शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट फोन - लहान मुलांपासून कसा वाचवाल?

By admin | Updated: June 16, 2016 13:03 IST

हल्ली बाळाचा जन्म झाला आणि काही वेळाने हॉस्पिटल मधील नर्सने बाळ आणून नातेवाईकांंच्या हवाली केले कि आजकालचे स्मार्ट नातेवाईक त्या नवजात बाळाला

- अनिल भापकर
हल्ली बाळाचा जन्म झाला आणि काही वेळाने हॉस्पिटल मधील नर्सने बाळ आणून नातेवाईकांंच्या हवाली केले कि आजकालचे स्मार्ट नातेवाईक त्या नवजात बाळाला त्याच्या आईचा चेहरा पाहाण्याच्या अगोदर त्याच्या समोर स्मार्टफोन धरुन त्या बाळाचा फोटो काढुन व्हॉट्सअ‍ॅप करतात. म्हणजेच आजकालच्या पिढितील स्मार्ट बाळांना त्याच्या आईची ओळख होण्या अगोदर स्मार्टफोन ची ओळख झालेली असते.
मात्र बाळ मोठं होतं तसं  फोनशी खेळत उद्योग करू लागतो. त्यात आपले भाच्चे-पुतणे तर मामा/काका/मावशी आत्याचा फोन म्हणजे खेळणंच समजतात. ते स्मार्ट बाळ कधी कोणाला फोन लावतं, कोणाला काहीबाही मेसेज पाठवतं,कोणाचा व्हॉट्सअ‍ॅप कोणाला फॉरवर्ड करतं (अर्थात चुकुन) त्यामुळे तुम्हाला समोरच्याला सांंगावं लागतं कि कॉल चुकुन लागला कारण स्मार्टफोन बाळाच्या हातात होता!
काही वेळा कॉल किंवा मेसेज किंवा व्हॉट्सअ‍ॅप चुकुन तुमच्या बाळाकडुन अशा व्यक्तीला जातो ज्यांना तो जायला नको होता किंवा काही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज चुकुन अशा ग्रुपवर फॉरवर्ड होतो जेथे व्हायला नको होता. तसेच स्मार्टफोनवर इंटरनेट चालू असल्यामुळे कधी काय डाऊनलोड होईल आणि त्याचा आर्थिक फटका तुम्हाला बसेल याचा नेम नाही. मग मात्र  चिडचिड होते आणि त्या बाळाचा राग यायला लागतो आणि तुम्ही बाळाला स्मार्टफोन देत नाही. मात्र त्याच्या हट्टापुढे काही चालत नाही.
आता मात्र असे काही अ‍ॅप उपलब्ध आहेत जे वापरुन तुम्ही लहान मुलाच्या हातातही बिंधास्त स्मार्टफोन देऊ शकाल!
 
किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल
किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अ‍ॅप. यात  असे फिचर्स आहेत्, ज्यानं चुकीनं मेसेज फोन जाणार नाही, किंवा इंटरनेट वरुन चुकून काहीही डाऊनलोड होणार नाही. विशेष म्हणजे हे अ‍ॅप काही फिचर्ससह मोफत उपलब्ध आहे.
फिचर्स:-
१.किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अ‍ॅप चालु केल्यानंतर स्क्रीनवर फक़्त पालकांनी मुलांसाठी परवानगी दिलेले अ‍ॅपच दिसतात.त्यामुळे मुलांना ह्या अ‍ॅप व्यतिरिक्त दुसरे काही करता येत नाही.
२.यामध्ये इंटरनेट डिसेबल करण्याची सुविधा असल्यामुळे मुलांना चुकुन काही आॅनलाईन खरेदी किंवा काही डाऊनलोड करता येत नाही.
३.यामध्ये टाईमर हे आणखी एक चांगले फिचर्स असल्यामुळे किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अ‍ॅप काही वेळानंतर लॉक करण्याची सुविधा यामध्ये आहे.
४.किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अ‍ँप चालु असताना इनकमिंग कॉंल ब्लॉक करण्याची सुविधा सुद्धा या मध्ये आहे.
५.किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल चालु असताना सर्व वायरलेस सिग्नल डिसेबल होतात.
६.या अ‍ॅप मधुन बाहेर यायचे असल्यास पासवर्ड द्यावा लागतो जो अ‍ॅप इंस्टॉल झाल्यावर सेट करता येतो व तो पासवर्ड फक़्त पालकांकडे असतो.त्यामुळे मुले या अ‍ॅप मधुन बाहेर येऊन काही गडबड करु शकत नाही.
 
अ‍ॅपलॉक
अ‍ॅपलॉक तुमच्या अण्ड्राईड स्मार्टफोनवर एक तरी अ‍ॅपलॉक अ‍ँप असणे आवश्यक आहे. अनेक चांगले अ‍ॅपलॉक अ‍ँप गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहेत.