शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

Sankashti Chaturthi 2023: 'संकष्टी' पावावे म्हणाल तर बाप्पा संकष्टीलाच पावेल, 'संकटी' म्हणाल तर सदैव सोबत राहील; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 07:00 IST

Sankashti Chaturthi 2023: आनंदाच्या भरात आरती म्हणताना आपण काही शब्दांचे चुकीचे उच्चारण करतो, त्यामुळे शब्दांचा आशय बदलतो; तीच बाब गणेश आरतीची!

समर्थ रामदासांनी लिहिलेली `सुखकर्ता दु:खहर्ता' ही गणपतीची आबालवृद्धांना तोंडपाठ आहे. फक्त आरती म्हणता म्हणता उत्साहाच्या भरात गाडी घसरते आणि संकटी पावावे ऐवजी `संकष्टी पावावे' असा निरोप बाप्पाला धाडला जातो. मात्र, समर्थांनी जे मागणे मागितले आहे, ते लक्षात घेतले, तर भविष्यात संकटीऐवजी संकष्टी असा उच्चार होणारच नाही. काय आहे त्यांचे मागणे?

श्रीगणेश हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आणि आवडते दैवत. आपली सुखदु:खे आपण ज्याच्याजवळ विश्वासाने सांगू शकतो, तो आपला बाप्पा सुख देणारा आहे आणि दु:खाचे हरण करणारा म्हणजेच संकटांना पळवून लावणारादेखील आहे. म्हणून तर आपण त्याला `वार्ता विघ्नाची नुरवी' असे सांगतो. म्हणजे विघ्नेच काय तर त्याची वार्ता सुद्धा न उरवी, म्हणजे शिल्लक ठेवू नकोस, असे आपण सांगतो. मात्र, आरतीच्या ठेक्यात, लयीत गात असताना `नुरवी पुरवी प्रेम' असे म्हणत आपण स्वत:चीच गल्लत करतो. नुरवी पुरवी हे केवळ यमक जुळवले नसून, संकट उरवू नको पण प्रेम मात्र पुरव अशी प्रेमळ मागणी केली आहे. 

ही मागणी कोणाकडे? तर ज्याची आमच्यावर कृपा आहे, ज्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि ज्याच्या गळ्यात मुक्ताफळांची म्हणजेच मोत्याची माळ आहे, अशा गणेशाला मोरया म्हणजे माझा नमस्कार असो. 

बाप्पाला समर्थांनी मंगलमूर्ती म्हटले आहे, कारण तो अमंगळाचा नाश करतो. त्याचे नुसते दर्शनही मंगलमयी आहे. त्याला बघूनही प्रसन्न वाटते. त्याची कृपादृष्टी आश्वासक वाटते. ती पाहता मनोकामना आपसुक पूर्ण होईल, असा दिलासा वाटतो.  यातही समर्थांच्या आरतीत केवळ मंगलमूर्ती असा उल्लेख आहे, परंतु भक्तांनी श्रीमंगलमूर्ती दिलेली जोडदेखील आता आरतीचाच एक भाग असल्यासारखी म्हटली जाते. 

पुढच्या दोन्ही कडव्यांमध्ये समर्थांनी गणपती बाप्पाचे वैभवसंपन्न रूप रेखाटले आहे. गणपती, गणनायक या शब्दांमध्ये नेतृत्व सामावलेले आहे. युद्धकलेत निपुण असलेला बाप्पा पाशांकुशधारी आहे. मात्र, समर्थांनी या आरतीमध्ये केवळ बाप्पाचे वैभव दाखवले आहे. त्याच्या हाती शस्रास्रे न देता, त्याचे हात या महाराष्ट्राला आशीर्वाद देण्यासाठी आणि मोदक अर्थात आनंद देण्यासाठी मुक्त असल्याचे वर्णन केले आहे. 

मात्र, आरती संपत असताना, श्रीगणेशाला आर्त साद देत विनंती केली आहे, `संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' म्हणजेच देवा आमच्या संकटकाळात तर धावून येच, शिवाय आयुष्यात ज्या ज्या वेळी निर्वाणीचे म्हणजेच भावभावनांचा कडेलोट झाला, आणाीबाणीचा प्रसंग उभा ठाकला असे वाटेल, तेव्हा रक्षणार्थ धावून ये.' म्हणून हे मागणे केवळ `संकष्टी' पुरते न मागता दर संकटात त्याने धावून यावे, असे त्याला सांगावे. आणि आर्ततेने म्हणावे, `संकटी पावावे निर्वाणि रक्षावे.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी