शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आपण वेगळ्या लैंगिकतेला मोकळ्या नजरेने आणि माणूस म्हणून बघतो का?   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 17:44 IST

कुणाला नाकारतो, अॅबनॉर्मल ठरवतो हे सारं टाळून जरा समजून-उमजून माणसांचा स्वीकार केला तर त्यांचं आणि आपलंही आयुष्य सोपं होऊ शकेल!

ठळक मुद्देआपण कुणावरही शिक्के मारतो, हे नॉर्मल आहे का?

प्राची पाठक 

अरे, तो ना जाम बायकी आहे.. ती कायम मुलासारखी राहाते. ती एकदम डॅशिंग किरण बेदीच आहे.. तो एकदम केजोटाइप आहे.. त्याला ना कधी कधी मुलींसारखं सजायचं असतं. तसे कपडे घालून असतो रंगीबरंगीआपल्याला त्यांचं काही कळत नाही बाबा.. बरं झालं आपण नॉर्मल आहोत.***-खरं सांगा, तुमच्याही नकळत करता ना अशी खुसपूस तुम्ही? आपल्याला आपलं सेक्शुअल ओरिएन्टेशन नेमकं माहीत असलं/नसलं तरी आपण आपल्याहून वेगळ्या अशा सगळ्यांना विकृत, अॅबनॉर्मल वगैरे ठरवून मोकळे होतो.  मी मुलगा आहे आणि मला जोडीदार म्हणून मुलगी हवी आहे. किंवा मी मुलगी आहे आणि मला जोडीदार म्हणून मुलगाच हवा आहे. म्हणजे आपण नॉर्मल आहोत, असं आपल्याला वाटत असतं. सगळ्यांना आडून किंवा थेट आपण नॉर्मल आहोत, हे वेगवेगळ्या मार्गानी सिद्ध करायचं असतं. पण कोण नॉर्मल आणि कोण नाही? हे कुणी आणि कसं ठरवायचं?

केवळ कोणी केस कापलेली, मुलांसारखी राहाणारी मुलगी दिसली म्हणजे तिला टोमबॉयिश लेबल जोडणं आपण अगदी लगेच करतो. मग आपणच त्यातले तज्ज्ञदेखील बनून लोकांचा लैंगिक कलदेखील ठरवून टाकतो. ती ना तसलीच असणार, केवळ केस मोठे आहेत, इतर पुरुषांसारखे हावभाव नाहीत, म्हणून एखाद्या पुरु षाबद्दल, तो बायकीच आहे, म्हणजे ना तसलाच आहे. हे असे शेरे किती सहज, सरसकट मारले जातात?पण का असं?आपल्याहून वेगळ्या दिसणा:या, वागणा:या, लैंगिक ओळख असणा:या माणसांचा स्वीकार करणं आणि ते आहेत तसे त्यांना स्वीकारणं इतकं का अवघड जावं?खरं तर, खिसे असलेले, अंग नीट झाकणारे, दोन्ही पायांत कापड अडकणार नाही, गरज पडली तर चटकन पळता येईल असे मोकळेढाकळे, सुती कपडे भारताच्या हवामानात नेहमीच्या वापरासाठी योग्य ठरतात. घरातलं जास्तीत जास्त कष्टाचं काम करणा:या स्रिया अत्यंत गैरसोयीच्या पोषाखात ते काम करत असतात. आपला पोषाख सोईचा असेल, तर आपली कामेदेखील नीट पार पडतात. त्यामुळे ते कपडे वापरण्यात काही गैर अगर वावगं नाही.तेच तरुणांचंही. त्यांना कलरफुल कपडे, फ्लॉवर प्रिंट्स आवडलं म्हणजे लगेच काही प्रश्न नको निर्माण व्हायला. परंतु, केवळ पेहरावावरून कोणाला गे, लेस्बियन, बाय ठरवणं एकदम चुकीचं आहे. त्यामुळे अनेकांना त्यांची आवडनिवड त्यांना लपूनछपून जोपासावी लागते. घुसमट सहन करावी लागते.  आपणच तज्ज्ञ बनून लोकांना विकृत, वेडा, बायकी, पुरुषी असे शिक्के मारतो. त्यांचा द्वेष करतो. मुळात माणसांचा लैंगिक कल काहीही असला तरी त्यांचा स्वीकार आणि आदर ही एक मोठी गरज आहे.लैंगिकता ही केवळ दोन जेंडरमध्ये संपत नाही. ती अत्यंत वैविध्यपूर्ण असते. तो एक स्पेक्ट्रम असतो. तरुणपणात आपलं शरीर आपल्या लैंगिकतेबद्दल आपल्याला काही सांगत असतं. ते समजून घेता येतंय का ते बघावं. तज्ज्ञांशी त्याबद्दल मोकळेपणाने बोलावं. आपला लैंगिक कल नीट कळला, तर तो आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या अनेक लहानसहान गोष्टींना सुपर फाइन करू शकतो. मनातली घुसमट, कचकच कमी होऊ शकते. ती एक डोळसपणो जाणून घ्यायची गोष्ट आहे. तसंच, जे आपल्यासारखे नाहीत, त्यांनादेखील माणूस म्हणूनच समजून घेण्याचीही गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला असे कोणी होमो फोबिक लोक असतील, तर त्यांनाही यात काही चुकीचं नाहीये, हे समजून सांगायची गोष्ट आहे. विचारू स्वत:ला.. आपण वेगळ्या लैंगिकलेला स्वच्छ, मोकळ्या नजरेने आणि माणूस म्हणून बघतो का? 

 (प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)