शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाइक आणि लव्हच्या ठोकाठोकीत खरंच मनापासून काही शेअर केलं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:36 IST

मस्त आराम करू, मजा करू म्हणता म्हणता दिवस कसे फुर्रकन उडून गेले आणि आता आपण परत रुटीनला भिडायचं असं वाटून जरा सुनंसुनं वाटतंच. पण खरं सांगा, दिवाळीत खातापिताना-सिनेमा पाहताना- मज्जा करताना,  कुणाला भेटताना तरी आपण ते सारं पुरेपूर केलं का?

ठळक मुद्देठोको लाइक !

-ऑक्सिजन टीम 

नुकतीच दिवाळी झाली.अजून खरं तर सरलीही नाही पुरती दिवाळी. अजून दिवाळीचा हॅँगओव्हर बाकी आहे.दिवाळीत इतकी धमाल केली की अजून मनावरचा आनंदी आळस काही उतरत नाहीये. वाटत नाहीये मस्त कामाला लागावं, उलट असं वाटतं की किती लवकर संपली ही दिवाळी. किती लवकर संपली सुटी.मस्त आराम करू, मजा करू म्हणता म्हणता दिवस कसे फुर्रकन उडून गेले आणि आता आपण परत रुटीनला भिडायचं असं वाटून जरा सुनंसुनं वाटतंच.पण खरं सांगा, दिवाळीत खातापिताना-सिनेमा पाहताना- मज्जा करताना,  कुणाला भेटताना तरी आपण ते सारं पुरेपूर केलं का?की डोक्यात एकच फोटो काढायचा, सेल्फी काढायचा, लिहायच्या खटक्यात दोन-चार ओळी आणि फेसबुकवर तरी टाकायच्या किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर तरी ढकलून द्यायच्या.आपल्या प्रेमाचं आपण असं जाहीर प्रदर्शन केलं का? करायला ना नाही, पण आपण आपल्या माणसांना भरपूर भेटलो, गप्पा मारल्या, डोळ्यात पाणी येईस्तोवर हसलो की आता पहिले फोटो काढू आणि आपली दिवाळी हॅपनिंग आहे ते इतरांना दाखवू असं काही होतं मनात?शे-सव्वाशे लाइक्स, पाच-पन्नास कमेंट्स, असं इगोला मालिश करून घेतलं की बरं वाटतं का आपल्याला? आपण किती हॅपनिंग आहोत असं दाखवण्यासाठी किती आणि काय काय नुस्ते शेअर करत सुटलं तरी त्यानंतर बरं वाटलं का?किती वाटलं? की एन्जॉय करण्यापेक्षा आणि हातातल्या स्मार्टफोनकडेच पाहत होतो सारखं? करत होतो स्क्रोल? कोण काय करतंय हे पाहत होतो नी ठोकत होतो लाइक फक्त?जरा विचारू स्वतर्‍ला.डब्यात कसा तळाला गेलेला आहे चिवडा आता नी तेल नितरुन आलंय तसं हे जरा आपलंच आपल्या मनात काहीतरी नितरत ठेवल्यासारखं शोधू..आणि सापडलंच काही तर जरा करू स्वतर्‍शीच ताळा. एकीकडे आपण खूप शेअरिंग करतो आणि दुसरीकडे मनाच्या दारावर मोठ्ठं कुलूप लावतो. कुणी कितीही प्रय} केले तरी कुणाला आत येऊ देत नाही. डोकावून पाहू देत नाही? कुणाला काही सांगत नाही, असं होतं का? आपलं मनमोकळं करत नाही असं होतं का, तेही जरा शोधायचं का?