शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

द सॉकर सिटी - कोल्हापुरी फुटबॉलची रांगडी गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 08:00 IST

राडा झाला आणि कोल्हापुरातला फुटबॉल आता पुन्हा ‘थांबला !’ मात्र कोल्हापूरच्या रांगडय़ा मातीतील फुटबॉलची मौज सांगणारा सचिन सूर्यवंशीचा द सॉकर सिटी हा सिनेमा मात्र नेमका तेव्हाच फिल्मफेअर जिंकून आला.

ठळक मुद्देकोल्हापुरात एकेकाळी गाजणारी कुस्ती आत्ता मर्यादित झाली, आता प्रश्न आहे तो फुटबॉलचं पुढं काय होणार?

 - श्रेणिक नरदे

कोल्हापूर. तांबडा-पांढरा, पैलवान, इरसाल गडी, दिलदार माणूस अशा टाइपची  सगळी विशेषणं कोल्हापुरी पोरांची ओळख असतेच.तसं हे सर्रास असंच जरी असलं तरी सुमडीत शांतीत क्र ांती करणारी काही माणसं असतात. फोकसमध्ये न येता आपापल्या कामात गुंतून, त्या विषयाच्या एंडचाच शेवट्टं करतात ! (हे खास आमचं कोल्हापुरी वाक्यं बरं का!)तर कोल्हापूरचा असाच एक शांतीत क्र ांतीवाला गडी म्हणजे सचिन सूर्यवंशी. अलीकडेच त्याच्या ‘द सॉकर सिटी’ या शॉर्टफिल्मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. असा दणका झाला की सचिन सूर्यवंशीचं नाव अनेक लोकांना माहिती झालं. तेच कशाला सचिनला ओळखणार्‍यांनाही आश्चर्य वाटायला लागलं, तर काहींना माहितीच नव्हतं की हा हे सगळं फिल्मबिल्म करतोय. या अशा गोष्टींना कोल्हापुरात थोडक्यात शांतीत-क्र ांती  असं म्हंटलं जातं.तर आता नेमकं सचिन सूर्यवंशी हे काय प्रकरण हाय ते जाणून घेऊ..दिवसातून एकदाच यष्टीबस येणार्‍या राधानगरी तालुक्यातील कासारवाडीचा. शाळेतला हुशार पोरगा. दहावीर्पयत पहिला दुसरा नंबर कधी सोडला नव्हता. माणसाला सर्वसाधारणपणे दहावीनंतर शिंगं फुटतात, तशी याची आधीच असलेली चित्नकलेची शिंगं बाहेर आली, आपल्याकडच्या शास्नप्रमाणं घरच्यांनी ती छाटून काढली, सायन्सला अ‍ॅडमिशन घेतली; पण बारावीनंतर परत आर्ट्सला अ‍ॅडमिशन घ्यावं वाटू लागलं तर घरच्यांनी परत बी.एस्सी.चाच आग्रह धरला. बी.एस्सी. झाला. आता हा बी.एड. करून कुठंतरी मास्तर म्हणून चिकटला की झालं असं घरच्यांचा उद्देश असावा. पण यावेळी त्यांना न जुमानता आपल्याला नाही करायचं बी.एड. हे त्यानं दणकून सांगितलं. त्याच स्पीडनं घरातूनही उत्तर आलं की तुमचं तुम्ही कमवा व शिका कार्यक्र म करून स्वतर्‍ची सोय लावा.तिथून त्याचा मनाजोगतं काम करणं त्यातून कमवणं आणि शिकणं असा प्रवास सुरू झाला. एडिटिंग, जाहिराती तयार करण्याचे छोटे-मोठे कोर्सेस करत नोकरीही चालूच होती. घरचे खूश होते. घरचे खूश असण्याचे काही प्रसंग असतात त्यापैकी एक म्हणजे आपला पोरगा नोकरीवर असणं. मुंबईत नोकरी, निब्बार काम, सतत कम्प्युटरवर गुंतून राहाणं, गुंतल्याने एकदा त्याच्या डोळ्याचं ऑपरेशनही झालंय. अशा सगळ्यात सिनेमॅटोग्राफीचा कोर्सही चालूच होता. तो पूर्ण झाला. गप्प बसवूही देईना, काही करू हेही कळेना, या सगळ्यातून परत नोकरीला राजीनामा दिला आणि शेतावर आला. शेती चांगली पिकवली. सिनेमॅटोग्राफी जरी पॅशन असलं तरी, खरा जीव त्याचा शेतीत आहे. शेतीत जीव म्हणजे नुस्ता बांधावरनं बसून नव्हे, तर खरा बांधाखालचा शेतकरी.अशातच कोल्हापुरातील फुटबॉल सामन्यांच्या प्रसिद्धीचं काम मिळालं. कोल्हापूर आणि फुटबॉल हे जवळ जवळ शतकभरापेक्षा मोठ्ठं नातं. कोल्हापुरातल्या लोकांना पटतं की, कोल्हापुरात फुटबॉल सामनं बघायला 20-25 हजार लोक असतात. पण बाहेरच्या लोकांना हे पटायचंच नाही. कोल्हापुरातला फुटबॉल बाहेर जायला हवा. किमान माहिती तर व्हायला हवं असं नेहमी वाटायचं. हे एखाद्या व्हिडीओ फिल्मच्या रूपात आलं तर जास्त लोकांर्पयत पोहचेल, असा विचार त्यानं केला होता.मुळात सचिनचा स्वभाव अभ्यासू, उचलला डीएसएलआर आणि घेतला टेक असं काही नव्हतं. तीन-चार वर्षे हा किडा त्याच्या डोक्यात घोळत राहिला. मध्यंतरी एक काळ असा आला की पोरं सगळी डीएसएलआर घेऊन शॉर्टफिल्मच्या मागेच धावत सुटली होती. त्यांनी सचिनकडून, त्याच्या फिल्मकडून शिकण्यासारखं बरचंसं आहे. सर्वागीण अभ्यास म्हणजे काय असतो? तो केल्याचा फायदा काय होतो  हे ट्रायपॉडवर कॅमेरा आदळण्याआधी कसं बघायचं हेसुद्धा सचिनची ही फिल्म न सांगताही सांगते.आणि त्यासोबत उलगडत राहते कोल्हापुरात फुटबॉल कुणामुळे आला, कोल्हापुरातल्या फुटबॉल खेळामागची तालीम, जुन्या काळात सामाजिक सलोखा जपण्यात फुटबॉलचं योगदान खिलाडुवृत्ती शिकविणारा काळ ते आज घडीला त्यामध्ये वाईट गोष्टींचा झालेला शिरकाव, अशा तर्‍हेने विविध कोनातून सचिन या कोल्हापुरातील फुटबॉलकडे बघतोय.फुटबॉल हा खेळ सर्वसामान्यापासून श्रीमंतार्पयतचा. मात्र कोल्हापूरच्या फुटबॉल खेळालाही थोडंसं ग्रहण लागलंय. या फिल्ममध्ये जी भीती शेवटी सचिन व्यक्त करतो, ती अवघ्या काही दिवसांत दुर्दैवाने खरीखुरी ठरतेय की काय अशी धास्ती वाटते. परवाच फुटबॉल सामन्यांदरम्यान राडा झाला आणि परत एकदा कोल्हापुरातल्या फुटबॉल थांबला.आत्ता पुढे काय होणार? हे काळंच ठरवेल. कोल्हापुरात एकेकाळी गाजणारी कुस्ती आत्ता मर्यादित झाली, आता प्रश्न आहे तो फुटबॉलचं पुढं काय होणार? समंजसपणा आणि खिलाडूवृत्ती दाखवली तर हा खेळ कोल्हापूरला निराळ्या उंचीवर घेऊन जाईल हे उघड आहे.‘द सॉकर सिटी ही सचिन सूर्यवंशी टीमची फिल्म म्हणजे कोल्हापुरी फुटबॉलचा एक खास दस्ताऐवज आहे. त्याला फिल्मफेअर पुरस्कार आता मिळाला. मात्र ही फिल्म कोल्हापुरातल्या फुटबॉलप्रेमींर्पयत पोहोचली तर या खेळाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाल्यावाचून राहणार नाही.