शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

श्वेता बच्चनने नेसलीये कन्सेप्ट साडी, हा कोणता साडीचा प्रकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 16:54 IST

नेहमीच्या साडी प्रकारचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची कन्सेप्ट साडी नक्की वापरून पहा. 

ठळक मुद्देकन्सेप्ट साडी म्हणजे काय? तर शिवलेली, इझी टू वेअर, वापरायला सुटसुटीत अशी साडी.

- श्रुती साठे 

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा झाला, त्याची बरीच चर्चा झाली. फॅशन जगतातील अनेक तारक-तारकांची उपस्थिती, त्यांचे लूक्स, त्यांनी केलेला फ्लॅश मॉब हे सगळंच प्रचंड गाजलं. आलिया भट, श्रद्धा कपूर, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी, दिशा पटनी या सगळ्या तारका चमचमत्या साडी, लेहेंगा चोली अशा पारंपरिक वेशांत सुंदर दिसल्या. पण या सगळ्यात उठून दिसल्या त्या म्हणजे श्वेता बच्चन आणि गौरी खान ! या दोघी एकदम वेगळ्या पद्धतीची साडी नेसून आल्या होत्या. त्या प्रकाराला कन्सेप्ट साडी किंवा  ड्रेप्ड साडी असं म्हणतात. 

कन्सेप्ट साडी म्हणजे काय? तर शिवलेली, इझी टू वेअर, वापरायला सुटसुटीत अशी साडी. पदर छोटा झाला, खालून परकर दिसतोय का वगैरेचं  टेन्शन नाही ! अगोदरच शिवल्यामुळे साडी नेसली की आटोपशीरच दिसणार ही खात्नी आहे ! ही कन्सेप्ट साडी अतिशय ट्रेंडी आणि सुंदर दिसते. अबू जानी- संदीप खोसला या सेलिब्रिटी डिझायनर जोडीने श्वेता बच्चनची कन्सेप्ट साडी डिझाईन केली. श्वेताने नेसलेली आयव्हरी रंगाची प्लेन साडी, प्लिटेड रफल असलेला पदर आणि निर्‍यांचा काठ यामुळे वेगळी दिसली. त्यावर वापरलेले चंदेरी ग्लिटरचे स्लिव्हलेस ब्लाउजही खुलून दिसले. आयव्हरी रंगाची पोटली ही स्टायलिश दिसते.

दुसरी साडी गौरी खानची. ती ही कन्सेप्ट साडीच. तरुण ताहिलियानीने डिझाईन केलेली कन्सेप्ट साडी करडय़ा रंगाचा ओम्ब्रे इफेक्ट देणारी होती. (म्हणजेच फिक्या ते गडद रंगछटा), चंदेरी गोटा एम्ब्रॉयडरी असलेली ही कन्सेप्ट साडी गौरीवर अतिशय शोभून दिसली.