शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

सायलेण्ट हार्ट अटॅकपासून सुटका

By admin | Updated: March 23, 2017 09:29 IST

दहावीत शिकणा-या आकाशनं सायलेंट हार्ट अटॅकवर केलं संशोधन. राष्ट्रपतींच्या हस्ते आकाशाचा सन्मान करण्यात आला.

 दहावीच्या आकाशनं केलं संशोधन

त्याचे आजोबा म्हटलं तर अगदी हेल्दी. स्वत:ची सारी कामं स्वत: करत, रोज हिंडायफिरायला जात होते. नाही म्हणायला त्यांना थोडा डायबिटिस आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास होता, पण अंथरुणावर वगैरे पडून राहायची वेळ त्यांच्यावर कधीच आली नव्हती. त्यानंही आपल्या आजोबांना कायम हसतमुखच पाहिलं होतं.  अचानक एकेदिवशी थोडंसं पडण्याचं निमित्त झालं आणि आजोबा त्याला कायमचे सोडून गेले ते गेलेच.आजोबांच्या जाण्यानं तो अगदी हबकला.असं कसं होऊ शकतं?चालते, फिरते आजोबा असे अचानक आपल्याला सोडून कसे जाऊ शकतात?त्याचे आजोबा ‘सायलेण्ट हार्ट अटॅक’नं वारले होते. आठवीतल्या त्या मुलानं त्याच्या मुळाशीच जायचं ठरवलं. तामिळनाडूच्या या मुलाचं नाव आकाश मनोज. आज हा मुलगा दहावीत आहे.

त्याला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड. तामिळनाडूतलं होसूर हे त्याचं गाव. विज्ञानासंदर्भातली जर्नल्स त्याला तिथे मिळणं अवघडच होतं. त्यानं मग त्याच्या घरापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या लायब्ररीत जायला सुरुवात केली. तिथल्या वैज्ञानिक जर्नल्सचा फडशा पाडायला सुरुवात केली. ही जर्नल्स वाचता वाचता आपल्या आजोबांना सायलेण्ट हार्ट अटॅक का आला, त्यासाठी काय करता येईल याविषयीच्या अभ्यासाकडेही त्यानं बारकाईनं लक्ष पुरवायला सुरुवात केली.सायलेण्ट हार्ट अटॅकच्या नावातच खरं तर त्याची व्याख्या आहे. असा हार्ट अटॅक जो हळूहळू येतो, लक्षातच येत नाही. आणि लक्षात येतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. सर्वसामान्यपणे हार्ट अटॅक येतो, तेव्हा आपल्या छातीत दुखतं, श्वास गुदमरल्यासारखं वाटतं, सायलेण्ट हार्ट अटॅकमध्ये मात्र ही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मसल पेन आहे, अपचन झालं असेल किंवा नुसतीच मळमळ आहे असं समजून रुग्णही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि शांतपणे हा आजार माणसाला घेऊन जातो. आजवर ग्रामीण भागात सायलेण्ट हार्ट अटॅकनं हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यासाठीचे उपचारही त्यांना वेळेवर मिळू शकलेले नाहीत. मुळात प्राथमिक पातळीवरच हा हार्ट अटॅक ओळखण्याचं कोणतंही साधन, उपचार सध्या उपलब्ध नाही. त्यासाठी रुग्णालयात जाऊन इको- टेस्टसारख्या छातीच्या तपासण्याच तुम्हाला करवून घ्याव्या लागतात. आकशनं या सर्व बाबींचा अभ्यास केला आणि एक छोटंसं उपकरण तयार केलं. या उपकरणाच्या साहाय्यानं सायलेण्ट हार्ट अटॅक ओळखता येऊ शकतो. मुख्य म्हणजे आपल्याला स्वत:लाच ते ओळखता येऊ शकतं. त्याच्या या संशोधनाचं नाव आहे ‘नॉन इन्व्हॅजिव्ह सेल्फ डायग्नॉसिस आॅफ सायलेण्ट हार्ट अटॅक’. या तंत्रानुसार रक्तातील एफबीपी ३ हे प्रथिन आपल्या त्वचेला कोणताही छेद न देता तपासता येतं. हे प्रथिन ऋणभारित असतं आणि धनभारित प्रथिनांना ते आकर्षित करते. अल्ट्राव्हायोलेट पद्धतीनं या एफबीपी ३चं प्रमाण मोजता येतं. किती अतिनील किरणं त्वचेतून शोषली जातात त्यावरून हे प्रमाण कळतं. आकाशनं बनवलेलं हे उपकरण अत्यंत स्वस्त आणि सर्वसामान्य रुग्णांना सहजपणे वापरता येईल असं आहे. या उपकरणाच्या पेटण्टसाठीही आकाशनं अर्ज केला आहे. त्याच्या ट्रायलसाठी डिपार्टमेंट आॅफ बायोटेक्नॉलॉजीचे साहाय्य आकाशने घेतलं आहे. येत्या काही महिन्यांत या उपकरणाचं उत्पादनही सुरू होऊ शकेल. सुमारे नऊशे रुपयांत हे उपकरण मिळू शकेल. आकाशला भविष्यात हृदयविकारतज्ज्ञ व्हायचे आहे आणि दिल्लीच्या ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस’मधून (एम्स) त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे. राष्ट्रपतींच्या पुढाकारानं गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रपती भवनात सुरू झालेल्या ‘इनोव्हेशन एक्झिबिशन’अंतर्गत त्याला सन्मानित करण्यात आलं आणि त्याचं उपकरणही या प्रदर्शनात मांडण्यात आलं आहे.