शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

सोशल होण्याचा सोस

By admin | Updated: March 11, 2016 11:51 IST

50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक हल्ली सकाळी उठल्याबरोबर, डोळे उघडताच पहिल्या पाच मिण्टात आपला मोबाइल फोन चेक करतात. अनेकजण तर जाग येताच व्हॉट्सअॅप/फेसबुक चेक करतात.

- मुक्ता चैतन्य
50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक हल्ली सकाळी उठल्याबरोबर, डोळे उघडताच पहिल्या पाच मिण्टात 
आपला मोबाइल फोन चेक करतात.  अनेकजण तर जाग येताच व्हॉट्सअॅप/फेसबुक चेक करतात.
त्यातल्या काहींना तर रोज सकाळी ठरल्या वेळेस तमाम दुनियेला सुविचार पाठवण्याच्या
सवयीनंच झपाटलेलं आहे. दिवसभर मग तेच किमान 100 वेळा मोबाइल चेक करणं, हे सारं नक्की काय आहे?
 
‘टर्न वायफाय ऑफ, टोक तू इच अदर, कॉल युअर मॉम, प्रिटेण्ड इट्स 1993.’
इंटरनेटवर इकडे तिकडे फिरताना एकदम या वरच्या  वाक्यांवर नजर गेली. परदेशातल्या कुठल्यातरी रेल्वेस्थानकावर काही चळवळ्या लोकांनी मोठय़ा अक्षरात लिहून ठेवलं होतं, वायफाय नको, एकमेकांशी बोला.
हे वाक्य वाचलं तेव्हा एकदम अंगावर काटाच आला.  म्हणजे एका घरात, एकत्र राहणारी माणसंही एकमेकांशी बोलेनाशी झालीत की काय? रोज कट्टय़ावर एकमेकांना भेटलो नाही तर हुरहूर वाटावी असे मित्र आता एका गावात, एका कॉलेजात असूनही एकमेकांना फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरच भेटतात. का? आपल्या सगळ्यांनाच एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा कंटाळा आलाय का? आपल्या हातात मोबाइल, त्यातही स्मार्ट फोन आल्यानंतर आपलं आयुष्य खरंच खूप बदललं आहे असं वाटतंय ते खरंच बदललं आहे की बदल झाल्याचाही फक्त आभास निर्माण होतोय. किंवा केला जातोय?
मग जरा शोधाशोध करायला सुरु वात केली. जगभरात या विषयावर सुरू असलेली किंवा प्रसिद्ध झालेली संशोधनं, सर्वेक्षणं चाचपून पाहिली. ओळखीपाळखीच्या लोकांशी बोलायला सुरुवात केली. स्वत:सह इतरांच्याही समाज माध्यमातल्या वावराचं, व्यक्त होण्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली. ज्या गोष्टी अधनमधनं जाणवत होत्या त्यांच्याकडे अधिक बारकाईने आणि तटस्थपणो पहायला सुरुवात केल्यावर मात्र वाटलं की, कुछ तो गडबड है..
थोडी आकडेवारी तपासून पाहिली तर स्मार्ट फोन वापरणा:या भारतातल्या 95 टक्के लोकांना वाटतं की स्मार्ट फोनशिवाय त्यांचं आयुष्य अपूर्ण आहे. म्हणजे स्मार्ट फोन वापरणारे शंभरात 95 लोक आपलं आयुष्य त्या फोनशिवाय इमॅजिनच करू शकत नाहीत, म्हणजे एकूण लोकांमध्ये हा आकडा बराच मोठा असेल. एक्सपीडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचं असं म्हणणं आहे की, भारतातल्या 95 टक्के स्मार्ट फोन वापरकत्र्याना हातातल्या स्मार्ट फोनशिवाय जगणं मुश्कील आहे. इतकंच नाही तरी जवळपास 75 टक्के स्मार्टफोनधारक त्यांच्या प्रवासाचं तिकीट, हॉटेलचं बुकिंग, सिनेमाची तिकिटं अशा अनेक गोष्टींसाठीचे व्यवहार मोबाइल आणि टॅबवर डाउनलोड केलेल्या अॅप्सच्या मदतीनंच करतात. भारत हा जगातला तिस:या क्र मांकाचा सर्वाधिक स्मार्ट फोन वापरणारा देश आहे. आणि  ज्या गतीने भारतातील स्मार्टफोन ग्राहक वाढत आहेत, त्याच वेगानं इंटरनेटच्या वापरानं समाज माध्यमं अर्थात सोशल साइट्सचा वापरही वाढत जाणार आहे. मात्र या समाज माध्यमांच्या वापराचं योग्य ज्ञान नसल्यानं ही माध्यमं वापरावीत कशी या शिक्षणाचीही मोठी गरज आपल्याकडे निर्माण होणार आहे.
नव्हे, खरं तर ती आजच निर्माण झाली आहे.
स्मार्टफोन वापरणा:या या सा:या लोकांच्या (ज्यात आपणही आहोत) सामाजिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक वर्तणुकीत काही ठळक तर काही बारीकसारीक बदल झालेले आहेत. होत आहेत. या बदलांविषयी जगभरात संशोधनं सुरू आहेत. ती संशोधनं वाचताना हे सारं आपल्याही आयुष्यात घडतं आहे का, हे तपासून पाहता येऊ शकतं.
डेलोइट मोबाइल कन्ङयुमर सव्र्हे 2015नुसार 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक सकाळी उठल्याबरोबर, डोळे उघडताच पहिल्या पाच मिण्टात आपला मोबाइल फोन चेक करतात. 
आणि पहिल्या पाच मिनिटात कशाला आपल्यापैकी अनेकजण तर जाग येताच व्हॉट्सअॅप/ फेसबुक चेक करतात. एकवेळ डोळे नीट उघडले गेले नाही तरी चालतील, पण मोबाइलवरचे अपडेट्स उघडणं अधिक महत्त्वाचं होऊन बसलं आहे यात शंका नाही. अनेकांना तर सकाळी अमुक एक वेळेला सुविचार पाठवण्याच्या सवयीनंच झपाटलेलं दिसतं. उठले की पहिले इतरांना सुविचार पाठवून एक काम पूर्ण झाल्याच्या आनंदात ते गादीत लोळत राहतात. तर काहीजण गादीत लोळतच इतरांना उपदेशाचे डोस पाजणारे मेसेज पाठवतात नाहीतर कमेण्ट करतात.
सर्वेक्षणात दुसरी महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे स्मार्टफोनवर इंटरनेट वापरणारे सर्वप्रथम  त्याचा वापर समाज माध्यमांमध्ये शिरकाव करण्यासाठीच करतात. म्हणजे नेट पॅक मारला की व्हॉट्सअॅप सुरू. तसेच जे वापरकर्ते आज फोरजी वापरत नाहीयेत त्यांनाही पुढच्या वर्षभरात फोरजी वापरण्याची तीव्र इच्छा आहे. भारतात समाज माध्यमांबरोबर मोबाइल बंकिंगचाही मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. याच सर्वेक्षणात असेही दिसून आले की, 28 टक्के वापरकर्ते दिवसभरात 11 ते 25 वेळा फोन चेक करतात तर 22 टक्के लोक 26 ते 5क् वेळा आपल्या फोनमधले अपडेट तपासून पाहतात. आणि 17 टक्के लोक 51 ते 1क्क् वेळा दिवसभरात फोन चेक करतात.
या सगळ्याचा अर्थ इतकाच की, आपण झोपतो तेवढाच काळ आपण स्वत:ला आपल्या फोनपासून दूर ठेवू शकतोय. उरलेल्या सगळ्या वेळात अधून मधून मोबाइलमध्ये डोकावत राहणं ही आपली सवय बनली आहे. व्हॉट्सअॅपवर कुणी काही मेसेज टाकलाय का? आपण केलेल्या एखाद्या मेसेजला काही उत्तर मिळालं आहे का? फेसबुकच्या स्टेटस अपडेटला किती लाईकस मिळाले, कोण काय म्हणालं आहे, अपेक्षित लाईकस मिळाले की नाही, नाही तर का मिळाले नाहीत या सगळ्याचा विचार करण्यात आणि आपल्या रोजच्या जगण्याचं अपडेट समाज माध्यमात देण्यात आपण आपल्या आयुष्याचा बराच वेळ देतोय. आपण कुठे गेलो, कसे गेलो, कधी गेलो, कुणासोबत गेलो इथपासून सगळं आपल्याला शेअर करायचं आहे. अनेकदा, ब:याच दिवसात काही शेअर झालं नाही तर आपल्या आयुष्यात काही एक्सायटिंग, हॅपनिंग घडत नाहीये की  काय अशी शंका आपल्याला यायला लागते. लोकांच्या आयुष्यातली हॅपनिंग अपडेट्स बघून आपलं आयुष्य फारच सपक आणि गुळचट झालंय की काय, याचा न्यूनगंड नकळत तयार होतो आहे.
यालाच समाज माध्यमांचं व्यसन आणि यात अडकून पडणं म्हणायचं का? आपण आभासी प्रतिमांच्या खेळातलं बाहुलं बनलोय का? 
हे प्रश्न मग निर्माण होतातच. 
सर्वेक्षणं सांगतायेत, की व्यसन जडलंय. आपण अडकत चाललोय. 
वास्तव, रचलेलं वास्तव आणि आभास यातला फरक आपल्याला कळेनासा झालाय. 
 व्हच्यरुअल जगातल्या लढाया, त्यातलं खरं-खोटं काय असेल इतपत विचार करण्याची जी उसंत स्वत:च्या बुद्धीला आणि मनाला द्यावी लागते तीच आपल्याकडे आता उरलेली नाही. लाईकस, अपडेट्स, नोटिफिकेशन, स्टेटस, डीपी, व्हिडीओ स्ट्रीमिंग, शेअरिंगच्या जंजाळात आपण चाललो आहोत. बोलत सुटलो आहोत.
माहिती मिळवण्याची, ती दुस:यार्पयत पोचवण्याची, व्यक्त होण्याची इतकी प्रचंड घाई आपल्याला का आहे? आपल्याला हे नवं व्यसन जडलंय म्हणजे नेमकं काय बिघडतंय? तंत्नज्ञानाने आपल्याला खरंच ‘सोशल’ बनवलं आहे का? की आपलं सोशल बनणं हाही एक आभास आहे?
याविषयीची चर्चा पुढच्या भागात.
 
स्मार्ट फोनवाले 23 कोटी 60 लाख
 
इंटरनेट अॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलंय की भारतात 2016 मध्ये 23 कोटी 60 लाख स्मार्ट फोनधारक असतील.
2017 पर्यंत हा आकडा 31 कोटी 40 लाख एवढा वाढलेला असण्याची शक्यता आहे. भारतात थ्रीजी वापरणा:यांची संख्या जवळपास 28 कोटी 40 लाखार्पयत  जाईल. या सर्वेक्षणात असंही दिसून आलंय की स्मार्ट फोनचा सर्वाधिक वापर एसेमेस, विविध समाज माध्यमं, निरनिराळे अॅप्स आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी होतो.
 
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.) 
muktachaitanya11@gmail.com