शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

काय एवढा शिकला आणि ढेकळात काम करतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 6:17 PM

चला आता वावरात! पिकपाण्याची कामं शेकडो, मग पोरं मागे हटली नाहीत!!

ठळक मुद्देगावात मिळेल ते काम करून जगण्याची घडी मोडू नये म्हणून कष्ट करताहेत. तेही आनंदानं.

- राम शिनगारे

कोरोनाचा कहर सुरू झाला आणि शहरात शिक्षणासाठी, नोक:यांसाठी गेलेले अनेक तरुण आपापल्या गावी परतले. हे एक मोठंच स्थलांतर झालं. त्यात  विद्याथ्र्याचा, तरुण नोकरदारांचा आकडा मोठा. शहरांत जाऊ शिक्षणाच्या शिडीनं  वास्तवार्पयत पोहोचू, गावची गरिबी मागे सोडू असं मनात बरंच काही होतं. आहे.मात्र कोरोनाने सगळं पॉज करून टाकलं आणि शहरं आपली वाटेनात, तशी ती नव्हतीही काहींसाठी. मग ते गावी आले. गावात येतानाही अनेकांच्या हाती मोबाइल, त्यावर मारलेले डेटा पॅक, गेम्स सगळं होतं.काहीजण त्यात रमलेही; पण काहीजणांसमोर उभा वर्तमान त्यांना सांगत होता, कामाला लाग. आपण शहरात उच्च शिक्षण घेत आहोत, आता गावी आल्यावर शेतात आईबापासोबत कष्टाची, अंगमेहनतीची कामं कशी करायची असं कुणाच्या मनात आलंही असेल, गावात कुणी म्हटलंही असेल की, काय एवढा शिकला आणि ढेकळात काम करतोय. पण ते सारं बाजूला ठेवून, गावी आलेले अनेक तरुण लागले आईबाबांसह कामाला, उतरले वावरात. ऐन पावसाळ्याचे दिवस, पिकपाण्याची कामं शेकडो.मग ही पोरं मागे हटली नाहीत, कोरोनाचं जे व्हायचं ते होवो आपण आपल्या मातीत कामाला लागलेलं बरं म्हणून भिडलीच कामाला.असे गावखेड्डय़ात आज अनेक आहेत. गावोगावी आहेत. हुशार, अभ्यासू, फर्ड इंग्रजी बोलतील; पण आता गावी आले नि गावचे होऊन लागलेत कामाला.त्यातल्याच काही दोस्तांशी गप्पा मारल्या.बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटाच्या डोंगररांगात आरणवाडी हे छोटेखानी गाव आहे. या गावातील युवक दिलीप वामन शिनगारे. त्यानं नाशिकच्या एनडीएमव्हीपी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी.फार्म अभ्यासक्र म पूर्ण केला. गेट, जीपीटीए, नायपर-जेईई या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांत प्रावीण्य मिळवत मोहाली येथील नॅशनल इन्स्टिटय़ूत ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (नायपर) या नामांकित संस्थेत एम. टेक. इन फार्मासिटिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्र माला 2018मध्ये प्रवेश घेतला. शिक्षण उत्तम सुरूझालं. त्यात हा कोरोना आला. केंद्र शासनाने जनता कफ्यरू जाहीर केला. त्यापूर्वीच नायपर संस्थेने विद्याथ्र्याना घरी परतण्याचे आदेश दिले. पंजाबमधील मोहालीतून औरंगाबादेत येण्यासाठी सचखंड ही एकमेव गाडी आहे. मात्र त्यात जागा मिळणं कठीण होतं. त्यामुळे दिलीप मित्रंसह विमानाने पुण्यात उतरला. पुण्यातून प्रवाशी वाहतूक करणारी गाडी पकडून बीडला आला. तेथून गावी परतला. त्यास आता चार महिने पूर्ण होत आहेत. गावात केवळ बीएसएनएलच्या कार्डला रेंज येते. बाकी कंपन्यांचे कार्ड चालत नाहीत. या कठीण परिस्थितीत नायपर संस्थेतील शेवटच्या सत्रतील शोधप्रबंधाचं काम करायचं होतं. त्यानं मग गावात राहून नायपरमधील गाइडच्या सल्ल्याने शोधप्रबंध पूर्ण केला. तो शोधप्रकल्प करत होता; पण हे दिसत होतं की वडिलांना आता शेतकाम होत नाही. पण वडिलांनाही वाटे की मुलगा खूप वर्षांनी गावी आला आहे त्यानं शेतीकाम करूनये. अभ्यास करावा, थोडी उसंत खावी. पण वडिलांचे कष्ट पाहता दिलीपने शेतात कामाला करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे मुबलक पाणी होतं. वडिलांनी पाच एकर शेतात ऊस लावलेला होता. उसातील मशागतीची कामं मार्च-एप्रिल महिन्यात करावी लागतात. त्यात उसाची नांगरणी, वाफे तयार करणं, बांधावरील गवत कापणं, उसाला पाणी देणं, रासायनिक खतं टाकणं, तणनाशक औषधीची फवारणी ही कामे मागील चार महिन्यात दिलीपने केली.   नायपरसारख्या राष्ट्रीय संस्थेत आपण शिक्षण घेत आहोत, त्यामुळं शेतीतील अंगमेहनतीची कामे कशी करावीत, असा प्रश्नही मनात आला नाही असं दिलीप सांगतो, म्हणतो, वडिलांनी काबाडकष्ट करून एवढं शिकवलं. आता कोरोनामुळे आहे घरीच तर अभ्यासक्र म पूर्ण करताना वडिलांनाही मदत केली.’

दिलीपने शेतातील कामं करत असतानाच नायपर संस्थेतील शेवटच्या सत्रचा अभ्यास पूर्ण केला. त्याला संशोधन क्षेत्रत करिअर करायचं असल्याने काही संस्थात अर्जही केला. त्यातील तीन संस्थांनी मुलाखती घेऊन निवडही केली आहे. यात गुजरातमधील अहमदाबाद येथील निर्मा युनिव्हर्सिटीमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो, चंदीगड येथील मेक्झॉम लाइफ सायन्सेस संस्थेत ज्युनिअर सायंटिस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात नव्याने सुरू होणा:या कोविड-19 विषाणू तपासणी प्रयोगशाळेत रिसर्च असिस्टंट अशा विविध संधी त्याच्यासमोर आजच उभ्या आहेत.नायपरमध्ये एम.टेक पूर्ण झाल्यानंतर तात्काळ परदेशातील संशोधन करणा:या विद्यापीठांमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेण्याचं त्याच्या मनात होतं.  यावर्षी हे शक्य होणार नाही. वर्षभर संशोधनाचा अनुभव मिळावा, यासाठी विविध संशोधन संस्थांमध्ये मुलाखती दिल्या. त्यात निवड झाल्यामुळे आत्मविश्वास वाढल्याचे तो सांगतो.****आरणवाडी गावातीलच सार्थक माधवराव माने हा युवक. औरंगाबादेत विधी अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ आणि औरंगाबाद जिल्हा न्यायालयात एका वरिष्ठ विधिज्ञाच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचे धडे गिरवत आहे. मात्र कोविड- 19च्या टाळेबंदीमुळे न्यायालयं बंद झाली. जे काही कामकाज होत आहे ते अतितातडीचे आहे. यात सार्थकसारख्या वकिलाला काम करण्याची संधी मिळणं अवघड. या काळात औरंगाबादेत घरात कोंडून घेऊन बसण्यापेक्षा त्यानं गावाकडचा रस्ता धरला. त्याच्याही वडिलांना पाठदुखीचा त्रस आहे. त्यामुळं गावी येऊन त्यानं शेतीकामात हात घातला. मागील साडेतीन महिन्यापासून तो शेतीतील सर्व कामं करतो आहे. याशिवाय गावासह पंचक्रोशीतील अनेकांना कायद्याचे सल्ले देण्याचं कामही सुरूआहे.शिक्षण घेण्यासाठी मागील अनेक वर्षापासून बाहेर आहे. गावाकडं कधी तरी जात असल्यामुळे शेतीची कामं करण्याची सवय मोडून गेली होती. मात्न यावर्षी कोरोनामुळे सर्व कामं करता आली. समाधानाची बाब म्हणजे वडिलांच्या पाठदुखीच्या काळात त्यांना मदत करता आली.’कोरोनाकहरात लॉकडाऊन आहे, अनेक युवक घरामध्ये बंद आहेत. मात्र शहरातून गावी आलेली तरुण मुलं मात्र अशी कामाला भिडली आहेत.दिलीप आणि सार्थक ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. असे अनेकजण आपापल्या शेतात राबत आहेत, गावात मिळेल ते काम करून जगण्याची घडी मोडू नये म्हणून कष्ट करताहेत. तेही आनंदानं.

(राम लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत वार्ताहर आहे.)