शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स हार्मोन्समध्ये काही गडबड झाली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 15:51 IST

आपल्या शरीराची वाढ होते. त्या वाढीसाठी पोषक असे काही हार्मोन्स असतात. ते एरव्ही उत्तम, अचूक, नियमित काम करतात; पण त्यांच्यात गडबड झाली तर मोठा घोळ होतो.

ठळक मुद्देडोक्यावरील केस हे या हार्मोन्सच्या कृपेनं वाढत असतात. 

 - डॉ. यशपाल गोगटे

उंची व वाढीसाठी ग्रोथ हार्मोन गरजेचं असतं. उंची एका विशिष्ट वयानंतर स्थिर होते; पण वाढ मात्न कायम चालू असते. या वाढीसाठी जबाबदार असलेले सहायक हार्मोन्स म्हणजे सेक्स हार्मोन्स. मानवी शरीरात तीन मुख्य सेक्स हार्मोन्स असतात. टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. हे हार्मोन्स पुरुषांमध्ये वृषणात व स्त्रियांमध्ये बीजकोषात  तयार होतात. याशिवाय अ‍ॅड्रिनल ग्रंथीतूनदेखील काही सेक्स हार्मोन्स तयार होत असतात, हे हार्मोन्स अत्यल्प असले तरी गरजेचे असतात. पिटय़ूटरीमधील एफएसएच, एलएच, आणि प्रोलॅक्टिन हार्मोन्स हे वृषण व बीजकोषातील हार्मोन्सवर नियंत्नण ठेवतात. पिटय़ूटरी- वृषण व बीजकोषातील हार्मोन्सची परस्परावलंबी असलेली ही प्रणाली शिस्तबद्ध रीतीनं शरीरात कार्यरत असते.इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्यानं स्त्रियांमध्ये कार्यरत असणारे हार्मोन्स आहेत. स्त्रियांमध्ये स्तनांचा विकास, बीजकोष व गर्भाशय याची वाढ, पाळीची नियमितता व गर्भधारणा या सगळ्यांसाठी महत्त्वाची भूमिका निभावणारे हे हार्मोन्स आहेत. मुख्यत्वे स्त्रियांमध्ये आढळणारे हे हार्मोन्स पुरुषांमध्येदेखील हाडांच्या बळकटी करता गरजेचे असतात. इस्ट्रोजेन या हार्मोन्समुळेच स्त्रियांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण कमी असते. स्त्रियांच्या विशिष्ट स्वभावाकरतादेखील हे हार्मोन्स जबाबदार असतात. डोक्यावरील केस हे या हार्मोन्सच्या कृपेनं वाढत असतात. पुरुषार्थाशी निगडित असलेले हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉन. मुलांमध्ये वयात येतानाचे बदल या हार्मोन्समुळे घडत असतात. डोक्याचा भाग सोडून इतर शरीरावरील केसांची वाढ टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्समुळे होत असते. पण या हार्मोन्समुळेच पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण अधिक असते. स्नायूंची वाढ व शरीराचा एकूण दणकटपणादेखील टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्समुळेच येतो. पण या हार्मोन्सची नकारात्मक बाजू म्हणजे एकूणच पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळणारा हृदयरोग, ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अप्नोआ व स्ट्रोक यासारखे आजार. खेळाडू व बॉडी बिल्डर या हार्मोन्सचा जास्त प्रमाणात गैरवापर करतात. मात्र त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्याचे अतिरिक्त सेवन टाळावे.पिटय़ूटरीमधील एफएसएच, एलएच हे सेक्स हार्मोन्सवर नियंत्नण ठेवतात. त्यामुळे शरीराची अपेक्षित वाढ होण्यास मदत होते. हे हार्मोन्स पाळीची नियमितता ठेवतात व पुरुषांमध्ये शुक्र ाणूंची निर्मिती करतात. प्रोलॅक्टिन हे स्तनांच्या वाढीकरिता व गर्भधारणेच्या काळात दूध निर्मितीकरता जबाबदार असते. खरं तर ही सारी यंत्रणा उत्तम काम करत असते. अचूकही असते. पण तरीही या  नियमितपणे चालणार्‍या प्रणालीमध्येही गडबड होऊच शकते. ती गडबड होते तेव्हा काय होतं हे आपण पुढील लेखांमध्ये बघू.