शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

निर्माल्य दिंडी आणि श्रमदानाला सलाम

By admin | Updated: August 29, 2014 10:37 IST

गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच,

वीर हनुमान गणेश मंडळ, 
खामगाव
 
गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच, हिंदूचा सर्वांत मोठा उत्सव, दुर्देवानं दंगलीचं प्रमाणही याच काळात जास्त. मुस्लीमबांधव तर यासार्‍यापासून दूरच राहतात. खामगावातील वीर हनुमान गणेश मंडळ मात्र याला अपवाद आहे. या मंडळाने द्वारकाबाई चेके यांना एका वर्षी अध्यक्ष करून महिलांचा सन्मान केला तर एकदा शेख बब्बू शे.रब्बानी अध्यक्षपद दिलं. कधी शंकर धुरंदर सारखा मागासवर्गीय तरूण, तर कधी जसवंत सिंग सारखा शिख बांधव या मंडळाच्या अध्यक्षपदी राहिला आहे. अशी वेगळी ओळख सांगणार्‍या या मंडळाने २९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केलाय. जातीय सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यात नेहमीच पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते कुणाच्याही मागे वर्गणीसाठी ससेमिरा लावत नाहीत. ऐच्छिक रूपाने मिळणारी वर्गणी व o्रमदान हे या मंडळाचे वैशिष्ट्य. सन २0१२ मध्ये मिळालेल्या गणराया पुरस्काराच्या २५ हजारांच्या रकमेत या मंडळाकडील जमा रक्कम तसेच काही दानशुरांच्या मदतीने या मंडळाने आता ‘स्वर्गरथ’ खरेदी केला आहे. हा रथ खामगाव व परिसरात अत्यंयात्रेत ना नफा ना तोटा या पद्धतीने वापरला जातो. रक्तदानासाठी मंडळाचे कार्यकर्ते सदैव पुढे असतात. गणेशोत्सवाच्या काळात त्या नगरातील सार्वजिनक स्वच्छता करून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात. या मंडळाने मोठ मोठे डिजे आतापर्यंत कधीही वापरले नाही. संपूर्ण दारूमुक्त असलेल्या या मंडळाच्या मिरवणुकीत शारीरिक कसरतींवर दिला जातो.
 या मंडळाची मूर्तीही अनोखीच असते. बांबू, भांडी, कागद, कोरफड, क्रीडा साहित्य अशा साधनांचा वापर करून या मंडळाची गणेशमूर्ती साकारते. गेल्या वर्षी १५ फुटांची बांबूची मूर्ती होती व यावर्षी कागद व मातीपासून बनविलेली ११ फुटांची मूर्ती नवे आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासून या मंडळाने प्लॉस्टर ऑफ पॅरीसची मूर्ती बसविलेली नाही. पुजेसाठी लागणारी लहान मूर्ती सुद्धा मातीचीच असेल हा नियम आहे.
दहा दिवस गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीच्या विसर्जनानंतर निर्माल्याचा प्रश्न मोठा गंभीर होतो, त्यामुळे निर्माल्य जमा करून स्वच्छतेचा संदेश देणारी या मंडळाची निर्माल्य दिंडीसुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंडळाचे कार्यकर्ते दिंडी काढून निर्माल्य गोळा करतात.
 मनजितसिंग, राजेंद्र कोल्हे, पुरूषोत्तम सातव, प्रमोद जैन या युवकांनी तरूणाई फाउंडेशन स्थापन करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या विचारांचा वसा उचलला आहे. त्यामुळे यांच्या प्रत्येक कार्यात o्रमदानाचे महत्त्व सर्वाधिक आहे. पर्यावरण रक्षणाचा कृतीयुक्त संदेश देण्यासाठी दरवर्षी हे खामगाव ते शेगाव ही १८ किमीची स्वच्छता दिंडी पालखी मार्ग स्वच्छ करतात.