शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

शो, युवर अॅटिट्यूड!

By admin | Updated: September 11, 2014 17:12 IST

‘आम्ही अॅटीट्यूड बघून उमेदवाराला नोकरी देतो. कौशल्यं काय त्याला केव्हाही शिकवता येतील! ’ असं हल्ली मॅनेजमेण्टवाले का म्हणतात?

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमचा  अॅटिट्यूड महत्वाचा ठरतो. एखाद्या व्यक्तीचे, घटनेचे, उपक्रमाचे, कल्पनेचे तुम्ही कशा पद्धतीने मुल्यमापन करता, या गोष्टींवर तुमचा हा अॅटीट्यूड अवलंबून असतो.
हल्ली बर्‍याच संस्थांतले मॅनेजमेण्टवाले खुलेआम म्हणतात, ‘‘आम्ही अॅटीट्यूडू बघून उमेदवाराला नोकरी देतो. कौशल्यं त्याला केव्हाही शिकवता येतील! ’’
मग तुमचा हा अॅटिट्यूड ते कसं ओळखतात? 
तुमचा अॅटीट्यूड हा तुमच्या वागण्यातून संभाषणातून जाणवतच असतो. 
तो सकारात्मक असू शकतो, नकारात्मकही असू शकतो. बोलताना चटकन लक्षात येते.
काही व्यक्ती आयुष्यात फारच नकारात्मक असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना वाईट गोष्टीच दिसतात. घटनेचं नकारात्मक विश्लेषण करण्यातच त्यांना मजा येते. ज्या त्या गोष्टीला ते नावंच ठेवतात, नाकं मुरडतात. अर्थात हा अॅटीट्यूड त्यांच्यावर झालेल्या संस्कारातूनही तयार झालेला असतो. 
मुलाखतीच्या वेळेस एखादा प्रश्न असा येतो की त्याचं उत्तर तुमचा अॅटीटयूड सांगून जातो. 
‘‘अशी एखादी घटना सांग की जेव्हा कामात अपयश आलं..’’ 
बरेचदा  अनेक उमेदवार आपल्या अपयशाबद्दल सांगायला तयारच नसतात. त्यांना वाटतं की आपलं अपयश सांगितलं तर, आपली कमतरता पुढे येईल. इथेच खरा अॅटीट्यूडचा प्रश्न येतो. 
एखादा उमेदवार या ‘अपयशातून’ काय शिकला, आपल्या व्यक्तीमत्वात, विचारात त्याने काय बदल करुन घेतला हे समजून घेण्याचा  प्रयत्न मुलाखत घेणारा करत असतो. अपयश हे महत्वाचे नसते, महत्वाचे असते, तुमची एखाद्या घटनेतून शिकण्याची,अपयशातून उभारण्याची प्रकृत्ती.
त्यातून तुमचा अॅटीट्यृूड तयार होत असतो. आपण जे बघतो, जे अनुभवतो, त्यावरुन हे सर्व अनुभव, निरिक्षण तुम्हाला काही चांगलं देत असतील तर त्याचा अवश्य विचार करा. एखाद्या गोष्टीबद्दलची निव्वळ नकारात्मकता ही त्या प्रसंगाची, घटनेची, व्यक्तीची पृूर्ण ओळख होऊ शकत नाही.
‘‘एखाद्या वेळी तुम्ही तुमच्या बॉसची क्रिटिकल कॉमेंट ऐकली का?’’
असा प्रश्न कुणी विचारला तर, जसं हो नाही उत्तर देता येईल, तसंच त्या क्रिटिकल कॉमेण्टमुळे काय सुधारणा केली हे ही सांगता येईल.
तसाच आणखी एक प्रश्न.
‘‘हा तुमचा ‘प्रोजेक्ट’ जर तुमच्या गाईडने नाकारला तर काय कराल?’’ 
हा साधा प्रश्न.
‘‘मी तो का नाकारला जातोय हे बघेल आणि गाईडच्या अपेक्षा समजून घेऊन नंतर निर्णय घेईल’’ हे एक उत्तर.
दुसरं असंही म्हणता येईल,
‘‘नाईलाज आहे, मी काय करु शकतो, गाईड जे सांगेल ते मला करावे लागेल’’ !
तुमचं उत्तर कुठलं तुम्ही ठरवा, कारण त्यावर तुमचा अॅटिट्यूड ठरेल. आणि तुमच्या अॅटिट्यूडवर तुमच्या संधीच्या शक्यता ठरतील.
 
- विनोद बिडवाईक