शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

इंजिनिअरिंंग कॉलेजच्या मुलांनी बनवला उपग्रह

By admin | Updated: June 22, 2016 12:58 IST

थ्री इडियट आठवतोय ना? मग त्यातला रॅँचोही लक्षात असेलच! पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष जगण्यावर, करुन पाहण्यावर विश्वास ठेवणारा. त्यानं आपल्या शिक्षणपद्धतीतले दोष तर दाखवलेच पण तरुणांच्या कल्पना शक्तीची जाणीवही करून दिली

थ्री इडियट आठवतोय ना? मग त्यातला रॅँचोही लक्षात असेलच! पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष जगण्यावर, करुन पाहण्यावर विश्वास ठेवणारा. त्यानं आपल्या शिक्षणपद्धतीतले दोष तर दाखवलेच पण तरुणांच्या कल्पना शक्तीची जाणीवही करून दिली. हे सारं फिल्मीच आहे, प्रत्यक्षात असं काही घडत नाही असं वाटत असेल तर पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजातल्या दोस्तांना भेटा. पुण्यातील कॉलेज आॅफ इंजीनिअरिंगने एक भन्नाट संधी उपलब्ध करून दिली अन् तिथल्या विद्यार्थ्यांनीही त्या संधीचं सोनं करत शब्दश: आकाशाला गवसणी घालण्याचं धाडस केलं! या शिकाऊ इंजिनिअर्स नी चक्क ‘स्वयम’ हा लघु उपग्रह तयार केला. येत्या बुधवारी हा ‘स्वयम’ आकाशात झेपावणार आहे. खुद्द ‘इस्रो’ ने या उपग्रहाच्या उपयोगितेवर शिकामोर्तब केलं आहे. ‘संदेश वहन’ हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. देशातील हा दुसऱ्या क्र मांकाचा सर्वात लहान उपग्रह आहे. याचं वजन केवळ ९९० ग्रॅम आहे. विश्वास बसत नाही ना? पण ‘सीईओपी’ च्या १७६ विद्यार्थ्यांनी मिळून ही कमाल केली आहे. खरं तर टीम वर्कचंही हे एक उत्तम उदाहरण आहे. २००८ च्या अखेरीस या उपग्रहाची पायाभरणी झाली. त्यावेळी इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अभिषेक बाविस्कर, प्रिया गणदास, निश्चय मात्रे आणि मोहित कर्वे या चौघांची ‘स्वयम’ ही मुळ कल्पना. शुन्यातुन सुरु वात करायची होती. कॉलेज मधे याविषयीचाअभ्यासक्र म घेतला जात नाही. त्यामुळे इथे बेसिक माहितीही मिळणेही अशक्य. सुरु वातीला इंटरनेटचा आधार घेतला. शिक्षक, तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ यांच्या गाठी भेटी सुरु झाल्या. इतर सहकारी मित्रमैत्रिणींची मदत होऊ लागली. उपग्रह बनवायचा म्हणजे साधी गोष्ट नाही, याचं भान ठेवून त्यांनी प्रत्येक बाब बारकाईनं पहायला सुरु वात केली. आपल्या विद्यार्थ्यांचे हे प्रयत्न पाहून कॉलेज प्रशासनाचीही उत्सुकता वाढली. उपग्रह बनवण्याची कल्पना कॉलेज मधे सर्वांसाठीच नविन होती. पण विद्यार्थांच्या या प्रयत्नांना कॉलेजमध्ये सर्वानीच बळ दिलं. २००९ मध्ये याला अधिकृत मान्यता दिली गेली. आता हे एक मिशन बनलं. विद्यार्थी स्वत: हे मिशन पूर्णत्वास नेणार असल्यानं त्याचं ‘स्वयम’ असंच नामकरण करण्यात आलं. ‘स्वयम’च्या निर्मितीला टप्या- टप्याने वेग येऊ लागला. खर्च, उपलब्ध साधनांचा विचार करून उपग्रह लहान असावा असे पक्के झाले होते. त्यामुळे लांबी, रु ंदी आणि उंची जवळपास १० सेंमी. पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. यासाठी लागणारी बहुतेक उपकरणं विद्यार्थ्यांनी इथंच बनवली. काही साहित्य बाजारातून आणावं लागलं. पण काम एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे वेळ लागत होता. टीम मधील काही विद्यार्थी पदवी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. अर्थात म्हणून काम थांबलं नाही. त्यांच्यासोबत काम केलेल्या इतरांनी ही जबाबदारी स्वीकारली. पुन्हा काही नविन विद्यार्थी जोडले गेले. ही साखळी अशीच सुरु राहिली. कॉलेज कडूनही साथ मिळत होती. अथक प्रयत्नांतून २०१३ च्या सुरु वातीस स्वयम चं प्राथमिक रूप साकार झाले. इस्त्रोकडून त्याची पाहणी करण्यात आली. त्याच वर्षी कॉलेज आणि इस्त्रोमधे याबाबतचा करार झाला. चार वर्षाच्या प्रयत्नाचं चीज होणार होतं. त्यामुळे सर्वचजण आनंदून गेले. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर जानेवारी २०१५मधे स्वयम इस्रोच्या मुख्य केंद्रात दाखल झाला. आणि आता तो भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘स्वयम’ साठी सीईओपी मधे नियंत्रण कक्ष तर संस्थेच्या इमारतीच्या छतावर अ‍ॅण्टेना उभारण्यात आला आहे. सध्या कॉलेज मधे अंतिम वर्षात शिकणारे धवल वाघुलदे, अब्दुलहुसैन सोनगरवाला, सौरभ बर्वे, तन्वी कटके आणि अभिजित राठोड हे या मिशनचं काम पाहत आहेत. बुधवारनंतर पुढील वर्षभर हे मिशन सुरु राहणार आहे. ‘स्वयम’ ची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे, पुढेही होत राहील. त्याचं आयुष्य एक वर्ष असलं तरी केवळ कॉलेज मधील १७६ विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकीच्या बळानं एक महत्वाकांक्षी प्रकल्प आकारास आला. आणि आठ वर्षांचा हा प्रवास अन्य अनेक तरुण इंजिनिअर्सना प्रेरणा देत राहील.. राजानंद मोरे