढच्या दिवसाच्या प्रवासाची सुरुवात आपली आपल्यालाच करायची असते हे लक्षात यायला लागलं. साखरझोपेतून वगैरे आपणच आपल्याला जागं करायचं असतं. तिथे कोणी ‘ऊठ रे बाबा’ करत लाड करणारं कुणी नसतं. लोळत पडून राहून दिवस घालवला तरी त्याचं उत्तर आपणच आपल्याला द्यायचं असतं. पुढच्या बुकिंग्स, बसगाडय़ा यांचं सगळं प्लॅनिंग एका आळशी सकाळमुळे कोलमडू शकतं. हा मोठाच साक्षात्कार मयूरला झाला तो एकदा एक बस चुकल्यावरच! प्रवासातल्या आपल्या चुका सावरायला आपणच आहोत, ही लख्ख-स्पष्ट जाणीव खूप काही शिकवून जाते. सतत अलर्ट राहायचं, अनेक गोष्टींचं नीट भान ठेवायचं ट्रेनिंग देते, असं मयूर म्हणतो. सोलो ट्रॅव्हलला गेल्यावर स्वतर्‍चे फोटो काढायच्या संदर्भातल्या मजेदार गमतीजमती मयूरला अनुभवायला मिळाल्या. मुळात, अशा ट्रीपला गेल्यावर आपले वेगवेगळ्या पोझमधले फोटो पाहून इतर मित्रमंडळी, नातेवाईक खोदून खोदून विचारत राहातात, ‘कोण होतं तुझ्यासोबत? काही अफेअर तर नाही ना? आम्हाला सांगायचं नसेल तर ठीकच रे, पण फोटो कसे काढले ते तरी सांग!’ मयूर म्हणतो, एखाद्या प्रसिद्ध स्पॉटला ‘कपल फोटो’ झटझट निघत असतात. तुम्ही एकटेच असलेले पाहून लोक  सल्लेही देतात. ‘या स्पॉटला आता असा फोटो काढून घ्या, नंतर तुमच्या होणार्‍या बायकोचा फोटो फोटोशॉप करून या इथे असा डकवून घ्या’, हेही सांगायला अनोळखी लोक कमी करत नाहीत. त्यात एक वेगळीच आपुलकीसुद्धा असते खरी! मयूरने मग जागोजागी गाइड नेमून त्यांच्याकडून हक्काने फोटो काढून घ्यायचा प्रयोग  करून बघितला. कोणाही अनोळखी माणसाला फोटोसाठी तयार करण्यापेक्षा हा गाइड हक्काने त्या त्या प्रवासात आपले फोटोही हौशीने काढून देतो, ते त्याच्या लक्षात आलं. मयूरच्या आजूबाजूच्या विश्वात सोलो ट्रॅव्हल या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त करणारे, ते पचनी न पडणारे अनेक लोक आहेत. त्यांच्याजागी ते बरोबरच असतात. कारण एकटय़ाने इतक्या बारीकसारीक गोष्टींचं भान ठेवणं सोपी गोष्ट नाहीच आहे. तरीही मयूरला आता सोलो ट्रॅव्हलची मौज कळलेली आहे. मयूरच कशाला त्याच्यासारखे अनेक एकेकटे, एकेकटय़ा बिनधास्त फिरायला लागले आहेत. मी कसं जाऊ, एकटी/एकटय़ानं काय करू हे सारं आता मुलांच्या मनातून पुसट व्हायला लागलं आहे.प्रवास सोपा नसतोच, तो शिकवतो, बदलवून टाकतो तुम्हाला.वयाच्या ऐन विशीत असं एकटय़ानं जग पहायल्यावर शहाणपण आणि व्यवहारज्ञान येतंच.

एकेकटय़ाप्रवासाची गंमत

1. आपल्याला नकाशे बघायला शिकावं लागतं, रस्ते आपले आपल्याला शोधावे लागतात. जवळच्या पत्त्यासाठीसुद्धा लोकांशी नीट संवाद साधावा लागतो. सगळंच गुगल बाबाच्या सर्चवर आयतं मिळत नसतं, हे समजतं. लोकांशी जुळवून घेणं, आपल्याला हवी ती माहिती चटकन आणि नेमकी लोकांकडून घेता येणं याचा जणू क्रॅश कोर्सच असतो सोलो ट्रॅव्हल म्हणजे. 2. या सगळ्यात आपल्या खिशाची खर्च करायची क्षमतासुद्धा सतत डोक्यात ठेवावी लागते. बजेट ट्रॅव्हलर्ससाठी तर फार महत्त्वाचं शिक्षण असतं ते! त्यातूनच वेगवेगळे इकॉनॉमिक होस्टेल्स कळत जातात.  3. एकेकटय़ा फरणार्‍या जगभरातल्या मुलामुलींची ओळख व्हायला लागते. काही प्रवास अचानक त्यांच्यासोबत केले जातात. प्रवास झाला, सोबत संपली, असा सहजभाव! हे सारं आपलं आपल्याला गवसत जातं.4. एकटय़ाने फिरताना असे फोटो कोणाहीकडून काढून घ्यायला शिकणं हीसुद्धा एक कलाच असते. टायमर, स्टॅण्ड, सेल्फी वगैरे वगैरे टेक्निक असले, तरी दुसर्‍या कोणी आपले फोटो काढून देणे कधी कधी झकास असतं. काही लोक सरळ नकार देतात फोटो काढून द्यायला. काहीजण फारच हौशी असतात. ते कॅमेरा तिरपा-तारपा करूनसुद्धा भरपूर क्लिकक्लिकाट करून देतात. त्यातही गंमत असते.5. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनोळखी लोक ट्रॅव्हल बडी म्हणून सोबत करतात. त्यांच्याकडूनही बरंच काही शिकता येतं.6. एकटय़ानं जगण्याची आनंदी कला शिकवतो हा प्रवास, तो अनुभव हेच शिक्षण.