शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 17:19 IST

शांताबाईंची कविता प्रशांत सरोवरात अलगद एकापाठोपाठ एक कमळं उमलत जावीत तशी आपल्यासमोर उलगडत जाते.. त्यांच्या कवितेने आपलं भणंग आयुष्य सुजाण, शहाणं, निग्रही केलं आहे..

ठळक मुद्देमज फूल ही रु तावे हा दैवयोग आहे.

लीना पांढरे

टाळेबंदीचा बंदिस्त, विषण्ण करून टाकणारा काळ. तशात चक्रीवादळाच्या थडकणा:या बातम्या. रात्नभर मुसळधार पाऊस कोसळत होता. शेजारच्या कंपाउंडमधील  काळी मांजरी केविलवाणी ओरडत होती. पहाटे पहाटे ती व्यायली. नुकतीच जन्मलेली, डोळे मिटलेली पिल्लं तोंडात धरून ती इकडे-तिकडे आसरा शोधू लागली आणि मला शांताबाईंची कविता अचानक आठवली.‘नुकतीच कोठे मांजर व्याली, सांन जीव कोवळे, काचेवरती कसे दाटले अवेळचे कावळे.’जन्म आणि लगेच त्या कोवळ्या जिवांवरील मरणाचं सावट किती नेमकेपणाने मांडले शांताबाईंनी. शांता शेळके यांना या इहलोकाचा निरोप घेऊन उणीपुरी 18 वर्षे उलटली. 6 जून 2002 रोजी अशाच पावसाळी कुंद, दाटून आलेल्या वेळी त्यांनी आपला निरोप घेतला. शांताबाईंचं व्यक्तिमत्त्व भारदस्त खानदानी आणि आदबशीर होतं. डोक्यावरून घेतलेला पदर, भाळावरील ठसठशीत कुंकू, कानात टपो:या मोत्यांच्या कुडय़ा, सस्मित चेहरा आणि आश्वस्त करणारी शांत नजर.शांताबाईंसारखीच त्यांची कविताही आहे. चांदण्या रात्नी उंच देठावर उमललेल्या निशिगंधासारखी. शालीन, तालेवार आणि खानदानी कविता उंची अत्तरासारखी. जन्मभर आपल्यात खोलवर परिमळत राहाणारी.कविता हा शब्दसुद्धा परक्या लिपीसारख्या असणा:या कितीतरी मराठी माणसांना शांताबाईंची गीतं अगदी बालवाडीच्या वर्गापासूनच भेटायला लागतात. किलबिल किलबिल पक्षी बोलती, पप्पा सांगा कुणाचे, आणि नंतर शाळेतला कुठलाही कार्यक्रम ‘जय शारदे वागिश्वरी’ या सरस्वतीस्तवनानेच सुरू व्हायचा. त्यानंतर ‘गणराज रंगी नाचतो’पासून ‘शूर आम्ही सरदार’ अशी वीरश्री अंगात संचार करणारी गाणी त्याच वयात भेटली. थोडसं मोठं झाल्यानंतर शाळेच्या रंगमंचावर गुडघ्यार्पयत जरीची साडी नेसून ‘वादळ वारं सुटलं गो’, ‘माङया सारंगा राजा ’  किंवा ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’ यावर ठेका धरला. नंतर स्वत:बद्दल खुळचट घमेंड बाळगण्याची  कॉलेजची स्वप्नाळू वर्षे. ‘शालू हिरवा पाचू नी मरवा’ अशा भावगीतांपासून ‘जाईन विचारत रानफुला, भेटेल तिथे गं सजण मला’किंवा ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माङया मनातला का तेथे असेल रावा’ अशा तारुण्यसुलभ गीतांबरोबर धुंद मदीर करून टाकणा:या शृंगारिक लावण्याही शांताबाईंनी लिहिलेल्या आहेत. आशाबाईंनी गायलेली लावणी आठवते?रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला,हात नगा लावू माङया साडीला.त्यांची गीतं ऐकताना कायमच ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ वाटत राहिला.‘घर रानी साजणा’ असला तरीसुद्धा.पण त्याच लेखणीतून जिवाची तार छेडणा:या माणिक वर्मा यांच्या स्वरात शांताबाई यांनी विनवले होते.

‘मी तुझी होते कधी हे सर्व तू विसरून जा, चांदण्या रात्नीतले ते स्वप्न तू विसरून जा .’आशाच्या व्याकूळ सुरातून म्हटलेले गीत, जिवलगा राहिले रे दूर घर माङो.जितेंद्र अभिषेकी यांनी मांडलेली शांताबाईंची फिर्याद. काटा रु ते कुणाला आक्रं दतात कोणी. मज फूल ही रु तावे हा दैवयोग आहे.’-अशी किती उदाहरणं सांगता येतील.शांताबाईंची कविता ही अस्सल स्त्नीत्व व्यक्त करणारी आत्मनिष्ठ आणि रोमॅटिक कविता आहे. ती  कुठेही सामाजिक, वैचारिक, राजकीय क्षितिजांना गवसणी घालायला गेलेली नाही आणि ती अजिबात दुबरेध नाही. शांताबाईंची कविता प्रशांत सरोवरात अलगद एकापाठोपाठ एक कमळं उमलत जावीत तशी आपल्यासमोर उलगडत जाते. बाईंची सर्व सांस्कृतिक संचितं, त्यांची संस्कृतप्रचुर भाषा, लोकगीतं, स्त्नीगीतं, जात्यावरच्या ओव्या, संतांचे अभंग, मेघदूत, उत्तररामचरित सारख्या महाकाव्यच्या गडद खुणा हे सर्व संस्कारधन त्यांच्या कवितेतून प्रगट होते.शांताबाईंच्या कवितेने  आमचं भणंग आयुष्य सुजाण, शहाणं, निग्रही केलं आहे आणि सहजपणो जगण्याला भिडणा:या साध्यासुध्या निर्मळ स्वीकारशीलतेच्या  व्रताचा वसा त्यांच्या कवितेने आम्हाला दिला आहे.

( लेखिका प्राध्यापक आहेत.)