- निकिता बॅनर्जी
मान्सून फॅशन नावाचा एक ट्रेण्ड दरवर्षीच येतो. अगदी पायातल्या चपला ते हेअर पिन्समध्येही मान्सून कलर्स कसे पेरता येतील, ओलं होत असतानाही फॅशन कशी जपली जाईल याची चर्चा होते.यंदा मात्र ते सारं बंद आहे. यंदा सगळ्यांना एकच चिंता आहे की, पावसात मास्क ओला झाला तर काय करायचं?जगभरात अनेक बडे ब्रॅण्ड्स आपली दालनं बंद करत आहेत कारण मोठा फटका फॅशन व्यवसायाला कोरोना कहराचा बसला.आता जी आहे ती स्लो फॅशन आहे, अशी चर्चा आहे.म्हणजे काय म्हटलं तर फॅशन आहे म्हटलं तर नाही.कारण तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, जमलं तर कडेकोट बंदोबस्त करून जो तो घराबाहेर पडतो आहे. तेही आवश्यक असेल तर नाहीतर मग घरातच बसणं हेच सगळ्यांना क्रमप्राप्त आहे.मग तरी त्यातल्या त्यात ज्यांना छान राहायला आवडतं, ते काही ना काही रंग आपल्या जगण्यात भरतातच, त्यांचीच ही स्लो फॅशन.
1. हाताला सुंदर नेलपेण्ट लावणं, पण नखं न वाढवणं हा एक ट्रेण्ड आहे.2. हौस म्हणून उत्तम मास्क वापरणं, त्यात फॅशन करणं, आणि ते बदलत राहणं किंवा मॅचिंग करणं.3. जगभरातच डोळ्यांचा मेकअप चर्चेत आहे; पण पावसात त्याचीही काही खात्री नाही, त्यामुळे कलर काजळ याकाळात काहीजण वापरत आहेत.4. कलरफुल बॅग्ज, मोठय़ा बॅगा यांचे प्रयोग अनेकांना करून पहायचे आहेत.5. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पायातल्या चपला. त्यावरचा खर्च करणं, आणि त्या भरभक्कम घेत हायहिल्स, फॅशनेबल चपला यांना बाय म्हणणं सुरू झालेलं आहे.